फळबाग लागवड करायचे ठरवले असेल तर त्यामध्ये सगळ्यात अगोदर महत्त्वाचा मुद्दा येतो. जातिवंत कलमांची निवड व रोपांचा पुरवठा हा होय. फळझाडांची जर किफायतशीर लागवड करायची असेल तर त्यामध्ये रोपवाटिकेचे भरपूर महत्त्व आहे.
रोपांचा व कलमांचा जातिवंत पना तपासून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या लेखामध्ये आपण फळझाडांच्या कलमांची निवड कशी करायची याबाबत जाणून घेणार आहोत.
- कलमे /रोपांची निवड कशी करावी?
- फळबाग लागवडीसाठी कलमांची निवड करताना ती जातिवंत चांगल्या प्रतीची, दर्जेदार, कीड व रोगमुक्त असावीत
- कलमेनिवडताना ते कणखर निवडावे.
- निवडलेल्या कलमांच्या जातीला भरपूर फळे असावीतव त्यांना बाजारात चांगली मागणी असायला हवी.
- कलमे एक वर्ष वयाची मध्यम वाढीचीआणि 60 ते 75 सेंटिमीटर असावीत.
- कलम केलेल्या रोपांमध्ये खुट व कलम काडीची जाडी सारखी असावीत जोड एक झालेला असावा.
- फळझाडांची कलम किंवा भरलेले डोळे जमिनीपासून वीस सेंटीमीटर पेक्षा ऊंच नसावेत.
- कलमांना व छाट्याना भरपूर मुळे असाव्यात व कलमांच्या फांद्या, पानांची वाढ समतोल व निरोगी असावी.
- कलमांची खरेदी करताना कृषी विद्यापीठाचे रोपवाटिका, शासकीय रोपवाटिका किंवा परवानाधारक शासन मान्य रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत.
- लागवडीसाठी आवश्यक असणाऱ्या रोपांच्या संख्येपेक्षा 15 टक्के रोपे जास्त खरेदी करावीत. व अशी रोपे नांगे भरणे किंवारोपे मर झालेल्या ठिकाणी लावण्यासाठी उपयोग येतात.
- ऊती संवर्धनाचे रोपे निवडतांना रोपांची पुरेशी हर्डनिंग केलेली असावी.
- शेंडे कलम/पाचर कलमरोपाच्या खुंटावरील फूट काढलेले असावे.
Share your comments