शेतीमध्ये(farming) होणारे नवनवीन बदल, उत्पादन पद्धती तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे शेतीमध्ये अनेक आधुनिक बदल घडत आहेत.रब्बी आणि खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपेक्षा शेतकरी वर्गाचा फळबागेवर जास्त कल वाढत चालला आहे. कारण फलबागांमधून वर्षोनुवर्षे उच्च उत्पन्न मिळत असते. यामुळे बरेच लोक आपल्या शेतामध्ये डाळिंब, पपई, अंजीर, केळी इत्यादी फळबागांची लागवड करत आहेत.
गोड अंजीर आणि आंबट अंजीर असे 2 प्रकार:
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा अंजीर शेतीसाठी प्रसिध्द आहे. या तालुक्यातील गुरोळी गावचे गणेश चंद्रकांत जाधव यांनी आपल्या 12 एकर क्षेत्रात अंजीर, डाळिंब, पेरू इत्यादी फळबागांची लागवड केली आहे. परंतु त्यांचा जास्त भर हा अंजीर शेती वर आहे. त्यांनी 2 एकर क्षेत्रात राजेवाडी अंजीर या वाणाच्या अंजिराची लागवड केली आहे. या मध्ये गोड अंजीर आणि आंबट अंजीर असे 2 प्रकार आहेत.
अंजीर शेती व्यवस्थापन:-
1) एक एकर क्षेत्रामध्ये 15 बाय 15 फुटांवर 200 झाडांची लागवड करावी.
2)खट्टा हंगाम घेण्यासाठी झाडांची जून महिन्यात छाटणी करावी. छाटणी केल्यानंतर 3 ते 4 महिन्यात उत्पादनाला सुरवात होते.
3)छाटणी झाल्यानंतर प्रत्येक झाडाला 15 किलो शेणखत आणि 1 किलो रासायनिक खताचा डोस द्यावा.
4)तांबेरा रोगापासून झाडाचे संरक्षण करावे.
5)मिठा हंगामात उत्पादन घेण्यासाठी ऑगस्ट मध्ये रोपांची छाटणी करावी. त्यानंतर उत्पादनाची सुरवात ही जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये होते.
अंजीर ची विक्री ही पॅकेट मधून किंवा करंडीमधून केली जाते. महाराष्ट्र राज्यातून हैदराबाद, अहमदाबाद या ठिकाणी अंजिराची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच बाजारात अंजीराला मागणी असल्यामुळे भाव सुद्धा खूप जास्त आहेत.मुंबई मध्ये 3 किलो वजनाचा अंजिराच्या बॉक्स ची किंमत ही 300 रुपये आहे. पुण्यामध्ये एका क्रेड ची किंमत 500 ते 900 रुपये आहे. तसेच हैदराबाद आणि अहमदाबाद येथे 400 रुपयांचे पॅकेट ची किंमत 50 ते 60 रुपये एवढी आहे.अंजीर शेतीचे उत्पन्न:-अंजीर शेतीमधून दर एकरी उत्पन्न 2 ते 3 लाख रुपयांपर्यंत मिळवू शकतो. तोडणीच्या काळात एका झाडाला कमीत कमी 40 किलो ते 50 किलो अंजिराचे उत्पन्न मिळते.
Share your comments