फळ छाटणीनंतर सात ते दहा दिवसाचा कालावधी फार महत्वाचा असतो.या काळामध्ये प्रामुख्याने घड जिरण्याची समस्या दिसून येते. अशा बागेत जर कॅनॉपी वाढली असेल तर फळकूज समस्या देखील दिसून येते. त्यासाठी लक्षणे ओळखून वेळीच उपाय योजना कराव्यात. या लेखात आपण द्राक्ष बागेतील घड जिरणेव फळकूज या प्रमुख समस्या विषयी माहिती घेणार आहोत.
घड जिरणे-
- फळछाटणीनंतरसात ते दहा दिवसांचा कालावधी महत्त्वाचा असून या अवस्थेला पोंगा अवस्था असे म्हणतात.या कालावधीत घड जिरण्याची समस्या आढळून येते.
- या कालावधीमध्ये जर पाऊस झाला आणि मुळातील परिसरात पाणी जमा झाले तर मुळांचे कार्य करण्याची क्षमता कमी होते. याच मुळाद्वारे सायटोकायनिन उत्पादन होऊन वरवेलीस पुरवठा केला जातो.या वेलीमध्ये जर सायटोकायनिन जास्त असेल तरच वाढ नियंत्रणात राहते.
- रूट टिपच्या मागील भागामध्ये असलेल्या मुळीच्या काही भागांमधून अन्नद्रव्य ओढून घेण्याची क्षमता असते. परंतु मुळांच्या भोवती पाणी जमा असल्यास वेलीच नत्राचा पुरवठा शक्य होतनाही.अशा परिस्थितीमध्ये जेव्हा वातावरणात जास्त प्रमाणात आर्द्रता असते. त्यावेळी पानांद्वारे हवेतून नत्र उचलले जाते.वेलीमध्ये वाढ होण्यास मदत करते. जेव्हा सायटोकायनिन याचे उत्पादन कमी होते तेव्हाजिबरेलिन वाढते.म्हणजेच शेंडा वाढ जास्त प्रमाणात होते. परिणामी संजीवकांचे वेलीमध्ये संतुलन बिघडते व घड जिरण्याची समस्या निर्माण होते.
यावर उपाय योजना
- मुळांच्या भोवती वातावरण कोरडे राहील याची काळजी घ्यावी.
- पाऊस झाला असल्यास 6 बीए( 10 पीपीएम) ची फवारणी करावी. जेणेकरून पोटात असलेल्या डोळ्यांमध्ये संजीवकांचे संतुलन राहते.
- डोळा फुटत असताना पोटॅश एक ते दीड ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- काही बुरशीनाशके ज्यांचा कमी प्रमाणात वापर केल्यास वेलीमध्ये जी ए थ्री ची पातळीकमी करण्यास मदत करते. यासाठी टेट्राकोण्याझोल0.7 मिली प्रति लिटर किंवा मायक्लोबुटानील 0.4 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात वापर करून रोग नियंत्रण व वाढ नियंत्रण शक्य होईल.
फळकुज
- ज्या बागेत फळ छाटणी होऊन आता प्रीब्लूम अवस्था आहे,अशा बागेत जर कॅनोपी वाढली असेल तर फळकुजीसमस्या जास्त प्रमाणात दिसून येते.वाढत्या आद्रतेचे मध्ये डाऊनी मिल्ड्यू चा प्रादुर्भाव दिसतो. लवकर फळ छाटणी झालेल्या बागांमध्ये प्रीब्लूम अवस्थेतजेव्हा पाऊस पडला असेल आणि अचानक आद्रता वाढली असल्यास जिवाणूजन्य करपा रोगाची समस्या दिसते.
- नाजूक घडावर जेव्हा पाऊस पडतो त्यावेळी फुलांचा दांडा सडतो,त्यानंतर कुज सुरू होते. या वातावरणात बागेमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.या कालावधीमध्ये आपण बुरशीनाशकांची फवारणी करत असतो.त्यामुळेसुद्धा पान तसेच घडावर तान दिसतो.त्याच सोबत वेलीवर या विपरीत परिस्थिती मुळे ताण बसतो. पुन्हा कूस होण्यास किंवा घडजळल्यासारखा दिसण्यास सुरुवात होते. कोवळ्या फुटींवर पावसाळी वातावरणातअँथ्रॅकनोजचा प्रादुर्भाव दिसून येतो.
उपाययोजना
- सुरुवातीच्या काळात करपा नियंत्रणाकरिता राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणीचे उपाय करावे.
- जर बागेत जास्त प्रमाणात आर्द्रता असल्यास ट्रायकोडर्मा पाच मिलीप्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करता येईल. परंतु कॉपर युक्त बुरशीनाशकाची फवारणी यावेळी टाळावे. जैविक नियंत्रणाचा वापर केला जातो तेव्हा बागेत कॅनोपी वर दोन ते तीन फवारण्या लागोपाठ घ्याव्यात.जमिनीतून सुद्धा ठिबक सिंचनाद्वारे उपलब्ध केल्यास त्याचे परिणाम चांगले मिळतील.
- कॅनोपी मोकळी राहील याची काळजी घ्यावी. कारण बागेमध्ये रोगांची मुख्य समस्या म्हणजे दाट कॅनॉपी हीच असते.
Share your comments