1. फलोत्पादन

हिवाळा आला तोंडावर कशी घ्याल द्राक्षबागांची काळजी?

grape orchard

grape orchard

हिवाळा आता तोंडावर आला आहे. साधारणतः ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून आपल्याकडे थंडीचा जोर वाढायला लागतो.आणि नेमका हाच काळ ऑक्टोबरच्या सुरुवातीला किंवा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात छाटणी केलेल्या द्राक्ष बागांमध्ये मण्यांचा वाढीचा असतो. अशावेळी आपले सर्व लक्ष मन्यांच्या वाढीकडे असते.

 परंतु थंडीच्या काळामध्ये मण्यांची वाढ खूपच हळू होते व प्रकाशसंश्‍लेषण क्रियेचा वेग कमी झालेला असतो. त्यामुळे झाडाला आवश्यक अन्नपुरवठा होत नाही व मण्यांची वाढ खुंटते. असे बरेच समस्या थंडीमध्ये द्राक्षबागेत निर्माण होतात. या लेखात आपण थंडी मध्ये द्राक्ष बागेचे व्यवस्थापन कसे करावे, त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

 द्राक्ष बागेची थंडीत व्यवस्थापन

थंडीच्या कालावधीमध्ये पांढऱ्या मुळींची वाढ नियमित ठेवणे आवश्यक असते. पांढऱ्या मुलांच्या सतत वाढीसाठी पांढऱ्या मुळांच्या क्षेत्रात सतत वाफसा राहील याची काळजी घ्यावी. तसेच पाण्याचा ताण पडू न देता पाण्याचे योग्य प्रमाण राहिल्यास तापमान नियंत्रित राहते व पांढऱ्या मुळांची वाढ योग्य प्रकारे होते. अशावेळी आच्छादनाचा वापर करणे खूप महत्त्वाचे असते. जर पांढऱ्या मुळांची वाढ योग्य होत राहिल्यास द्राक्षवेली मध्ये सायटोकायनिन ची पातळी चांगली राहून त्यांच्या पानांच्या कार्यक्षमतेत अपेक्षित परिणाम दिसून येतो.

तसेच थंडीच्या कालावधीत अन्नद्रव्ये त्याचा मंदावलेला वेग वाढतो अन्न  पुरवठा सुरळीत होऊन मण्यांची वाढ होते. जर जमिनीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट चा वापर ठिबकद्वारे किंवा स्लरी मधुन केल्यास चांगला फायदा मिळतो. प्रकाश संश्लेषण आला आवश्यक असणारी रसायने वाढल्यामुळे अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला वेग प्राप्त होतो. तसेच अमिनो ऍसिड याची फवारणी केल्यास शर्करेचे वहन व तसेच इतर घटकात रूपांतर होण्याची प्रक्रिया यांचा वेग वाढू शकतो. कारण थंडीमध्ये पानातील तयार झालेली साखरेची वहन वेलीच्या इतर भागात होण्यासाठी प्रथिनांच्या रूपातील आवश्यक असणारी ऊर्जा कमी पडते.

सायटोकायनिनची पातळीहा प्रकाशसंश्‍लेषण वेग मर्यादित करणारा महत्त्वाचा घटक असतो.सी वीड्स एक्सट्रॅक्ट मध्ये काही प्रमाणामध्ये सायटोकायनिन आढळून येते. त्यामुळे त्याचा वापर फवारणीसाठी केल्यास हरितलवकांची  कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. फवारणी करताना दिलेल्या मात्रेत प्रमाण घ्यावे. तसेच कुठलीही फवारणी करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. कारण सी विड एक्सट्रॅक्ट मध्ये ऑक्सिन व सायटोकायनिन कोणते रसायन आहे याविषयी सविस्तर उल्लेख नसतो.

आच्छादनाचे महत्व

 द्राक्षाच्या बागेमध्ये पूर्ण जमिनीवर आच्छादन करणे शक्य होत नाही. त्यामुळे वेलीच्या ओळीमधील तीन ते चार फुटांच्या पट्ट्यामध्ये बांधावर आच्छादन केले जाते. मातीची धूप कमी करण्यासाठी दोन ओळींमधील जागेत आच्छादनाचा वापर उपयुक्त ठरतो. आच्छादनाची जाडी साधारणपणे दोन ते दहा इंच असते.ही प्रामुख्याने आच्छादनासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थाच्या घनते वर आणि उपलब्धतेवर अवलंबून असते. शेतीमधील काडीकचरा, पिके, गवत यांचा सहा ते आठ इंचापर्यंत व कोणत्याही प्रकारचा भुशाचा दोन इंच थर तयार करणे आवश्यक असते. सेंद्रिय आच्छादनाच्या बाबतीत दरवर्षी कमी झालेली आच्छादनाची उंची भरून काढणे आवश्‍यक असते.

 आच्छादनाचे फायदे

  • तणांची वाढ थांबूनउपलब्ध पाणी अन्नद्रव्यासाठी वेलीला तणांशी स्पर्धा करावी लागत नाही व उपलब्ध अन्नद्रव्याचा अधिक कार्यक्षमतेने वापर होतो.
  • वेलीची वाढ व उत्पादनामध्ये अनुकूलता दिसते. कुजणारे आच्छादन व अन्न घटकांमुळे वेलींचे पोषण चांगले होते.
  • आच्छादनासाठी जे पदार्थ वापरण्यात येतात त्यांचे कुजण्याची कार्य सुरू असते त्यामुळे उर्जेत वाढ होते.अशाप्रकारे मुळांच्या सान्निध्यातील तापमान कमी जास्त होत नाही. त्यामुळे द्राक्ष वेलीची मुळे कार्यशील राहतात व मण्यांच्या वाढीवर परिणाम होता त्यांची वाढ सुरू राहते.
  • शक्य असल्यास मण्यांच्या वाढीच्या काळात पाटाने एक दोन वेळा पाणी द्यावे. त्यामुळे तापमान संतुलित राहते व पांढऱ्या मुळ्या कार्यक्षम राहिल्याने अपेक्षित फायदे माहिती.( (संदर्भ- शेतकरी मासिक)

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters