शुगर फ्री आंबे हे ऐकण्यास नवल वाटेल असे आहे. परंतु हे खर आहे. पाकिस्तानमधील एका संशोधकाने आंब्यावर संशोधन करून चक्क शुगर फ्री आंब्याची नवी प्रजाती निर्माण केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाकिस्तान मध्ये असलेल्या सिंध प्रांतातील एम. एच. पन्हवर या कृषी फार्म मध्ये हे संशोधन करण्यात आले आहे.
या फार्ममध्ये साखरेचे कमी प्रमाण असणाऱ्या आंब्याच्या तीन जाती विकसित करण्यात आले आहेत. या संशोधन केलेल्या नवीन प्रजातींमध्ये साखरेचे प्रमाणे अवघी चार ते सहा टक्के आहे. या जाती म्हणजे ग्लेन,केट, सोनारो अशा या तीन प्रजाती आहेत. या संशोधनासाठी एम. एच. पन्हवर त्यांना पाकिस्तान सरकारने सितारा – ए - इम्तियाज या पुरस्काराने सन्मानितकेले आहे. या कामात त्यांचा पुतण्या गुलाम सरवार यांनी आपल्या काकांचा वारसा पुढे चालवला आहे.
याबाबतीत गुलाम सरवार यांनी सांगितले की, त्यांनी वेगवेगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यातून आंब्याच्या प्रजाती आणून त्या प्रजाती पाकिस्तानच्या वावरात कसा प्रतिसाद देतात यावर संशोधन केले व त्या संशोधनातून कमी साखर असलेल्या आंब्याच्या प्रजाती विकसित करण्यात त्यांना यश आले.
गुलाम चे काका एम. एच. पन्हवर त्यांनीदेखील फळांच्या जाती आंबे, केळी आदी फळावर संशोधन केले होते. यांच्या मृत्युपश्चात गुलाम संशोधनाचा वारसा पुढे नेत आहेत. या संशोधनासाठी पाकिस्तान सरकारकडून त्यांनी कोणत्याही प्रकारची मदत घेतली नाही.
त्यांच्या वैयक्तिक ताकदीच्या जोरावर हे संशोधन पूर्ण केले असल्याचे गुलाम यांनी सांगितलं. आंबे डायबिटीस रुग्णांसाठी उपयुक्त ठरावी यासाठी त्या फळातील साखर नियंत्रित ठेवणे, फळांच्या नवीन जाती विकसित करणे आणि उत्पादन वाढवणे, फळे अधिक दिवस टिकावी हा संशोधनाचा उद्देश होता असेही त्यांनी सांगितले.
त्यांनी संशोधन केलेल्या प्रजाती मधील आंब्याचा केट प्रकारात साखरेचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामध्ये जवळजवळ 4.7 आजचे साखरेचे प्रमाण असून सोनारो या प्रजातीमध्ये 5.6 टक्के तर ग्लेन या प्रजाती मध्ये साखरेचे प्रमाण सहा टक्के इतके असून पाकिस्तानच्या बाजारात या आंब्याचे भाव दीडशे रुपये प्रति किलो इतका आहे.
माहिती स्त्रोत- मटा
Share your comments