महाराष्ट्रातील शेतकरी आता जास्त प्रमाणात फळबाग लागवडीकडे वळत आहेत.महाराष्ट्रातील फळबागांची उतरण पाहिले तर विभागनिहाय दिसून येते. उदाहरणच द्यायचे झाले तर नाशिक जिल्ह्यामध्ये डाळिंब आणि द्राक्ष,जळगाव जिल्हा म्हटले म्हणजे केळी आणि विदर्भ म्हटले म्हणजे संत्रा.परंतु आता बरेचसे शेतकरी आहेत की ते पेरू लागवडीकडे वळत आहे.पेरू हे फळ पिककमी खर्चात व कमी मेहनतीत चांगले उत्पन्न देते.या लेखात आपण पेरू लागवड विषयी माहिती घेणार आहोत.
या आहेत पेरूच्या काही जाती
- तैवान प्रकारांमध्ये पिंक व सफेद
- ललित
- सरदार
- लखनऊ
- अर्का किरण
- G विलास
- अलाहाबाद सफेदा
- VNR
लागवड हंगाम, जमीन व पाणी:
पेरूच्या झाडाची बारा महिने लागवड करता येते.पेरू साठी काळी,लाल,मुरमाड, माळरानाची तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन उत्तम असते. कमी पाण्यामध्ये देखीलहे पीक उत्तम घेता येते.
लागवड अंतर
6×10,6×12,8×12,8.5×5 किंवा 6×9 घनदाट पद्धतीने लागवड केल्यास एकरी एक हजार रोपे बसतात.
लागवड करताना
1×1 चे खड्डे करावे व खड्ड्यात कुजलेले शेणखत टाकून रोपाची एका सरळ रेषेत लागवड करावी. पाण्यासाठी ड्रिप चा वापर करावा. त्यामुळे पाण्याची बचत होते व रोपांच्या गरजेनुसार पाण्याची मात्रा देता येते.
पेरू फळाची वैशिष्ट्ये
तैवान पेरूची टिकवणक्षमता आठ ते दहा दिवस असते.चवीला गोड व बियांचे प्रमाण कमी असून गराचे प्रमाण जास्त असतं.फळाचे वजन साधारण दहा तीनशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत असतो.रंग, चव व पायाच्या आकारमानानुसार मार्केट चांगलीच मागणीअसते. या फळावर रोगाचे प्रमाण कमी असते.फळमाशी दिसली तर योग्य वेळी फवारणी करून घ्यावी.
पेरू फळ बागातील अर्थकारण - प्रति एकरी खर्च व उत्पादन
खर्च - एका रोपाची किंमत 50 ते 70 रुपये
एका एकर मध्ये एक हजार रुपये बसतात म्हणजे 70×1000= 70 हजार रुपये रोपांचा खर्च
ड्रीप साठी दहा हजार रुपये
दहा हजार रुपये मजुरी
दहा हजार रुपये इतर खर्च
एकंदरीत प्रति एकर चा खर्च एक लाख रुपये
एका एकरातून मिळणारे उत्पादन
एका झाडापासून 20 ते 30 किलो मालमिळतो.
प्रति किलोला भाव 30 ते 60 रुपये मिळतो.
वीस रुपयाचा होलसेल भाव जरी गृहीत धरला तर 20×30=600रुपये एका झाडास मिळतात.
एका एकरच्या हजार झाडांपासून-600×1000=सहा लाख रुपये प्रति एकर उत्पादन मिळते.
अशाप्रकारे आपण कमी पाणी, मी पैसे खर्च करून व कमी कष्टात भरघोस उत्पादन घेऊ शकतो.लागवड करताना कृपया तज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच करावी.कारण लागवडीत चूक होऊन उत्पादनात घट होणार नाही.लागवड झाल्यानंतर उत्पादन घेत असताना मार्केटचा विचार करून नियोजन व व्यवस्थापन करावे.
Share your comments