1. फलोत्पादन

Gauvha Orcherd: पेरू पिकातील कीड आणि त्यांचे व्यवस्थापन

पेरू पिकाला गरिबांचे फळ तसेच उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील सफरचंद असे म्हटले जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने पेरूची लागवड अहमदनगर, पुणे,नाशिक,सातारा,औरंगाबाद,भंडारा आणि जळगाव या जिल्ह्यात प्रामुख्याने केली जाते. पेरू फळावर प्रक्रिया करून जॅम,जेली,रस,सरबत आणि आइस्क्रीम हे पदार्थ तयार करतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
gauvha orcherd

gauvha orcherd

 पेरू पिकाला गरिबांचे फळ तसेच उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील सफरचंद असे म्हटले जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने पेरूची लागवड अहमदनगर, पुणे,नाशिक,सातारा,औरंगाबाद,भंडारा आणि जळगाव या जिल्ह्यात प्रामुख्याने केली जाते. पेरू फळावर प्रक्रिया करून जॅम,जेली,रस,सरबत आणि आइस्क्रीम हे पदार्थ तयार करतात.

परंतु या महत्त्वाच्या अशा फळपिकावर 70 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त किडींची नोंद झालेली आढळते. यामध्ये फळमाशी,साल पोखरणारी अळी, पिठ्या ढेकूण आणि स्पायरेलिंग पांढरी माशी या किडी  आर्थिक नुकसान करणारे आहेत. या लेखात आपण पेरू फळ पिकावरील प्रमुख किडी आणि त्यांचे नियंत्रण या बद्दल माहिती घेऊ.

 पेरू पिकातील प्रमुख कीड आणि त्यांचे व्यवस्थापन

  • फळमाशी- भुरकट तपकिरी रंगाची, परमार इ सारखे असून पाठीवर पिंक रंगाच्या खुणा असतात.फळमाशी फळाच्या पृष्ठभागावर अंडी घालते.पाय नसलेल्या आळ्या फळाच्या आत शिरून आतील गर खातात. त्यामुळे फळे सडतात व गळून पडतात.जास्त आद्रता व मध्यम तापमान किडीचा प्रादुर्भाव पोषक आहे.

नियंत्रण

 झाडाखाली पडलेली फुले, फळे वेचून नष्ट करावीत.बाग स्वच्छ ठेवावी. फुले येण्याच्या आणि फळधारणेच्या वेळी सापापर मेग्रीन चार मिली किंवा फल्युव्हालीनेटपाच मिली किंवा फेंन्थओन 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात. आंबे बहराची फळे काढून टाकावेत.बागेमध्येकामगंध सापळे हेक्‍टरी पाच या प्रमाणात लावून फळमाशी नष्ट करावे.

  • साल पोखरणारी आळी- यावेळी फिकट रंगाचे असून रात्री सालीच्या आत शिरून आतील भाग पोखरते व नंतर साल खाते.या किडीचा उपद्रव  झालेल्या खोडावर छिद्रे आढळून येतात. साल पोखरलेल्या ठिकाणी आळीची जाळीदार दाणेदार विस्टा आढळते. उपद्रव जास्त असल्यास फांद्या अथवा झाडे वाळून जातात.

नियंत्रण

तारछिद्रामध्ये टोचून आळी चा नाश करावा. आळी ने झाडावर केलेली छिद्रे शोधून त्यात एडीसिटी मिश्रण किंवा पेट्रोल ड्रॉपरणे अशा कापसाच्या बोळ्याने घालून ओल्या मातीने बंद करावीत. कीड दिसून येताच क्विनोलफॉस 20 मिली किंवा फेनकेलेरेट20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

  • पिठ्या ढेकूण-पिठ्या ढेकूण मोठ्या प्रमाणात पेरू फळपिकावरआढळतो.पिठ्या ढेकूण कोवळी पाने,फुलांवर आणि फांद्यातील रस शोषून घेतात.कीडीच्या शरीरातून मधासारखा निघणाऱ्या पदार्थावर बुरशी वाढते आणि त्यामुळे पेरूच्या फळांची प्रत आणि उत्पादन घटते.

नियंत्रण

व्हर्टीसिलीएम लेकेणी 20 मिलीप्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात 10 ते 12 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. जैविक कीड नियंत्रणासाठी क्रीपोलिमास मान्योनीवारी च्या 1500 किंवा भुंगेरे प्रतिहेक्‍टरी सोडावे. झाडाच्या बुंध्यावर ग्रीस था लेप लावावा.

4-स्पायरीलिंग पांढरी माशी- पांढरी माशी पेक्षा आकाराने थोडी मोठी असते. पानाच्या खालच्या बाजूस पिले व माशा पानातील रस शोषतात.परिणामी पाने पिवळी पडून गळतात.झाडाच्या वाढीवर परिणाम होतो.पिलांच्या शरीरातून चिकट द्रव्य पाझरून काळा बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो.

English Summary: insect management is gauvha orchared and related insecticide sprey Published on: 07 December 2021, 02:00 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters