सीताफळे कोरडवाहू तसेच डोंगराळ भागातील प्रमुख फळपीक म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, धुळे आणि बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिताफळाची लागवड झालेली आढळून येते. मराठवाड्यातील बालाघाटच्या डोंगर रांगांमध्ये सीताफळ हे नैसर्गिकरित्या वाढलेली दिसते
भविष्यात या दुर्लक्षित व विनाखर्च फळपिकांकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे. सहसा या फळ पिकावर किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव जास्त होत नाही. परंतु वातावरणातील बदलामुळे पिठ्या ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव दिसतो. या लेखामध्ये आपण सिताफळा वरील पिठ्या ढेकूण आणि फ्रुट बोररयाकिड विषयी माहिती आणि उपाय जाणून घेऊ.
- पिठ्या ढेकूण-ही कीड पाने,कोवळ्या फांद्या, कळ्या व कोवळी फळे यांच्यामधून रस शोषण करतात. त्यामुळे पानांचा व फळांचा आकार वेडावाकडा होतो. कळ्या व फळे गळतात. अशा फळांना बाजारभाव कमी मिळतो. या किडीचा प्रादुर्भाव पावसाळ्यानंतर जास्त आढळतो. या किडीच्या अंगातून स्रवणाऱ्या मदा सारखे चिकट पदार्थावर काळी बुरशी चढते. त्यामुळे झाडांची पाने काळी पडून प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते.
उपाय
- कीडग्रस्त फांद्या व पाने काढून त्यावर दहा टक्के कार्बारिल भुकटी टाकून ती गाडावीत.
- मिलीबग ला खाणारे परभक्षी कीटक क्रिप्टोलिमस माँटॉजरीप्रति एकरी 600 ग्रॅम या प्रमाणात 15 दिवसांच्या अंतराने तीन ते चार वेळा बागेत झाडावर सायंकाळच्या वेळेस सोडावेत भुंगेरे सोडल्यानंतर कोणत्याही प्रकारची कीटकनाशक बागेवरफवारू नये.
- फुले बगीसाईड हे जैविक बुरशीनाशक 40 ग्राम अधिक पन्नास ग्राम फिश ऑईल रोझीन सेफ्टी प्रति दहा लिटर पाण्यातूनआद्रता युक्त हवामानात फवारावी.
- मिली बगला मारकपण परभक्षी किटकांनाकमी हानिकारक डायक्लोरोहसकिंवा क्लोरोपायरीफॉस 25 मिली अधिक 25 ग्रॅम ओईल रोसिन सोप,बुप्रोफेझीन25 एसएससी 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून भुंगेरे सोडण्यापूर्वी फवारणी करावी.
फळ पोखरणारी पतंग( फ्रुट बोरर)
ही कीड दक्षिण भारतात अधून-मधून आढळते. या पतंगाचा डोके आणि खांद्याचा भाग हिरवा असतो.अळ्या बाहेर पडल्यानंतर या फळांमध्ये घुसतात. फुलांमध्ये व घुसतांना त्या वाकडातिकडा मार्ग तयार करतात.नंतर त्यातील गर खातात. त्यामुळे फळे खाली गळून पडतात. ही कीड ओळखण्याची खूण म्हणजे या किडीची विष्ठा फळावरील क्षेत्रावर जमा होते.
उपाय
- किडकी फळे वेचून नष्ट कराव्यात.
- झाडा जवळ खणून माती हलवून घ्यावी.
- दहा लिटर पाण्यात 40 ग्रॅम या प्रमाणात पाण्यात विरघळणारे पन्नास टक्के कार्बारिल फवारावे.
Share your comments