कमी खर्च आणि जास्त नफा यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अंजीर लागवडीकडे वळत आहेत. बरेच शेतकरी आता पारंपरिक पिकांऐवजी नगदी पिकांच्या लागवडीकडे वळताना दिसत आहेत.त्यातल्या त्यात औषधी वनस्पतींची लागवडशेतकऱ्यांच्या पसंतीस उतरतांनादिसत आहे
महाराष्ट्रामध्ये व्यापारी दृष्टिकोनातून ओंजल पिकाची लागवड केली जाते. पुणे जिल्ह्यात अंजीर लागवडीखालील क्षेत्र 312 हेक्टर आहे.अंजीर पिके हवामानाला जास्त संवेदनशील असून हवामानात थोडाजरी बदल झाला तरी अंजीर पिकावर त्याचा परिणाम दिसून येतो. थंडीच्या दिवसात पिकाचे योग्य व्यवस्थापन करणे फार गरजेचे असते.हिवाळ्यात झाडाची, फळांची वाढ पूर्णपणे होत नाही.या लेखात आपण अंजीर फळ बागेची हिवाळ्यात काळजी कशी घ्यावी हे बघणार आहोत.
हिवाळ्यात अशी घ्या अंजीर फळ बागेची काळजी
- अंजीर बागेत वारा प्रतिबंधासाठी पश्चिम व उत्तरेस मलबेरी, शेवगा, जांभूळ आणि निरगुडी इत्यादी पिके लावावीत.
- जमिनीलगतच्या हवेचे उष्ण तापमान थोडे वाढावे यासाठी तसेच अंजिर बागेवर थंडीचा परिणाम होऊ नये यासाठी बागेस विहिरीचे, पाटाचे पाणी द्यावे.
- बागेचे तापमान वाढावे यासाठी बागेत रात्री जागोजागी शेकोटी पेटवली. जेणेकरून धुराचे दाट आवरण तयार होईल.
- गवत, कडबा, पाचट तसेच तुराट्या, पॉलिथिन छप्पर लहान लावलेली कलमे, रोपवाटिका रोपे व कलमे यावर तयार करावे.
- जास्त प्रमाणात थंडी असल्यास 200 ते 300 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति झाड याप्रमाणे जमिनीतून द्यावे. जेणेकरून फळगळती थांबेल.
- पोटॅशियम नायट्रेट चे कमी तीव्रतेचे द्रावण झाडांना दिल्यास काटकपणा वाढू शकतो.
- अंजिराचे झाड निरोगी असल्यास ते थंडी सहन करु शकते त्यामुळे अंजीर पिकाची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
Share your comments