सध्या तरुण मंडळी ची शेती मध्ये येत आहे. ते सगळेजण परंपरागत पिके सोडून आधुनिक पद्धतीने नवनवीन पिके घेण्याकडे त्यांचा भर आहे. जर आपण पाहिले तर तरूणाईचा भर हा शेतीमध्ये फळबाग लागवडीकडे जास्त आहे.
परंतु फळबाग लागवड करताना कोणत्या पिकाची निवड कराल हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासोबतच निवड केलेले फळपिके आपल्या जमिनीत येईल का? याचाही विचार करावा. कारण वेगवेगळ्या फळ पिकांच्या बाबतीत काही वेगळे तंत्र असतात. या तंत्राचा अवलंब करणे तितकेच महत्त्वाचे असते. या लेखामध्ये आपण द्राक्ष लागवड जर करायची असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.ते पाहणार आहोत.
द्राक्ष बाग लागवड करायची असेल तर या गोष्टींचा अभ्यास महत्त्वाचा……
फळबाग लागवडीमध्ये द्राक्ष यांची निवड का महत्वाची?-
जर तुम्ही द्राक्ष बाग लागवड करण्याचा विचार केला असेल तर या गोष्टी तुमच्या फायद्याचे ठरू शकतात.
- द्राक्ष बागांचे लागवड केल्यानंतर दीड वर्षात पहिली पीक येते
- जर द्राक्ष बागा चा विचार केला तर कमीतकमी दहा वर्षांपर्यंत एक चांगले उत्पन्न मिळू शकते.
- तसेच मजुरांच्या हाताला देखील वर्षभर काम मिळते. कारण द्राक्षबागेत वर्षभर काम असतं.
- आपल्या जवळ असलेली जमीन, पाणी आणि उपलब्ध मनुष्यबळ यांचा चांगल्या पद्धतीने मेळ घालता येतो.
- द्राक्ष बाग ही एक प्रतिष्ठित पणाची तसेच अभ्यासूपनाची देखील एक सूचक आहे.
द्राक्ष बागाचे लागवड किती क्षेत्रात करावी?
या मध्ये लागवड करण्याआधी आपली एकूण जमीन किती आहे? पक्की बागायत आहे का? इत्यादी गोष्टींचा विचार करणे खूप महत्त्वाचे असते. द्राक्ष बागेची लागवड करताना 34/37/42/46 गुंठे असे आडणीड क्षेत्र निवडू नका.
द्राक्ष बाग कोणत्या ठिकाणी लावावी?
जर आपली जमीन एका ठिकाणी नसूनदोन ते तीन ठिकाणी असेल तर एकाच कुठल्यातरी ठिकाणाची निवड करणे अपेक्षित असते. जमिनीची निवड करताना त्या जमिनीचे क्षेत्र, तिचा सुपीकपना, त्या जमिनीला असलेल्या पाणीपुरवठ्याची साधनांची सोय, वाहतुकीसाठी रस्ता इत्यादी बाबींचा विचार करणे खूपच महत्त्वाचे असते.
कोणत्या वेळी द्राक्ष बाग लावावी?
द्राक्ष बागेची लागवड तुम्ही कधीही करू शकतात. काही अपवाद वगळता मध्य ऑक्टोबर ते जानेवारी च्या मध्याततुम्ही लागवड करू शकतात. जर लागवड करताना डिसेंबर जानेवारीत केली तर अधिक यशस्वी होते पहिले पीक पंधरा महिन्याच्या आत हातात येऊ शकते.
द्राक्ष बाग लावताना द्राक्ष जात कोणती निवडावी?
ज्या जाती प्रचलित आहेत त्या मधून निवड करणेही उत्तम असते. नवीन द्राक्ष बाग लागवड करताना नवीन,पहिल्यांदा माहीत असलेली द्राक्ष जात लावू नये.प्रचलित जातींपैकी थॉमसन सीडलेस, सोनाका,माणिक चमन,शरद सीडलेस इत्यादी जातींची निवड महत्त्वाची ठरते.
द्राक्षांची लागवड किती अंतरावर करावी?
द्राक्षांची लागवड करताना दोन ओळीत आठ फूट व दोन वेलीत सहा फूट अंतर असणे आवश्यक आहे. रूट स्टॉक वापरायचा असेल तर दोन ओळीत बारा फूट आणि दोन वेलीत आठ फूट अंतर ठेवावे.
लागवडी खड्डे खोदून करावी की चरात करावी?
द्राक्ष लागवडीसाठी खड्डे पेक्षाचरांची निवड करणे फायद्याचे असते.चर पद्धती सर्व प्रकारच्या जमिनीसाठी उपयुक्त आहे.चरा चे माप ठरवताना तुमचा जमिनीचा प्रकार कसा आहे यावर ते अवलंबून असते.चराची रुंदी दोन फूट व खोली अडीच फूट किंवा रुंदी अडीच फूट व खोली दोन फूट ठेवावे. तसेच तुमचा जमिनीचा उतार कसा आहे त्यानुसार लांबी ठरवावे. साधारणतः चराची लांबी शंभर फुटांपेक्षा जास्त असू नये.
चरात कोणती खते भरावीत?
यासाठी तुमचा जमिनीचा पोत कसा आहे व तुमच्या माती परीक्षण अहवाल यांचा विचार करावा. जर खतांचा विचार केला तर चांगले कुजलेले कंपोस्ट खत 12 टन, जिवाणू युक्त सेंद्रिय खते पाचशे ते एक हजार किलो, कडू पेंड पाचशे ते एक हजार किलो त्यासोबतच हिरवळीचे खत एका एकरातील एका एकरासाठी वापरावे.
Share your comments