करवंद या फळाचे झाड कोणत्याही पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनी मध्ये चांगल्या प्रकारे वाढते. करवंदाचे पीक मुरमाड तसेच कातळ असलेल्या व हलक्या जमिनीत देखील चांगल्या प्रकारे येते.
जर आपण करवंदाच्या जातींचा विचार केला तर या फळाच्या आणि गराच्या रंगावरून ठरविल्या जातात. या लेखात आपण करवंद लागवडीविषयी थोडक्यात जाणून घेऊ.
करवंद लागवड
जर तुम्हाला करवंद लागवड करायची असेल तर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण करवंद बोल्डही नवीन जात प्रसारित केली असून या जातीचे फळांचे वैशिष्ट्य म्हणजे फळे आकाराने मोठी असतात व घोसाने लागतात. तसेच फळांची प्रत देखील उत्कृष्ट असते. फळे गोलाकार असून यामध्ये गराचे प्रमाण 92 टक्के असते. तसेच या जातीची फळे टिकायला देखील चांगली असतात.
.या जातीच्या फळांचा रंग काळा असून या जातीच्या कच्च्या व पक्व फळांपासून विविध प्रक्रिया केलेले टिकाऊ पदार्थ तयार करता येतात. करवंदाची लागवड कुंपणासाठीकरताना दोन रोपातील अंतर नव्वद ते दीडशे सेंटिमीटर ठेवावे. जर सलग लागवड करायची असेल तर तीन ते चार सेंटीमीटर अंतरावर कलमे लावून लागवड करावी. लागवड केल्यानंतर कलमांना आधार द्यावा व लागवडीसाठी एप्रिल किंवा मे महिन्यात 45 बाय 45 बाय 45 सेंटी मीटर आकाराचे खड्डे खोदून घ्यावेत व त्यामध्ये चांगली माती,चांगले कुजलेले शेणखत( प्रति खड्डा दोन किलो ) दोनशे ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट मिसळून पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर भरून ठेवावे.
कलमांची लागवड केल्यानंतर हिवाळ्यामध्ये 15 दिवसांच्या अंतराने उन्हाळ्यात आठवड्याच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या लागवडीच्या पहिल्या वर्षी द्याव्यात. म्हणजेच कलमांची वाढ जोमदार होते व कलमांचे मरण्याचे प्रमाण कमी होते.
Share your comments