महाराष्ट्र मध्ये गेल्या दशकापासून डाळींब एक महत्त्वाचे नगदी पीक बनले आहे. नगर, नाशिक, पुणे,सांगली,सातारा एखादी जिल्ह्यांमध्ये डाळिंब मोठ्या प्रमाणात पिकवली जाते. डाळिंबाला बाजारपेठेत योग्य दर मिळावा यासाठी डाळिंबाच्या काढणीपश्चात डाळिंब पिकाची प्रतवारी व साठवणूक योग्य पद्धतीने करणे फार महत्त्वाचे असते.या लेखात आपण डाळिंबाची प्रतवारी, साठवणूक आणि पॅकिंग याबद्दल माहिती घेणार आहोत.
डाळींबाचे प्रतवारी, साठवणूक आणि पॅकिंग
डाळिंबाच्या फळांची पक्वता-
- फळधारणा पासून फळ तयार होण्यास जातीपरत्वे 135 ते 170 दिवस लागतात.
- पक्व झालेल्या डाळिंब फळाच्या शेंड्याकडील पाकळ्या कडकहोऊन पूर्णपणे वाळतात.
- उन्हाळ्यामध्ये फळाच्या सालीचा रंग पक्वतेच्या वेळी गर्द पिवळा होतो तर पावसाळ्यात तो गर्द तांबडा होतो.
- पक्व झालेल्या फळाचा गोलसर पणा कमी होतो तसेच फळाच्या बाजूंवर चपटे पणा येतो.
- पक्व झालेल्या डाळींब फळाचा दाण्यांचा रंग गडद तांबडा होतो. फळे मऊ, लुसलुशीत व चवीला गोड असतात.
डाळिंब पिकाच्या साईजचे प्रकार
- सुपरसाइज- आकर्षक लालभडक रंगाची आकाराने सर्वात मोठी आणि वजनाने साडेसातशे ग्रॅमपेक्षा जास्त असलेली व डाग नसलेली फळे या प्रकारात येतात.
- किंग साइज- डाग नसलेली, आकर्षक रंगाची व मोठी तसेच वजन 500 ते 750 ग्रॅम पर्यंत असलेली फळेया प्रकारात येतात.
- क्वीनसाइज-यामध्ये 400 ते 500 ग्रॅमपर्यंत वजनाची मोठीआकर्षक रंगाची, डाग नसलेल्या फळांचा समावेश होतो.
- प्रिन्स- या साईजच्या फळांचे वजन 300 ते 400 ग्रॅम असते.
डाळिंब पेटीमध्ये भरताना घ्यायची काळजी
पेट्यांची निवड व फळांची प्रतवारी झाल्यानंतर पेट्या भरताना प्रथम पेटीच्या तळाशी कागदाचे तुकडे ठेवावे. त्यावर प्रतवारी केलेली फळे ठेवावीत. त्यानंतर त्यावर लाल रंगाचा आकर्षक कागद लावून तीझाकावीत. पेटी बंद केल्यावर पुन्हा चिकटपट्टीने पेट्या चिटकवून घ्यावे.
अशा तर्हेने भरलेल्या दहा ते बारापेट्या एकावर एक रचून त्यांचा एक गठ्ठा तयार करावा.यालाच पॅलेट्सअसे म्हणतात.
डाळिंब फळांची साठवण
कोल्ड स्टोरेज मध्ये आठ अंश सेल्सिअस तापमान आणि 90 टक्के आद्रता ठेवावी.या वातावरणामध्ये फळे तीन महिन्यांपर्यंत उत्तम तऱ्हेने साठवून ठेवता येतात. कोल्ड स्टोरेज मधील तापमान 22 ते 25 अंश सेल्सिअस आणि 80% आद्रता ठेवली असता फळे 48 दिवसउत्तम तऱ्हेने साठवता येतात.फळांची काढणी झाल्यानंतर फळे लवकरात लवकर बाजारात पाठवणे गरजेचे असते. फळांची वाहतूक वातानुकुलीत व शीतगृहाची सोय असणाऱ्या ट्रक व रेल्वे वॅगन मधून केल्यास नुकसान टाळता येते.
Share your comments