आजकाल शिक्षण झालेले लोकही शेतीत कल दाखवत आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांना यामध्ये आवड आणि पैसेही भेटतात. परंतु अशा लोकांचे लक्ष सेंद्रिय शेतीवर असते। यातील काही पिके अशीही आहेत की ती उगवून तुम्ही काही वर्षांत करोडपती होऊ शकता.
यानुसार तुम्ही करोडपती होणार:-
हा आंबा विकत घेणे किंवा या आंब्याची शेती करणे हे सर्वसाधारण कोण करू शकत नाही. हिंदुस्तान टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 2020 मध्ये मियाझाकी आंब्याची किंमत 2.70 लाख रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली होती. जपानमध्ये पिकवलेली ही खास जात मध्य प्रदेशातील एका शेतकऱ्याने आपल्या बागेत तयार केली आहे. जबलपूरमध्ये त्याचे मोठे उत्पादन झाले आहे. आंब्याच्या झाडाला मोहोर येण्याबरोबरच त्याच्या सुरक्षेसाठी लाखो रुपये खर्च करावे लागले ही वेगळी बाब आहे. परंतु एकदा की उत्पन्न सुरू झाले की तुम्ही काही कालावधीमध्ये करोडपती होणार आहात.
आंब्याची बाग -
तुम्ही आंब्याची बाग लावून करोडपती होऊ शकता. आंब्याच्या या विशिष्ट जातीच्या लागवडीत दोन-चार जणांनी आपले नशीब आजमवले आहे. हा आंबा भारतीय नसून जपानचा आहे ज्याला 'मियाझाकी' असे म्हणतात. हा आंबा जगभरातील देशांमध्ये निर्यात करण्यापूर्वी त्याच्या वैयक्तिक फळाच्या गुणवत्तेचे मूल्यमापन केले जाते.
अशी बाग तयार करा:-
तुमच्या शेतात काही खास व्यवस्था करून तुम्ही ही वाण तुमच्या बागेतही लावू शकता. या जातीच्या आंब्यासाठी भरपूर पावसाची गरज आहे. विशेष म्हणजे या जातीच्या उत्पादनासाठी उन्हाळ्यात दीर्घकाळ सूर्यप्रकाशही आवश्यक असतोमियाझाकी आंब्याची गणना जगातील सर्वात महाग फळांमध्ये केली जाते. सध्या बांगलादेश, इंडोनेशिया, फिलीपिन्स तसेच अजून काही देशांमध्ये त्याची लागवड केली जाते. जो पर्यंत हे झाड पूर्ण आकार होत नाही तो पर्यंत या झाडांची खूप काळजी घ्यावी लागते. या प्रकारे बाग तयार झाल्यानंतर त्यास फळधारणा सुद्धा चांगल्या प्रमाणत लागते शिवाय या फळांच्या किमती सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहेत.
Share your comments