शेतकरी आता शेतीची परंपरागत पिके देण्याचे सोडून नवनवीन पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. बरेच शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीचे पिके घेत असून, फळबाग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल सध्या भरपूर प्रमाणात वाढला आहे.
फळबागांच्या जर आपण विचार केला तर आपल्याकडील शेतकरी फळबागांमध्ये विविध फळझाडांची लागवड करतात. त्यामध्येप्रामुख्याने डाळिंब,द्राक्ष,पेरू, आंबा, सिताफळ इत्यादी भरपूरफळांची नावे सांगता येतील.
या फळ लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्न देखील चांगले मिळत आहे. अशाच एका फळाबद्दल आपण या लेखात माहिती घेणार असून, या फळाची लागवड तुम्ही वर्षातील बाराही महिने करू शकतात.
नक्की वाचा:खरीप पिकातील किड व्यवस्थापन करण्याकरिता पाच टक्के निंबोळी अर्क बनवा आणि वापर करा
या फळाची लागवड ठरेल शेतकऱ्यांसाठी फायद्याची
अननस खाण्याचे अनेक फायदे आहेत. भुक वाढवण्यासाठी आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी हे उपयुक्त आहे.
त्यामुळे बाजारात चांगला भाव मिळतो. सध्या फारच लोक अननसाची लागवड करतात, परंतु तुम्ही त्याच्या लागवडीतून चांगला नफा मिळवू शकता.
अनेक राज्यांमध्ये 12 महिने अननसाची लागवड केली जाते.अननस लागवडीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती वर्षातून अनेक वेळा करता येते.
इतर पिकांच्या तुलनेत अननसात नफा मिळविण्याच्या चांगल्या संधी आहेत. अननस हा उष्ण हवामानाचा क्षण मानला जातो. मात्र वर्षभर त्याची लागवड करता येते.
नक्की वाचा:पपई फळबागेला रोगांपासून वाचवायचे असेल तर 'या' आहेत हिट उपायोजना, नक्कीच होईल फायदा
2) अननस लागवड :- अननस ही एक कॅक्टस प्रजाती आहे.त्याची देखभाल देखील खूप सोपी आहे. या सोबतच हवामानाचे फारशी काळजी घेण्याची गरज नाही.
केरळ सारख्या अनेक राज्यांमध्ये शेतकरी केवळ 12 महिनेच लागवड करतात. याच्या झाडांना इतर झाडांच्या तुलनेत कमी सिंचन लागते. पेरणीपूर्वी फळे पिकण्यापर्यंत 18 ते 20 महिने लागतात. फळ पिकल्यावर त्याचा रंग लाल पिवळा होऊ लागतो. त्यानंतर त्याच्या काढणीचे काम सुरू होते.
3) तुम्ही किती कमवाल :- अननसाच्या झाडांना एकदाच फळ येते. म्हणजेच तुम्हाला अननस फक्त एकदाच भरपूर मिळू शकते. यानंतर दुसऱ्या लॉटसाठी पुन्हा पीक घ्याव लागतं.
अननस अनेक रोगांवर खाल्लं जातं. त्यामुळे बाजारात त्याची मागणी जास्त आहे. हे फळ बाजारात सुमारे 150 ते 200 रुपये किलो दराने विकले जाते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी एकरी 30 टन अननसाचे उत्पादन घेतल्यास लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.
नक्की वाचा:भारतात लावल्या जातात 'या'जास्त उत्पादन देणाऱ्या डाळिंबाचे जाती,शेतकऱ्यांसाठी आहेत उपयुक्त
Share your comments