अंजीर या फळाला इतर फळापेक्षा पौष्टिक फळ मानले जाते. अंजीर हे फळ पित्त विरोधी आणि रक्त शुद्ध करणारे फळ आहे. अंजीर ची लागवड अमेरिका, भारत तसेच आफ्रिकासह अनेक देशांमध्ये केली जाते. अंजीरचे फळ ताजे तसेच सुकलेले असते. अंजीरचे फळ पिकल्यानंतर त्याचा मुरंबा तयार करून वापरला जातो. अंजीर चे फळ समशीतोष्ण तसेच कोरड्या वातावरणात वाढते.भारतात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश राज्यातील काही भागात अंजीर ची लागवड केली जाते.अंजीर लागवड केल्यापासून चार ते पाच वर्षानंतर त्यास १५ किलो फळे मिळतात. अंजीर जर पूर्णपणे परिपक्व झाले तर एकाच वेळी आपल्याला १२ हजार रुपये नफा मिळवून देते.
महाराष्ट्रात अशाप्रकारे लागवड :-
महाराष्ट्र राज्यात अंजीर ची लागवड व्यावसायिक दृष्टीने केली जाते. महाराष्ट्र राज्यात एकूण ४१७ एकर क्षेत्रात अंजीर ची लागवड केली जाते त्यापैकी ३१२ एकर पेक्षा जास्तच क्षेत्र एकट्या पुणे जिल्ह्यात घेतले जाते.सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर नीरा नदीचे जे खोरे आहे त्यामधील खेड शिवापूर पासून ते जेजुरी पर्यंत म्हणजेच १० - १२ गावांचे क्षेत्रात अंजीर चे उत्पादन घेतले जाते. अलीकडच्या काळात सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सुद्धा अंजीर ची लागवड केली जात आहे.
हेही वाचा:या ११ आंब्याच्या जातीपासून होणार लाखोंची कमाई
दुष्काळी भाग अंजीर साठी पोषक वातावरण ठरले जायचे. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अंजीर हे खूप पौष्टिक फळ आहे. ताजे अंजीर असेल तर त्यामध्ये २८ टक्के पर्यंत साखर असते.अंजीर या फळाला सर्वात मौल्यवान फळ यामुळे मानले जाते कारण ते फळ टॉनिक, पित्तविरोधी आणि रक्तशुद्धी रोधक आहे तसेच दम्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे.
कोणत्या हंगामात अंजीर घेता येते?
अंजीर फळाला कोरडे आणि उष्ण हवामान चांगले उपयुक्त ठरते त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील मोठ्या मोठ्या भागात हे फळ पिकवले जाते.अंजीर फळाला कमी तापमान हनिकारक नाही मात्र दमट हवामान अंजीर फळाला धोकादायक असते. सर्वात विशेष बाब म्हणजे कमी पावसाच्या भागात अंजीर फळ पिकवले जाते.
अंजीर लागवडीसाठी जमीन काय असावी?
काळ्या मध्यम तसेच लाल मातीत अंजीर फळ पिकवले जाते. खारट काळ्या मातीमध्ये अंजीर ची वाढ चांगल्या प्रमाणात वाढते. अंजीर पिकासाठी खूपच काळी माती अयोग्य असते.
कोणत्या आहेत प्रगत जाती :-
काबुल, सिमरन, कडोटा, कालिमिर्ना, मार्सेलस आणि व्हाईट सॅन पेट्रो हे अंजीर चे प्रकार आहेत.
Share your comments