1. फलोत्पादन

वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी आमदार अमोल खताळ थेट मैदानात!

या माफियांमुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर झीज होते, शेतीचे नुकसान होते आणि बेफाम वाहनचालकांमुळे नागरिकांना दहशतीखाली जीवन जगावं लागत आहे.

MLA Amol Khatal News

MLA Amol Khatal News

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी शिवारातील तनपूरवाडी रस्त्यावर काल रात्री आमदार अमोल खताळ सामाजिक कार्यक्रमावरून परतत असताना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्वतः कारवाई केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर तालुक्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आमदारांनी प्रशासनाच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आमदार खताळ यांनी स्वतःचे वाहन थांबवत तात्काळ पोलिस प्रशासनाला पाचारण केले आणि संबंधित वाळू वाहतूक करणारी गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, "मला आमदार असूनही रस्त्यावर उतरून ही कारवाई करावी लागते, मग प्रशासन झोपलंय का? संगमनेरमध्ये काही भागांमध्ये अवैध वाळू माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. हे वाळू माफिया कोणाच्या छत्रछायेखाली काम करत आहेत हे सर्व तालुक्याला माहीत आहे. यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई केली जाईल, असा मी शब्द देतो."

ते पुढे म्हणाले, "या माफियांमुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर झीज होते, शेतीचे नुकसान होते आणि बेफाम वाहनचालकांमुळे नागरिकांना दहशतीखाली जीवन जगावं लागत आहे. प्रशासनातील काही घटक वाळू माफियांशी हातमिळवणी करून हा व्यवसाय चालवत आहेत. पण आता याला आळा बसेल, असा विश्वास मी जनतेला देतो."

ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी आमदारांच्या या धाडसी कृतीचे कौतुक केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला अवैध वाळू उपसा आमदार अमोल खताळ यांच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे थांबेल, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमध्ये उमटत आहे.

English Summary: MLA Amol Khatal directly in the field to stop the sand mafia Published on: 05 May 2025, 05:47 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters