ड्रॅगन फ्रुट ची शेतीकमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी शेती आहे.सध्याचा काळ हा या फळाचा असून या फळाची लागवड मे आणि जून महिन्यामध्ये केली जाते आणि वर्षभरानंतर याच हंगामात कमी अधिक प्रमाणात उत्पादन यायला सुरुवात होते.
गेल्या काही वर्षापासून या फळांची मागणी वाढली असूनकोरोना कालावधीनंतर रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे फळ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.या लेखामध्ये आपण ड्रॅगन फ्रुटलागवड व आर्थिक गणित समजून घेऊ.
ड्रॅगन फ्रुट ची मागणी असण्याचे कारण
ड्रॅगन फ्रुट कॅक्टस कुटुंबातील वनस्पती असून त्याला स्ट्रॉबेरी नाशपाती असे देखील म्हणतात. या फळाचेदेठ रसाळ असून त्याचे फळ हलके गुलाबी असते. आतून ते सहसा पांढरे किंवा गुलाबी असते मात्र आता अनेक नवीन वाणाची लागवड केली जात आहे. या फळामध्ये अस्कॉर्बिक अॅसिड, फायबर, फेनोलिक अॅसिड,फ्लेवोनाइड्स आणि मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असतात. तसेच या फळावर प्रक्रिया करणाऱ्या अनेक कंपन्यानी प्रक्रिया उद्योग स्थापन केलेअसून त्यापासून आईस्क्रीम, ज्यूसयासारख्या अनेक उत्पादने तयार करतात.आता बहुतेक लोकांनी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी याचा वापर सुरू केला आहे.तसेच रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी,हेमोगलोबिनवाढविण्यासाठी तसेच निरोगी केसांसाठी,निरोगी त्वचेसाठी वजन कमी करण्यासाठी, कॅन्सरसारख्या दुर्धर आजार बरे करण्यासाठी याचा उपयोग होतो.
लागवड कधी व कशी करावी?
ड्रॅगन फ्रुट वाढवण्यासाठी बिया चांगल्या दर्जाच्या असाव्यात.कलम केलेले रोप असेल तर चांगले होईल.कारण त्याला वाढण्यास कमी वेळ लागतो. लागवड कालावधी हा एप्रिल ते जुलै दरम्यान असला तर उत्तम असते. काही कारणास्तव या हंगामामध्ये लागवड करता आली नाही तर दुसऱ्या हंगामात लागवड सुरू करता येते. यासाठी विशेष प्रकारच्या जमिनीची आवश्यकता नसते. फक्त पाणी असेल तरकोणत्याही जमिनीत हे पीक चांगले येते परंतु पाणी साचणार नाही अशी जमीन निवडू नये.लागवडीनंतर नियमित मशागत करणे गरजेचे असून महिन्यातून एकदा सिंचन आवश्यक आहे.त्यासाठी ठिबक सिंचन पद्धत उत्तम ठरते.ड्रॅगन फ्रुट ची झाडे वेली सारखे असतात त्यामुळे आधारासाठी शेतात सिमेंटचे खांब आवश्यक आहे.एका खांबास 3ते 4 झाडे लावता येतात.रोप जेव्हा वाढते तेव्हा त्याला दोरीने बांधले जाते व दीड वर्षानंतर रोप तयार होते. दुसऱ्या वर्षापासून फळे येण्यास सुरुवात होते तथापि तिसऱ्या वर्षापासून फळांचे चांगले उत्पादन होते. यासाठी तापमान दहा वर्षांपेक्षा कमी आणि चाळीस अंशांच्या दरम्यान असल्यास उत्पादन चांगलेहोते. चांगल्या उत्पादनासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे असून कंपोस्ट खत रोपांच्या मुळ्या जवळील जमिनीत चांगले मिसाळावे.
याचे प्रशिक्षण कुठे मिळते?
ड्रॅगन फ्रुट लागवडीचे प्रशिक्षण स्थानिक कृषी विज्ञान केंद्रातून घेतले जाऊ शकते. तसेच देशातील अनेक शहरांमध्ये असलेले इंडियन कौन्सिल ऑफ अग्रीकल्चर रिसर्च कडूनही प्रशिक्षण घेता येते.याशिवाय इंटरनेटच्या मदतीने ही माहिती गोळा करता येते.
वर्षाला सहज दहा लाख रुपये कमवू शकता
अगोदर शंभर ते दोनशे झाडांची लागवड करून लहानस्वरूपात सुरुवात करावी.यासाठी लागणाऱ्या आर्थिक बजेट बद्दल विचार केला तर सुरुवातीला एक लाख रुपये खर्च येतो.जेव्हा पीक तयार होते,फळे वाढू लागतात आणि बाजारात मागणी असते तेव्हा तुम्ही त्याची व्याप्ती वाढवू शकता. बाजारपेठेत स्थान मिळवणे हे सर्वात आव्हानात्मक काम असून ज्यांच्याकडे चांगले मार्केटिंग नेटवर्क आहे आणि मोठ्या शहरांमध्ये आणि सुपर मार्केटमध्ये प्रवेश आहे त्यांच्यासाठी हे फळ एक चांगली संधी आहे.एका एकर मध्ये तुम्ही दहा हजार झाडे लावू शकतात व वर्षाला दहा टन फळांचे उत्पादन होईल.याच्या मदतीने तुम्ही दहा लाख रुपयांपर्यंत मार्केटिंग करू शकतात.
ड्रॅगन फ्रुट लागवडीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदालागवड केली म्हणजे पुन्हा जास्त खर्च करावा लागत नाही.दरवर्षी केवळ देखभाल करावी लागते.ड्रॅगन फ्रुट च्या झाडाचे आयुष्य हे पंचवीस वर्षे आहे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:माहिती गरजेची! गावठाण विस्तार म्हणजे नेमके काय? वाचा आणि जाणून घ्या
Share your comments