सेंद्रिय,रेसिड्यू फ्री, नैसर्गिक, जैविक, एकात्मिक व रासायनिक अशा सर्व शेती प्रकारांमध्ये वापरण्यात येणाऱ्या निंबोळी पावडर चे कार्य अनेक फायदे असून वापरण्यास सुरक्षित असे आहे.
सध्या रासायनिक निविष्ठांचा सुयोग्य पर्याय म्हणून निंबोळी पावडरचा मोठ्या प्रमाणात शेतकरी वापर करत आहेत. या लेखामध्ये आपण निंबोळी पावडर चे फायदे व कार्य जाणून घेऊ.
निंबोळी पावडर चे फायदे
- निंबोळी पावडर मध्ये ऑझाडिरेक्टींन घटक असल्यामुळे मातीमधील होमनी, खोडकीड,कटवर्म, वाळवी विषाणू बुरशी या रोगकिटका -रोगांचा ते नायनाट करते.
- निंबोळी पावडर हे संपूर्ण नैसर्गिक स्वरूपा मधील निंबोळी पावडर असल्याने जमिनीमधील कोणत्याही उपयुक्त जिवाणूंना हानी पोहोचत नाही.
- निंबोळी पावडर हे रासायनिक खतांमध्ये मिसळून वापरल्याने रासायनिक खतांची मधील नत्र टिकून राहते.
- निंबोळी पावडर पिकांचे सूक्ष्म कुरमी च्या , सूत्रकृमीच्या प्रादुर्भावावर 100% संरक्षण करते.
- निंबोळी पावडर महारोगाच्या प्रमाणामध्ये घट करते.
- निंबोळी पावडर च्या वापरामुळे जमिनी मधील मातेचे कण एकमेकांना चिटकत नाहीत. यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते.
- निंबोळी पावडर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. तसेच माती मधील ह्युमन चे प्रमाण वाढवून पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ होण्यास मदत होते.
- निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीचा सामू चांगला राखला जातो. परिणामी उत्पादन व गुणवत्ता वाढते.
- निंबोळी पावडर च्या वापराचे प्रमाण :
सर्व पिकांमध्ये वापरास योग्य असणारी हे निंबोळी पावडर एकरी 150 किलो ग्रॅम वापरण्याची शिफारस आहे.फळबागा मध्ये वापर करायचा असल्यास 200 ग्रॅम प्रति झाड (1 वर्ष ) याप्रमाणे यामध्ये चांगले कुजलेले शेणखत द्यावे.
सेंद्रिय, रेसिड्यूफ्री, नैसर्गिक, जैविक, एकात्मिक, रासायनिक इ. सर्व शेती प्रकारांमध्ये वापराकरता पूर्ण सुरक्षित आहे.
Share your comments