भारतातील काही फळ झाडांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. बरीच फळझाडे (Fruit trees) कमी कालावधीत उत्पादनाला येतात. कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारी पिके शेतकऱ्यांना परडवतात व शेतकरी कमी खर्चात लागवड कशी करता येईल याकडे लक्ष केंद्रित करतो व चांगली पिके घेतो. ज्या जमिनीची खोली 30 ते 45 सें. मी. असते, अशा जमिनीत बोर, सीताफळ, काजू या पिकांची लागवड करावी. परंतु 7.5 सें. मी. पेक्षा कमी खोल जमिनीत कोणतीही फळझाडे लावू नयेत. आता तुम्ही कमी खर्चात फळबागा उभारू शकता ते कसे आपण फळझाडांबद्दल जाणून घेऊया पाहूया सविस्तर.
फळपिके लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असावा.
भारतातील कमी खर्चात अधिक वेगाने वाढणारी व काही महिन्यात फळे देणारी फळझाडे पाहुया.
1) पपई –
पपई हे फळ झाड वेगाने वाढते. खर्चही खूप कमी लागतो. लागवडीनंतर काही महिन्यात उत्पादनाला सुरुवात होते. महाराष्ट्रात प्रामुख्याने पपई फळ झाडांची लागवड केली जाते. अगदी 9 ते 11 या कालावधीत कापणीला येतात. हे फळ पूर्ण पिवळे होण्याआधी तोडावे.
2) पेरू –
बियाण्यांमधून पेरूची लागवड केली तर खूप हळू वेगाने वाढतात व फळेही उशिरा येतात. हिच लागवड कलम केलेल्या पेरूची झाडे लावून केली तर 8 ते 9 महिन्यात फळे तोडायला येतात.
3) अंजीर –
या फळ झाडाची कापणी 2 ते 3 वर्षात केली जाते. हे फळ लोह आणि अँटीऑक्सिडंट्सने प्रसिद्ध आहे. यव फळाच्या आत रसाळ कंद आणि कुरकुरीत बिया असतात. लोहाची कमतरता, लो शुगर,रक्तदाब यावर उपयुक्त असते.
4) मनुका –
कापनी 2 ते 3 वर्षात होते. या झाडाची फळे गोल, आयताकृती असतात. रसाळ व चवीला थोडे आंबट असतात. फळे वेगवेगळ्या वेळी पिकू शकतात. सुरुवातीला ते हिरव्या रंगाचे असतात आणि पिकल्यावर ते लाल रंगात बदलतात.
जमिनीच्या खोलीनुसार फळपिकांची निवड करावी. ज्या जमिनीची खोली 30 ते 45 सें. मी. असते, अशा जमिनीत बोर, सीताफळ, काजू या पिकांची लागवड करावी. परंतु 7.5 सें. मी. पेक्षा कमी खोल जमिनीत कोणतीही फळझाडे लावू नयेत.
1) मध्यम खोल जमिनीत 45 ते 90 सें. मी. पेरू, डाळिंब, अंजीर, पपई ही फळझाडे लावावीत.
2) आंबा, चिकू, चिंच, जांभूळ, लिंबूवर्गीय फळझाडांना एक मीटरपेक्षा जास्त खोलीच्या जमिनी लागतात.
3) फळबागेसाठी जमीन शक्यतो सपाट असावी. जमिनीचा उतार 2 किंवा 3 टक्क्यांपेक्षा अधिक नसावा. ज्या जमिनीचा उतार 15 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्या ठिकाणी टप्पे करून ठिबक सिंचन पद्धत वापरून फळपिकांची लागवड करावी.
4) जमिनीचा उतार दक्षिण-पश्चिम दिशेला असल्यास फळझाडांसाठी चांगले असते. कारण अशा ठिकाणी हवा उष्ण व कोरडी राहते.
5) जमीन निवडल्यानंतर जमिनीची मशागत करून घ्यावी. मातीचा प्रातिनिधिक नमुना घेऊन तपासणी करावी. त्यानुसार खतांचे नियोजन करावे.
6) पूर्वमशागतीची कामे झाल्यानंतर एप्रिल - मेमध्ये फळझाडांच्या लागवड अंतराच्या शिफारशीनुसार योग्य लांबी, रुंदीचे खड्डे घेऊन हे खड्डे पोयटा माती, पालापाचोळा, शेणखत, जैविक खते, ट्रायकोडर्मा, सिंगल सुपर फॉस्फेट, शिफारशीत कीडनाशक पावडर यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत.
7) फळबाग लागवडीसाठी खड्डे काढण्यापूर्वी कोणत्या लागवड पद्धतीने लागवड करावयाची आहे, यानुसार खड्डे खोदून घ्यावेत. प्रत्येक पद्धतीत दोन झाडांतील अंतर आणि दोन ओळींतल्या अंतराप्रमाणे खड्डे काढावेत.
Share your comments