1. फलोत्पादन

Grapes Farming : 'ह्या' पद्धत्तीने करा द्राक्षे शेती आणि कमवा लाखों रुपये

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
grape plant

grape plant

भारतात फळबाग लागवड आता मोठ्या प्रमाणात केली जात आहे. केळी, डाळिंब, द्राक्षे इत्यादी फळांच्या बागा आता शेतकरी बांधव फुलवत आहेत आणि चांगली तगडी कमाई करत आहेत. भारतात गेल्या 70 वर्षाहून अधिक कालावधीपासून शेतकरी द्राक्षे शेती करत आहेत. व्यापारी दृष्टीने द्राक्षे लागवड शेतकरी बांधवांसाठी खरच खुप फायदेशीर ठरत आहे. महाराष्ट्रात द्राक्षे लागवड ही लक्षणीय आहे, आपल्या राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण जिल्हा म्हणजे नाशिक आणि ह्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षे शेतीचा डंका पार साता समुद्रपार गाजत आहे.

ह्यामुळेच नाशिक जिल्ह्याला वाईन सिटी म्हणुन ओळखले जाते. भारताच्या एकूण उत्पादनापैकी नाशिक जिल्ह्यात जवळपास 70 टक्के उत्पादन होते. द्राक्षे शेती शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते पण त्यासाठी द्राक्षे लागवड करताना काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे असते. जर ह्याची शास्त्रीय पद्धतीने लागवड केली तर शेतकरी बांधव चांगला नफा कमवू शकतात. द्राक्षे शेतीचे महत्व बघता आम्ही आपल्यासाठी हा खास लेख तयार केला आहे आज आपण द्राक्षे शेती संदर्भात सर्व्या गोष्टी जाणुन घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया द्राक्षे शेती विषयी महत्वपूर्ण माहिती.

 द्राक्षे शेतीसाठी कोणती जमीन ठरते फायदेशीर

भारतात द्राक्षे पिकाच्या वाढीसाठी पोषक हवामान आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील द्राक्षे बागांसाठी पोषक वातावरण उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील जमिन ही द्राक्षे पिकाच्या वाढीसाठी उत्तम आहे. तसे बघायला गेले तर द्राक्ष बागांची लागवड ही जवळजवळ सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये करता येते. द्राक्ष पिकांची मुळे ही लांब वाढतात, जमिनीत खोलवर जातात. तसेच द्राक्षेच्या खोड ही मजबूत असतात त्यामुळे द्राक्षे पिक खडकाळ, वाळूमिश्रित ते गुळगुळीत आणि उथळ असलेल्या तसेच खोल दळ असलेल्या जमिनीत चांगली वाढतात. पण शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चिकनमाती असलेल्या जमिनीत द्राक्षे लागवड करत असाल तर जमीन ही पाण्याचा चांगला निचरा करणारी असावी तसेच त्या चिकनमाती युक्त जमिनीत वाळू असावी जेणेकरून द्राक्षे बागांची लागवड फायदेशीर ठरेलं आणि शेतकरी बांधव ह्यातून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

द्राक्षे बाग लागवडीसाठी खड्ड्याचे नियोजन

द्राक्षाच्या बागासाठी खड्डा तयार करणे- सुमारे 50×50×50 सेमी आकाराचे खड्डे खोदून तयार करावे आणि आठवडाभर खोदलेले खड्डे तसेच मोकळे राहु द्यावे जेणेकरून खड्ड्याला चांगले ऊन बसेल आणि त्यात असलेले विषाणू मरतील. द्राक्षेची रोपे लावताना खड्ड्यात चांगले प्रतीचे जुने शेणखत (15-18 किलो), 250 ग्रॅम निंबोळी केक, 50 ग्रॅम सुपर फॉस्फेट आणि 100 ग्रॅम पोटॅशियम सल्फेट टाकावे. वर दिलेले हे प्रमाण एका खड्ड्यासाठी आहे.

 द्राक्षे बागासाठी खत व्यवस्थापन

प्रत्येक पिकाला वाढीसाठी पोषक तत्वाची आवश्यकता असते. तसेच द्राक्ष पिकासाठी देखील पोषक तत्वाची गरज असते. द्राक्षे पिकाला अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची गरज असते, त्यामुळे द्राक्षे बागाला नियमित आणि संतुलित प्रमाणात खत व खाद्य द्यावे लागते. द्राक्षेला खत शेतकरी प्रामुख्याने मुळां जवळ खड्डे करून देतात. रोग आणि कीटकांपासून द्राक्षाच्या झाडांचे संरक्षण करण्यासाठी, प्रामुख्याने औषधाची फवारणी करावी लागते तसेच काही खते ही मुळा जवळ टाकावी लागतात.

 

 द्राक्षे बागासाठी पाणी व्यवस्थापन

देशातील अर्ध-शुष्क हवामान असलेल्या भागात प्रामुख्याने द्राक्षांची लागवड केली जाते, त्यामुळे आपल्याकडे द्राक्षे पिकाला वेळोवेळी पाणी दयावे लागते. द्राक्ष पिकाला नेहमीच पाण्याची आवश्यकता असते व जमिनीत ओलावा टिकवून ठेवावा लागतो. त्यामुळे द्राक्षे पिकाला 7-8 दिवसात एकदा पाणी हे द्यावे लागते. द्राक्षे पिकाला हंगामानुसार पाणी द्यावे लागते त्यामुळे शेतकरी बांधवानी कृषी विशेषज्ञाचा सल्ला घ्यावा. देशातील बहुतेक शेतकरी आजकाल द्राक्ष पिकामध्ये ठिबक सिंचन प्रणाली वापरतात, द्राक्षे पिकासाठी अनेक वैज्ञानिक देखील ठिबक सिंचणाचीच शिफारस करतात. त्याचे अनेक फायदे देखील आहेत ह्यामुळे पाण्याची बचत होते आणि लिक्विड सोडण्यासाठी देखील ठिबकचा चांगला वापर होतो.

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters