भविष्यात शेती करायची असेल तर प्रति एकर कमीतकमी 20 झाडे लावणे महत्त्वाचे आहे नाहीतर हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल. झाडाचे महत्व तर सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु या लेखांमध्ये आपण झाडं बाबतीत काही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊ.
झाडांचे वातावरणातील महत्व
- एक झाड पन्नास वर्षात 35 लाख रुपये किमतीचे वायुप्रदूषण टाळते.
- एक झाड 15 लाख रुपये किमतीचे ऑक्सीजन उत्पादन करते.
- एक झाड 40 लाख रुपये किमतीचे पाण्याचे रिसायकलिंग करते.
- एक झाड एका वर्षात तीन किलो कार्बन-डाय-ऑक्साईड चा नाश करते.
- एक परिपूर्ण झाड एक हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोग येते.
- एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान दोन अंशांनी कमी करते.
- एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते..
- एका झाडापासून एका कुटुंबासाठी लाकडीसामान तयार होते.
- एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्यांच्यावर त्यांच्या पंचवीस पिढी जन्माला येतात आणि मधमाशांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.
- एक झाड अठरा लाख रुपये किमतीची जमिनीची धूप थांबवते.
- एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्यापासून ते आराम खुर्ची पर्यंत तसेच म्हातारपणातील हातातील काठी पासून स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते.
- एक झाड आपल्या पालापाचोळ्याचे भर टाकून जमिनीचा कस वाढवते.
- एक झाड फळ, फुले व बिया आपल्यासाठी देते.
- एक झाड पन्नास वर्षात काय करतो आणि आपण माणूस काय करतो याचा लेखाजोखा आम्ही मुद्दामच मांडत आहोत जेणेकरून प्रत्येक माणूस याचा विचार करेल.
झाड नसेल तर
- तुमची मुले पाठीला ऑक्सीजन सिलेंडर लावून फिरताना कसे दिसतील याचा विचार करा.
- जगातील सर्व पैसा जरी एकत्र केला तरी आपण सहा महिने पुरेल एवढा ऑक्सिजन तयार करू शकत नाही.
- मग मित्रांनो तुम्ही आम्हाला एक सांगा की असं कुठलं स्त्रोत तुमच्याकडे आहे ज्या माध्यमातून आपण आपल्याला लागणारा ऑक्सिजन तयार करू शकतो.
- तासभर ऑक्सिजन विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो.
लेखक
जैविक शेतकरी
शरद केशवराव बोंडे
Share your comments