संपूर्ण भारत देशात डाळिंब पिकाची लागवड केली जाते. राज्यातही डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. नाशिक जिल्ह्यात डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. डाळिंब फळाला बारामाही मागणी असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी चांगला मोठा नफा कमवितात. डाळिंब मध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने याचे सेवन मानवी शरीरासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते त्यामुळेच बारामाही डाळिंबाचे सेवन मोठ्या प्रमाणात होते म्हणून याला नेहमीच मागणी असल्याचे बघायला मिळते. डाळिंबाची शेती इतर पारंपरिक पिकांपेक्षा अधिक फायदेशीर असल्याने राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून डाळिंब शेतीचा विस्तार रोजाना वाढत आहे. डाळिंब शेतीसाठी सुरुवातीला कष्टांची पराकाष्ठा करावी लागते तसेच अतिरिक्त खर्च करावा लागतो मात्र दोन वर्षानंतर जेव्हा डाळिंब उत्पादनासाठी सज्ज होतो तेव्हापासून डाळिंब पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते राज्यातही अनेक डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा नफा दर हंगामातून प्राप्त केला आहे.
डाळिंब शेतीसाठी महाराष्ट्रातील वातावरण सर्वात अनुकूल असल्याचे सांगितले जाते, महाराष्ट्रासाठी डाळिंब शेती विशेष फायदेशीर बनत चालली आहे कारण की महाराष्ट्रात संपूर्ण शेती ही पावसावर अवलंबून आहे आणि डाळिंब पिकासाठी खूपच अत्यल्प प्रमाणात पाण्याची गरज भासत असते. भारतात सर्वात जास्त डाळिंबाची लागवड महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, तमिळनाडू आंध्र प्रदेश, हरियाणा या राज्यात बघायला मिळते. डाळिंबापासून सुमारे दोन वर्षात उत्पादन घेतले जाऊ शकते मात्र असे असले तरी कृषी वैज्ञानिक चार वर्षाच्या झाडाला उत्पादनासाठी योग्य असल्याचे सांगतात. डाळिंबाचे एक झाड सुमारे 25 वर्षापर्यंत जगते आणि 25 वर्षापर्यंत आपण त्यापासून उत्पन्न प्राप्त करू शकतो. आज आपण डाळिंब शेती विषयी नाहीतर डाळिंबाच्या प्रमुख जातीविषयी जाणून घेणार आहोत. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही माहिती अतिशय उपयुक्त ठरू शकते. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया डाळिंबाच्या प्रमुख जाती.
डाळिंबाच्या प्रमुख जाती
भगवा- भगवा या जातीला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या कळवण सटाणा मालेगाव देवळा या प्रदेशात शेंद्रा या नावाने ओळखले जाते. या जातीची फळे मोठ्या आकाराची व गुळगुळीत भगव्या रंगाची असतात म्हणून याला भगवा म्हणूनच संबोधले जाते.
ही जात खाण्यासाठी सर्वात चविष्ट असल्याचे डाळिंब उत्पादक शेतकरी कथन करतात. या जातीच्या डाळिंबाच्या बिया मऊ असतात. ही जात राजस्थान आणि महाराष्ट्रासाठी अतिशय योग्य मानली जाते. महाराष्ट्रातील वातावरण भगव्या जातीच्या डाळिंबासाठी अतिशय अनुकूल असल्याने नाशिक जिल्ह्यात या जातीच्या डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात नजरेस पडतात.
आरक्ता वाण- आरक्ता ही वान खाण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. आधी महाराष्ट्रात भारताचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असे, मात्र कालांतराने भगव्या जातीच्या डाळिंबाला अधिक बाजार भाव प्राप्त होत गेला आणि आरक्ता हे जणू नामशेष होण्याच्या मार्गावर आले. ही देखील एक चांगली उत्पादन देणारी जात आहे. या जातीची फळे मोठी, गोड आणि मऊ बिया असलेली असतात. साल आकर्षक लाल रंगाची असते. बिया मऊ असल्याने खाण्यासाठी या जातीची डाळिंबे चांगली असल्याचे सांगितले जाते.
मृदुला जाती- मृदुला जातीची फळे मध्यम आकाराची असतात. या जातीची देखील महाराष्ट्रात पूर्वी लागवड केली जात होती अजूनही महाराष्ट्रातील काही भागात मृदुला या जातीची डाळिंबे बघायला मिळतात. मात्र सध्या मृत्यूला जातीची डाळिंबी कमी प्रमाणात नजरेस पडत आहेत. या जातीच्या डाळिंबाचा गुळगुळीत पृष्ठभाग असतो. या जातीची डाळिंब गडद लाल रंगाची असतात. या जातीच्या डाळिंबाच्या बिया लाल रंगाच्या, मऊ, रसाळ आणि गोड असतात. या जातीच्या फळांचे सरासरी वजन 300 ग्रॅम पर्यंत असते. या जातीची फळे देखील खाण्यासाठी मधुर असतात. आता महाराष्ट्रात या जातीचे एवढे उत्पादन बघायला मिळत नाही मात्र थोड्या प्रमाणात अजूनही या डाळिंबाची झाडे महाराष्ट्रात बघायला मिळतात.
Share your comments