सिताफळाची लागवड प्रामुख्याने आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तरप्रदेश व बिहार राज्यात केली जाते. महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) बीड, जळगांव, औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सातारा व भंडारा या जिल्हयात सिताफळाची झाडे मोठया प्रमाणावर दिसून येतात.
दौलताबाद व पुण्याची सिताफळे फारच स्वादिष्ट लागतात असा शेरा ब-याच चोखंदळ ग्राहकांकडून मिळतो. मराठवाडयातील धारुर व बालाघाट ही गावे सिताफळासाठी प्रसिध्द आहेत. विदर्भात पवनी, भंडारा, गोंदिया, वाशिम, माहूर, तर सातारा जिल्हयात शिरवळ, कवठे, जवेळे, वाल्हे आणि खंडाळा फलटण तालुक्यातील काही ठराविक भाग सिताफळाकरिता यशस्वी गवडीतून नावारूपाला येऊ लागलाआहे
लागवड
सिताफळाच्या लागवडीसाठी पावसाळयापूर्वी मे महिन्यात 0.60 बाय 0.60 बाय 0.60 मीटर आकाराचे खडडे जमिनीचा मगदुर पाहून घ्यावेत. 5 बाय 5 मिटर अंतरावर खडडे घ्यावेत. 5 बाय 5 मिटर अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी 400 झाडे बसतात. हेक्टरी खडडे पावसाळयापूर्वी शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट, पोयटा मातीसह भरावेत. थायमेट 10 जी बांगडी पध्दतीने वापरण्यात यावे. यासाठी हेक्टरी अर्धा टन शेणखत 200 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची आवश्यकता आहे
मनोहर पाटील जळगाव
Share your comments