1. फलोत्पादन

फळबाग लागवडीमध्ये महत्वाचे आहे कलमांची निवड व महत्त्वाच्या जाती

फळबाग लागवड करायचे ठरवले असेल तर त्यामध्ये सगळ्यात अगोदर महत्त्वाचा मुद्दा येत होतो जातिवंत कलमांची निवड व रोपांचा पुरवठा हा होय. फळझाडांची जर किफायतशीर लागवड करायचे असेल तर त्यामध्ये रोपवाटिकेचे भरपूर महत्त्व आहे

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
grafting

grafting

फळबाग लागवड करायचे ठरवले असेल तर त्यामध्ये सगळ्यात अगोदर महत्त्वाचा मुद्दा येत होतो जातिवंत कलमांची निवड व रोपांचा पुरवठा हा होय. फळझाडांची जर किफायतशीर लागवड करायचे असेल तर त्यामध्ये रोपवाटिकेचे भरपूर महत्त्व आहे

 रोपांचा व कलमांचा जातिवंतपणा तपासून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.या लेखामध्ये आपण फळझाडांची कलमांची निवड कशी करायची याबाबत माहिती घेणार आहोत.

कलमे/रोपांची निवड कशी करावी?

  • फळबाग लागवडीसाठी कलमांची निवड करताना ती जातिवंत चांगल्या प्रतीचे,दर्जेदार,कीड व रोगमुक्त असावीत.
  • कलमे निवडताना ती कणखर निवडावी.
  • निवडलेल्या कलमांच्या जातीला भरपूर फळे असावीत व त्यांना बाजारात चांगली मागणी असायला हवी.
  • कलमे एक वर्षे वयाची मध्यम वाडीची आणि 60 ते 75 सेंटिमीटर उंच असावीत.
  • कलम केलेल्या रोपांमध्ये खुट व कलम काडीची जाडी सारखी असावीव जोड एकजीव झालेला असावा.
  • फळ झाडांची कलम किंवा भरलेले डोळे जमिनीपासून वीस सेंटीमीटर पेक्षा उंच नसावेत.
  • कलमांना व छाट्यांना भरपूर मुळे असाव्यातव कलमांच्या फांद्या,पानांची वाढ समतोल व निरोगी असावी.
  • कलमांची खरेदी करताना कृषी विद्यापीठाचे रोपवाटिका, शासकीय रोपवाटिका किंवा परवानाधारक  शासनमान्य रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत.
  • लागवडीसाठी आवश्‍यक असणाऱ्या रोपांच्या संख्येपेक्षा 15 टक्के जास्त रोपे खरेदी करावीत व अशी रोपे नांगे भरणे किंवा रोपे मर झालेल्या ठिकाणी  लावण्यासाठी उपयोग येतात.
  • ऊती संवर्धनाचे रोपे निवडताना रोपांना पुरेशी हर्डनिंग केलेली असावी.
  • शेंडे कलम /पाचर कलम रोपाच्या खुंटावरील फूट काढलेले असावे.
English Summary: in fruit cultivation importance of plant grafting and selection of plant in nursury Published on: 15 October 2021, 02:08 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters