नारळ बागेतील किडींमध्ये इरिओफाईड कोळी हि एक किड आहे तिचा प्रादुर्भाव प्रामुख्याने फळावर होताना दिसतो त्यासंबंधीची कारणे, लक्षणे आणि उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती पाहूया.
लक्षणे:
नारळावर इरिओफाइड कोळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असल्याने कोळीच्या प्रादुर्भावामुळे नारळ फळाच्या देठाखालच्या भागात पांढरट, पिवळे, त्रिकोणी चट्टे दिसून येतात व नंतर चट्टे वाढत जाऊन त्रिकोणी आकाराचे होतात. प्रादुर्भित भागावरील फळांचे आवरण तडकते परिणामी नारळ लहान राहतात तसेच लहान फळांची गळ होते.
नियंत्रण:
किडीच्या नियंत्रणासाठी 5 टक्के कडूनिंबयुक्त (अॅझाडीराकटीन) कीटकनाशक ७.५ मि.ली. समप्रमाणात पाण्यात मिसळून मुळाद्वारे देण्यात यावे. औषध दिल्यानंतर ४५ दिवसापर्यंत नारळ काढू नयेत. याशिवाय नारळावर कडूनिंबयुक्त कीटकनाशक (निमझोल) ४ मि.ली. प्रती लीटर पाण्यातून नारळाच्या घडावर पडेल अशी फवारणी करावी. फवारणी करण्यापूर्वी या सर्व किडग्रस्त व तयार नारळ काढून घ्यावेत. पडलेले फळे, फुलोरा गोळा करून नष्ट करावेत.
अधिक माहितीसाठी संपर्क
पिक संरक्षण तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सिंधुदुर्ग
9423300762
Share your comments