संत्रा पिकांमध्ये मृग बहार धरण्यासाठी एप्रिल-मे महिन्यामध्ये बागेचे पाणी देणे थांबवले जाते व पानगळ करून झाडांना ताण दिला जातो. संत्रा पिकांमध्ये मृग बहार घेण्यासाठी विद्यापीठे किंवा राष्ट्रीय लिंबूवर्गीय पिक संशोधन केंद्र इ. च्या शिफारशीनुसार अन्नद्रव्य व खत व्यवस्थापन केल्यानंतर साधारणत: सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये संत्रा फळांचा आकारमान वाढून फळांचा रंग पक्त्वेच्यावेळी पिवळसर होण्यास सुरुवात होताना दिसत असते. आणि सर्वाधिक फळांची गळ सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या वेळी पहावयास मिळते. या फळगळतीचे महत्वाचे कारण असते रस शोषक पतंगाचा (Fruit Piercing Moths) वाढता प्रादुर्भाव. साधारणत:10-15% सरासरी फळगळीचे प्रमाण संत्रा पिकांमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये या किडीच्या प्रादुर्भावामुळे होते.
रस शोषक पंतग (Fruit Sucking/Piercing Moths) किडीची ओळख:
संत्रा रस शोषक पतंगाचे वेगवेगळ्या प्रजाती आहे. त्यामुळे प्रामुख्याने नुकसान करणाऱ्या ओथोरीस फुलोनिया आणि ओथोरीस मॅटेर्ना आणि ओयोरीस होमीना इ. प्रजातींची नुकसान क्षमता सर्वाधिक आहे. संत्रा फळ रस शोषक पतंग शरीराने मोठ्या व मजबूत आकारचा असतो. पतंगाच्या पंखाचा विस्तार साधारणत:1 सें. मी. पर्यंत आढळतो. पतंगाच्या पुढच्या पंखाच्या जोडीचा रंग मुख्यत्वे: तपकिरी, क्रीम किंवा हिरवा आढळतो. आणि मागील पंख जोडीचा रंग साधारणत: पिवळसर, नारंगी असतो आणि पंखाच्या जोडीवर काळसर डाग व पट्टे आढळतात.
संत्रा रस शोषक पतंग अळीची ओळख:
साधारणत: या किडीची अळी वेलवेटी (चमकदार) काळ्या रंगाची असते. शरीरावर साधारणत: पुढील भागावर दोन ठळक ठिपके असतात (पांढरे ठिपके आणि ठिपक्याचा मध्यभाग काळ्या रंगाचा)
नुकसान क्षमता:
रस शोषक पतंग कीड संत्रा पिकामध्ये रात्रीच्या वेळी (प्रामुख्याने 10 ते 11) प्रादुर्भाव करत असतो. पतंग सोंडेच्या सहाय्याने फळांमधील रस शोषून होत असते. पतंगाच्या प्रादुर्भाव फळ पक्वतेच्या वेळी सर्वाधिक आढळतो. पतंगाने सोंड खुपसल्याच्या ठिकाणी फळाला छिद्र पडते. आणि त्या ठिकाणी बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोग काराकांचा शिरकाव होऊन फळ सड आढळून येते व फळाची गळ मोठ्या प्रमाणात होते.
संत्रा फळ रस शोषक पतंगाचे नियंत्रण:
संत्रा फळ शोषक पतंगाचे नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करावा लागतो.
- संत्रा रस शोषक पतंग किडीसाठी संत्रा पिकाच्या व्यतिरिक्त असलेल्या यजमान गवतांचा नाश करावा. (यजमान गवत मुक्त बाग) उदा. भिर, बाऊची इ. यजमान गवतावर हि कीड राहते.
- फळ पक्वतेच्या वेळी बागेच्या चार हि कोपऱ्यामध्ये तसेच मध्यभागी एक मर्क्युरी प्रकाशाचे दिवे लावावेत. आणि दिव्यांच्याखाली पसरट भांड्यामध्ये केरोसीन ओतून ठेवावे.
- पक्वतेच्या वेळी शक्य असल्यास फळांना (पेपर) कागदाने झाकून टाकावे.
- फळ हिरव्या रंगामधून पिवळसर रंगामध्ये रुपांतर होत असताना 10-15 दिवसाच्या अंतराने फळ तोडणी होईपर्यंत निंबोळी तेल (निम ऑईल) 10 मिली प्रती लिटर पाण्यामधून फवारणी करावी.
- साधारणत: सायंकाळीच्या वेळी २ तासासाठी बागेच्या बांधावर गवत पेटवून धूर करावा.
- निम ऑईल पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी केल्यानंतर देखील प्रादुर्भाव दिसत असल्यास प्रादुर्भाव दिसताच फेनप्रोपॅथीन (5%) फोक्झीम (25%) इ.सी. (मेओथ्रिन) 2 मिली/ ली. पाण्यातून फवारणी करावी.
नोंद: मेओथ्रिनचे घटक फेनाप्रोपॅथीन 50% आणि फोक्झीम 25% इ.सी. आहे.
डॉ. साबळे पी. ए
(शास्त्रज्ञ, उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र, खेडब्रम्हा, साबरकंथा, गुजरात)
8408035772
डॉ. सुषमा सोनपुरे
(आचार्य पदवी विद्यार्थिनी, कृषिविद्या विभाग, म. फु. कृ. वि. राहुरी)
Share your comments