
phyptothora disease
महाराष्ट्रातील कोकण विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात मोसंबी फळझाडांच्या क्षेत्र वाढीस वाव आहे.मराठवाड्यात मोसंबीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. मोसंबी लागवड सोयीची व कमी खर्चाची असून मराठवाड्यातील हवामान मोसंबी साठी योग्य आहे.तसेच खानदेश पट्ट्यातहीमोसंबीची लागवड वाढत आहे. या लेखात आपण मोसंबीवरील डिंक्याया रोग व त्याचे व्यवस्थापन याविषयी माहिती घेणारआहोत.
मोसंबी पिकावरील डिंक्या म्हणजेच फायटोप्थोरा रोगाचे व्यवस्थापन आणि लक्षणे
- रोपवाटिकेत रोपे कोलमडून पडतात कारण फायटोप्थोरा मुळे 20 टक्के रोपे रोपवाटिकेतच मरतात.
- रोपवाटिकेतील रोपांच्या मुळांना रोगाची लागण होऊन मुळे कुजतात आणि त्यामुळे झाडांची वाढ खुंटते.
- झाडाची पाने पिवळी पडतात आणि गळायला लागतात. नंतर रोपट्यांच्या खोडावर डिंक स्त्रवतो
- खोडावर लागण होताच सालीवर ठीपके दिसण्यास सुरुवात होते.जमिनीलगत झाडाच्या खोडाला रिंग पडतात.
- फायटोप्थोरा मुळे किंवा कॉर्टेक्स मधूनमुळ्याच्या आत शिरतो आणि मुळास प्रादुर्भाव झाल्यास ते कुजतात.रोगग्रस्त भागावरील सालं सुटते व खोडाचा भाग उघडा पडतो.
- प्रादुर्भावात खोड व फांद्यावरडिंकतयार होऊन स्त्रवतो. रोगाचे लक्षणे खोडावर व फांद्यांवर दिसून येतात. कधीकधी खोडावर स्त्रावामुळे तेलकट डाग दिसतात. डिंक असलेल्या सालीचा भाग गडद लाल होतो आणि नंतर तो वाळतो व सालीला उभ्या चिरा पडतात.
अशा पद्धतीने करा मोसंबी पिकावरील डिंक्या रोगाची व्यवस्थापन
- योग्य मशागतीचा अवलंब करणे- या रोगाची बुरशी जमिनीत राहत असल्यामुळे तिचा समूळ नायनाट करण्यास शकते. पण मशागत योग्य ते फेरफार केल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो.
- बुरशीनाशकाचा वापर- पावसाळ्याआधी व पावसाळ्यानंतर वर्षातून दोन वेळा बोर्डो पेस्ट खोडास जमिनीपासून तीन ते चार फूट उंचीपर्यंत लावावे. पेस्ट लावण्यापूर्वी मेटिलीकीझल किंवा कासेटील एल या बुरशीनाशकाचा मलम साल काढलेल्या जागेवर लावावा.
एक टक्के बोर्डो मिश्रणाच्या फवारणीसाठी एक किलो मोरचूद,एक किलो चुना, प्रति 100 लिटर पाण्याचे द्रावण जमिनीवर वगळलेल्या फळांवर फवारावे. झाडावर मेट्यालिकीझल2.5 ग्राम पती लिटर किंवा फोसिटेलअल2.5 ग्राम/ लिटर या प्रमाणात झाडांवर तसेच शेजारचीजमीन ओली होईपर्यंत फवारावे.
- रोगप्रतिकारक खुंटांचा वापर- रंगपूर लाइम या रोगास सहनशील आहेम्हणून या खुंटाचा वापर करावा.( संदर्भ- इंडिया ऍग्रो नेट.कॉम )
Share your comments