भारतात अलीकडे अनेक भागात शेतकरी फळबागांची लागवड करताना दिसत आहेत. त्यापैकी प्रमुख फळबाग आहे डाळिंब.
डाळिंब हे एक बागायती पीक आहे, जे एकदा लागवड केल्यावर अनेक वर्षे त्यापासून उत्पादन मिळत राहते. डाळिंब हे सर्वात आरोग्यदायी आणि पौष्टिक फळ मानले जाते. व्हिटॅमिन ए, सी, ई, फॉलिक ऍसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्स प्रामुख्याने डाळिंबामध्ये आढळतात.
जर तुम्हालाही डाळिंबाची बाग लावायची असेल तर काही गोष्टींची अगदी सुरुवातीपासूनच काळजी घ्यावी लागते. कारण अनेक वेळा शेतकरी फळबागा लावतात, पण माहितीच्या अभावामुळे कधीकधी त्यांना नुकसान सहन करावे लागते.
डाळिंब ही उप-उष्णकटिबंधीय हवामानात वाढणारे झाड आहे. अर्ध-शुष्क हवामानात डाळिंब चांगले पोसले जाते. फळाचा विकास होण्याच्यावेळी आणि फळ तयार होतात तेव्हा गरम आणि कोरडे हवामान असल्यास उत्पादन चांगले मिळते. फळांच्या विकासासाठी 38 ° से.तापमान उपयुक्त असते.
डाळिंब लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी रेताड माती उत्तम असल्याचे मानले जाते. फळांची क्वालिटी आणि रंग हा जड जमिनीपेक्षा हलके जमिनीत चांगला येतो.
डाळिंबाच्या प्रमुख जाती नेमक्या कोणत्या जाणुन घ्या
गणेश: या जातीची फळे मध्यम आकाराची असतात मऊ बिया आणि फळे गुलाबी रंगाची असतात. ही महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या प्रसिद्ध जातींपैकी एक आहे.
ज्योती: फळे मध्यम ते मोठ्या आकाराची असतात. त्यांची साल गुळगुळीत असते आणि फळे पिवळसर लाल रंगाची असतात. आत गुलाबी रंगाच्या बिया असतात, बिया खूपच मऊ आणि गोड असतात.
डाळिंबाच्या बागाची लागवड करण्यासाठी ऑगस्ट ते सप्टेंबर किंवा फेब्रुवारी ते मार्च हे महिने लागवडीसाठी सर्वात चांगले असल्याचे सांगितले जाते.
मृदुला: फळांची साल गुळगुळीत असते, आणि फळे मध्यम आकाराची व गडद लाल रंगाची असतात. बिया गडद लाल, मऊ, रसाळ आणि गोड असतात. या जातीच्या फळांचे सरासरी वजन 250-300 ग्रॅम पर्यंत असते.
भगवा: या जातीची फळे मोठ्या आकाराची, भगव्या रंगाची साल गुळगुळीत चमकदार असते. मधील भाग आकर्षक लाल रंगाचे असतात आणि बिया मऊ असतात. जर बागेचे व्यवस्थापन चांगले केले तर, प्रति झाड 30-40 किलो उत्पादन मिळू शकते. ही जात राजस्थान आणि महाराष्ट्रात जास्त प्रमाणात लावली जाते आणि तेथील हवामान ह्या जातीसाठी खूपच पोषक आहे. महाराष्ट्रातील खान्देश पश्चिम महाराष्ट्र, तसेच इतर प्रांतात याची लागवड मोठ्या प्रमाणात दिसते.
अरक्ता: ही जास्तीचे उत्पन्न देणारी वाण आहे. बिया गोड व मऊ असतात, फळे मोठी आकाराची असतात. आतील भाग लाल रंगाचा असतो आणि साल आकर्षक लाल रंगाची असते.
डाळिंबाचे व्यवस्थापन चांगले ठेवल्यास प्रति झाड 25-30 किलो उत्पन्न मिळू शकते.
कंधारी: ह्या जातींचे फळ मोठे आणि अधिक रसदार असते, पण बिया मात्र थोड्या कठीण असतात.
डाळींब बाग लावण्याची योग्य वेळ कोणती
डाळिंबाच्या बागाची लागवड करण्यासाठी ऑगस्ट ते सप्टेंबर किंवा फेब्रुवारी ते मार्च हे महिने लागवडीसाठी सर्वात चांगले असल्याचे सांगितले जाते.
Share your comments