1. फलोत्पादन

विश्लेषणात्मक: नवयुवकांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा व्यावसायिक व्हायला हवा

मित्रांनो आपला देश हा कृषिप्रधान देश आहे.या विधानाला कोणीही अमान्य करू शकत नाही. मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे. बाजारपेठ कितीही सजवली तरी उपयोग नाही.म्हणजे शेती आणि व्यवसायावर उपजिवीका करणारे लोक अर्थव्यवस्थेचा कणा आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
the agri

the agri

 मित्रांनो आपला देश हा कृषिप्रधान देश आहे.या विधानाला कोणीही अमान्य करू शकत नाही. मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे. बाजारपेठ कितीही सजवली तरी उपयोग नाही.म्हणजे शेती आणि व्यवसायावर उपजिवीका करणारे लोक अर्थव्यवस्थेचा कणा आहेत.

शेतीतील कमी उत्पन्न, कमी नफा, जमीन धारनेतीलघट या कारणांमुळे ग्रामीण भागातील युवक उदरनिर्वाहासाठी शेती नसलेल्या व्यवसायाकडे वळत आहेत. हे आपल्याला मान्य करावे लागेल.नवयुवक तुटपुंज्या नोकरीसाठी शहरांकडे धाव घेत आहेत. शेतीची आर्थिक आणि आजची शिक्षित, प्रगत, ग्रामीण तरुणाई शेतीकडे कसे पाहतात? शेतीतून मिळणारे उत्पन्न पुरेसे नसल्याचे सर्व शेतकऱ्यांनी आपले मत व्यक्त केले. शेती हा तोट्याचा व्यवसाय असल्याचे खूप शेतकऱ्यांमध्ये भावना आढळून आली. खूप शेतकऱ्यांना आपल्या मुलांना शेती या क्षेत्राकडे वाढवायचे नाही. शेती व्यतिरिक्त इतर व्यवसाय करण्यासाठी तयार आहेत.

आज शेतीची उपेक्षा होत आहे आणि त्यामुळे शेती फायद्याची कधीच ठरली नाही. परिणाम स्वरूप नवयुवक शेतीकडे आकर्षित होतच नाहीत. पूर्वी शेती हे तरुणांचे आकर्षण केंद्र होती परंतु आपल्या शेतकऱ्यांची मुले ही शेती कडे सध्या आकर्षित होत नाहीत. शक्ती हाच आपला पेशा असावा असे तरुणांना आता वाटतच नाही. शेतीशी संबंधित युवक शेतीपासून दूर गेल्याचे अनेक कारणे आहेत. एक फायदेशीर रोजगार म्हणून शेती आता तरुणांना आकर्षित करत नाही. शेती हेच करियर निवडून कष्ट करणाऱ्या तरुणांना त्यातून काहीही मिळत नाही.शेतकरी तरुणाशीलग्नासाठी मुली तयार नसतात.

इतकी शेती दुय्यम होत चालली आहे. त्यामुळे रोजगार म्हणून शेतीचा स्वीकार तरुणांनी करावा अशी स्थिती राहिलेली नाही. तरुणही रोजगारासाठी अन्य क्षेत्रांमध्ये जाण्यास प्रवृत्त होतात. या सर्व कारणांमुळे तरुणांना शेतीशी जोडण्याची कल्पना केवळ स्वप्नवत ठरेल, यात शंका नाही. आता आपल्या नवतरुणांना विचार बदलावे लागेल. शेती क्षेत्रामध्ये रोजगाराच्या प्रचंड शक्यता दडलेल्या आहेत. हे लक्षात घेतल्यास तरुणांमध्ये शेती बाबतची प्रतिमा मुळापासून बदलली जाऊ शकते.

 शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. आपल्याला हे क्षेत्र मजबूत करण्यासाठी अधिक भर दिला पाहिजे. सुधारित तंत्रज्ञान, सुधारित पद्धती इत्यादी गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. कृषी क्षेत्रात तरुणांचा सहभाग वाढावा असे खरोखर वाटत असेल तर त्यासाठी काही ठोस पावले उचलायला हवीत. सर्वप्रथम शेती क्षेत्राशी निगडीत तरुणांना शेतीला अनुसरून उद्योग करावे लागेल आणि त्यांना अन्यक्षेत्रांची  वाट धरावी लागणार नाही. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जेणे करून कृषी क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्यांना भविष्याची शाश्‍वती वाटू लागेल.

रोजगाराची निर्मिती करण्याचे काही अन्यही मार्ग उपलब्ध करावे लागते. कृषी तंत्र सुधारेल असे नव्हे तर शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च पदांवर सेवा करण्याचे स्वप्न साकार करता येईल. शेती आणि शेतकऱ्यांची सद्यस्थिती पाहता तरुणांना व्यावहारिक ज्ञान देऊ शकेल, असे बाजारधिष्टीत शिक्षण देण्याचीही गरज आहे. जमीन, पाणी या बरोबरच थोडी गुंतवणूक करून खाद्यपदार्थ निर्मिती करण्याचे प्रशिक्षण त्यांना द्यावे लागेल. शेतीवर अवलंबून राहू पाहणाऱ्या साठी शेती हा फायद्याचा व्यवसाय ठरावा.प्रत्येक तरुणाने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न उराशी बाळगले पाहिजे. आपल्या जगण्याचा मूलाधार असलेल्या शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास, आपल्याला प्रगतीच्या अनेक वाटा सापडतील हे निश्चित.

 लेखक..

 मिलिंद जि. गोदे

 युवा शेतकरी मित्र

English Summary: occupational attitude is very important in agriculture sector Published on: 10 January 2022, 05:43 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters