MFOI 2024 Road Show
  1. फलोत्पादन

सततचा पाऊस ठरला मारक ; यंदा डाळिंबाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटणार

सततच्या पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे केवळ २० टक्के क्षेत्रावरील बागाच उरल्या आहेत. उर्वरित ८० टक्के क्षेत्रातील डाळिंब बागांना फुलगळ, फळगळती, पाकळीकुज, तेलकट डाग रोग या सारख्या किड - रोगांच्या समस्यांनी घेरले आहे. त्यामुळे सुमारे ५० टक्क्यांनी उत्पादन घटणयाचा अंदाज आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


सततच्या पाऊस आणि वातावरणातील  बदलामुळे केवळ २० टक्के क्षेत्रावरील बागाच उरल्या आहेत. उर्वरित ८० टक्के  क्षेत्रातील  डाळिंब बागांना फुलगळ, फळगळती, पाकळीकुज, तेलकट डाग रोग या सारख्या  किड - रोगांच्या समस्यांनी घेरले आहे. त्यामुळे सुमारे ५० टक्क्यांनी उत्पादन  घटणयाचा अंदाज आहे. देशभरात जवळपास दीड लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर डाळिंब होते. कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातसह दहा  राज्यात डाळिंबाचे उत्पादन  होते. त्यात सर्वाधिक सव्वा लाख हेक्टर एकट्या महाराष्ट्रात आहे. मृग, हस्त आणि अंबिया असे तीन बहारात डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते.

मृग बहार जुलैअखेर, हस्तबहार सप्टेंबर अखेर आणि अंबिया बहार डिसेंबरपर्यंत अशा पद्धतीने डाळिंबाचे बहार नियोजन असते. त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक ६० हजार हेक्टर मृग बहार धरला जातो. यात बहरातील डाळिंब साधरण जानेवारीमध्ये निर्यातीसाठी तयार होते. निर्यातीचा टक्का तुलनेने कमी असला तरी स्थानिक बाजारपेठेत या बहारातील सर्वाधिक डाळिंब येते, पण यंदा एकूण मृग बहारातील ६० हजार हेक्टर आणि हस्त बहारातील २० हजार हेक्टरपैकी ८० टक्के क्षेत्रातवरील बागा अडचणीत आहेत. केवळ  २० टक्के क्षेत्रावरील बागाच चांगल्या स्थितीत आहेत. पण त्यांचीही उत्पादकता घटण्याची चिन्हे आहेत.

अति पावसामुळे होणार नुकसान

डाळिंबाचे योग्य व्यवस्थापन केले तर एकरी सर्वाधिक १२ ते १५ टनापर्यंत उत्पादन निघत असते. सरासरी  ८ ते १० टन उत्पादन  असते. पण यंदा सततचा पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे एकरी उत्पादकता किमान ५० टक्क्यांवरुन म्हणजे निम्म्यावर येण्याची शक्यता आहे. विशेषत: सर्वाधिक पाऊस झालेल्या सोलापूरसह सांगली , नाशिक या डाळिंब पट्ट्यात त्याची झळ अधिक बसली आहे.  दरम्यान यामुळे निर्यातीवरही परिणाम होणार आहे. यावर्षी मार्च अखेर लॉकडाऊनच्या आधी सुमारे ८० हजार टन डाळिंबाची युरोपीयन देशांना निर्यात झाली होती. गेल्यावर्षी २०१९ मध्ये ६० हजार आणि २०१८ मध्ये ७० हजार टनापर्यंत गेली होती. मात्र यावर्षी परिस्थिती तशी नाही, किमान ५ ते १० टक्के तरी निर्यात होईल का, याबाबत शंका आहे.

English Summary: Pomegranate production will decline by 50 per cent this year Published on: 08 October 2020, 03:18 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters