1. फलोत्पादन

मोसंबी फळा पिकावरील रोग व त्यांचे व्यवस्थापन

मोसंबी फळ पीक मुख्यत्वेकरून विदर्भ खानदेश च्या बऱ्याच भागात घेतली जाते. मोसंबी हे फळ पीक कमी खर्चात शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचे उत्पन्न देते. या लेखामध्ये आपण मोसंबी फळ पिकावरील रोग व त्यांचे व्यवस्थापन कसे करायचे याबद्दल माहिती घेणार आहोत. फळ काढणी पूर्वी देठ कूज मोसंबीची फळे चार ते पाच महिन्याची किंवा पक्वता अवस्थेत असताना हा रोग आढळतो. फळाच्या देठाजवळील भागांवर संसर्ग होऊन हा संसर्ग प्रदूषित भाग करडा तपकिरी रंगाचा होतो. फळ नारंगी रंगाचे होऊन त्यांची गळ होते. प्रसार काढलेली फळे व रोगग्रस्त फळे एकत्र साठवल्यास या रोगाचे जंतू कॉलेटोटायकम किंवा डिप्लोडिया काढणीपश्चाीत फळकूज म्हणून वेगाने पसरतो भरपूर आर्द्रता व उष्ण हवामानात रोगाचा प्रसार होतो. उपजीविका पावसाच्या थेंबा द्वारे फुलांवर किंवा फळांच्या देठाजवळ संसर्ग होतो. हवेमार्फत व कीटकांमार्फत सुद्धा रोगाचा प्रसार होता. उन्हाळ्यात रोगजंतू हे मेलेल्या फांद्या आणि झाडाच्या सालीवर उपजीविका करून मुख्य हंगामात म्हणजे आंबे बहारात प्रसार होतात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
sweet lemon

sweet lemon

 मोसंबी फळ पीक मुख्यत्वेकरून विदर्भ खानदेश च्या बऱ्याच भागात घेतली जाते. मोसंबी हे फळ पीक कमी खर्चात शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचे उत्पन्न देते. या लेखामध्ये आपण मोसंबी फळ पिकावरील रोग व त्यांचे व्यवस्थापन कसे करायचे याबद्दल माहिती घेणार आहोत.

 फळ काढणी पूर्वी देठ कूज

 मोसंबीची फळे चार ते पाच महिन्याची किंवा पक्वता अवस्थेत असताना हा रोग आढळतो. फळाच्या देठाजवळील भागांवर संसर्ग होऊन हा संसर्ग  प्रदूषित भाग करडा तपकिरी रंगाचा होतो. फळ नारंगी रंगाचे होऊन त्यांची गळ होते.

       प्रसार

 काढलेली फळे व रोगग्रस्त फळे एकत्र साठवल्यास या रोगाचे जंतू कॉलेटोटायकम किंवा डिप्लोडिया काढणीपश्‍चात फळकूज म्हणून वेगाने पसरतो भरपूर आर्द्रता व उष्ण हवामानात रोगाचा प्रसार होतो.

           उपजीविका

 पावसाच्या थेंबा द्वारे फुलांवर किंवा फळांच्या देठाजवळ संसर्ग होतो. हवेमार्फत व कीटकांमार्फत सुद्धा रोगाचा प्रसार होता. उन्हाळ्यात रोगजंतू हे मेलेल्या फांद्या आणि झाडाच्या सालीवर उपजीविका करून मुख्य हंगामात म्हणजे आंबे बहारात प्रसार होतात.

   व्यवस्थापन

 झाडातील मेलेल्या फांद्या छाटून त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावी. फळधारणेनंतर चार ते पाच महिन्यांनी किंवा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक 20 ग्रॅम मॅन्कोझेब दहा लिटर पाण्यात मिसळून रोगाच्या तीव्रतेनुसार तीन ते चार फवारण्या तीस दिवसांच्या अंतराने कराव्यात. काढणीनंतर फळकूज न होण्यासाठी 20 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड किंवा दहा ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात फळे दोन मिनिटे बुडवून नंतर सुकवावेत. छाटणीसाठी वापरलेली कात्री 15 मिली सोडियम हैपो क्लोराईड प्रति लिटर पाण्यातून निर्जंतुक करून घ्यावे. जमिनीवर पडलेली व झाडांवर असलेली रोगट फळे गोळा करून त्याची विल्हेवाट लावून बागेत स्वच्छता ठेवावी.

 मोसंबी फळ पिकावरील काही महत्वाचे रोग

     शेंडे मर

 अनेकविध प्रकारचे रोगजंतू, सुत्रकृमी, अन्नद्रव्यांची कमतरता, बागेत जास्त काळ पाणी साचणे या घटकांच्या परिणामामुळे शेंडे मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. जुन्या व दुर्लक्षित बागेत या व्याधीचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळते. नवीन व पक व फांद्या वरून खालपर्यंत सुकायला  सुरवात होते. त्यावर पांढरट वाढ होऊन बुरशीचे  काळसर ठिपके दिसू लागतात. कोलेटोट्रेकम बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर सुरुवातीला हिरवट काळसर ठिपके पडून नंतर पानगळ सुरू होते. फांद्यांची मर बुंद्या पर्यंत जाऊन डायबॅक ची लक्षणे दिसू लागतात. झाडाच्या पेशीमध्ये बुरशी निश्चल अवस्थेत वास्तव्य करते. अशा पेशी जेव्हा अशक्त होतात किंवा मरतात तेव्हा ही बुरशी सक्रीय होते.

   व्यवस्थापन

 जुन्या किंवा दुर्लक्षित बागेचे व्यवस्थापन सुधारावे. व्यवस्थापनात पुरेसे सिंचन, योग्य खतांची मात्रा, इतर किडी रोगांचे नियंत्रण महत्त्वाचे असते. पावसाळ्यापूर्वी व नंतर रोगग्रस्त फांद्या छाटून त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावी. तसेच आंबिया बहर घेताना प्रत्येक वेळेस झाडातील शेंडेमर ग्रस्त फांद्यांची छाटणी करून घ्यावी. छाटणीसाठी वापरलेली कात्री व अवजारे सोडियम हैपो क्लोराईड 15 मिली प्रति लिटर पाणी वापरून निर्जंतुक करून घ्यावे. झाडांवर दहा ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा 20 ग्रॅम मॅन्कोझेब किंवा 30 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून तीन ते चार फवारण्या केल्यास फायदा होतो.

         

   मोझक

 हा रोग सत गुडी मोसंबी, पण मेलो आणि संत्रा मध्ये सर्वसाधारणपणे आढळून येतो. बाधित झाडातील पानात अनियमितपणे पिवळे किंवा हलक्या हिरव्या रंगाचे चट्टे आळीपाळीने मात्र हिरवट भागांमध्ये दिसतात. पानांचा आकार कमी होऊन पानगळ सुरू होते. फळांमध्ये काही प्रमाणात पिवळे चट्टे आणि हिरवट भाग दिसून येतो. अशी फळे आकाराने लहान जन्मतात हा विषाणूजन्य रोग असून रोगट कलमांद्वारे या रोगाचा प्रसार होतो.

     व्यवस्थापन कसे करावे?

  • रोगमुक्त कलमांचा वापर लागवडीसाठी करावा.
  • छाटणीसाठी वापरलेली कात्री प्रत्येकवेळी सोडियम हैपो क्लोराईड च्या 15 मिली प्रति लिटर पाणी या द्रावणात बुडवून निर्जंतुक करावी.
  • रोग बाधित झाडे बागेतून काढून टाकावी.
English Summary: management of sweet lemon Published on: 15 June 2021, 01:25 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters