कधीकधी पावसाच्या लहरीपणामुळे तसेच जास्त पावसाची वारंवारिता कमी झाल्याने गोनोसेफॅलम प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.हा भुंगा त्याला खाद्याची कमतरता जाणवली की भुईमूग, हरभरा, सोयाबीन, कापूस, सूर्यफूल, ज्वारी, मूग आणि मका इत्यादी पिकांवर मोठ्या प्रमाणात नुकसान करतो.
या भुंग्याचा प्रादुर्भाव हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. हिवाळ्यामध्ये जमिनीचे तापमान बियाण्याच्या उगवणीस पोषक होताचजमिनीमध्ये लपलेल्या आळ्या तात्काळ पृष्ठभागापासून काही इंच वर येऊन उगवणाऱ्या बियाण्यास नुकसान करतात ज्या शेतामध्ये तृणधान्य लावलेले असते अशा मध्ये या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. तसेच भुसभुशित, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये ही कीड आढळून येते. उन्हाळ्यामध्ये आणि दुष्काळ पडल्यानंतर पडलेला पाऊस या किडींसाठी पोषक असतो.
या भुंग्यासाठी अन्नाची उपलब्धता
जेव्हा पीक उगवत असते तेव्हा बियाण्या तून निघणाऱ्या कार्बन-डाय-ऑक्साईड कडे आकर्षित होऊन अळ्या पृष्ठभागावरील नुकतेच उगवलेले बियाणे खातात. अन्नपदार्थांच्या अनुपस्थित अळ्या जमिनीवर खोल जातात व फक्त कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर दोन वर्षापर्यंत आपली उपजीविका करतात.
लक्षणे
गोनोसेफॅलियम भुंग्यांच्या आळ्या प्रामुख्याने अंकुरलेले बियाणे, मुळे वर रोपावर उपजीविका करतात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे रोपे मरतात व त्यांना झालेल्या इजेतून रोपांना रोगांची लागण होण्याची शक्यता असते. पोकळ झालेले बियाणे किंवा मेलेले, गोल कुरतडलेले पण पूर्णपणे न तुटलेले रोप ही लक्षणे आहेत.
पिकनुकसानीचे प्रमाण
अळ्या व भुंगे जमिनीमध्ये राहून पिकांवर हल्ला करतात.अळी कोंबआलेल्या दाण्यावर हल्ला करते. दाण्याचा वरचा पापुद्रा बाजूला करून आतील भाग खाते. पिकाची मुळे व अंकुरलेलाशेंडा कुरतडते.भुंगे रोपांवर हल्ला करतात. रोपांचे सुरुवातीचे जाड पान खाऊन टाकतात. कोवळा शेंडा तसेच जमिनीलगत खोड कुरतडतात.
त्यामुळे दाणे न अंकुरतात मरतात तर रोपे कोलमडून पडतात. याच्या प्रादुर्भावामुळे एकरी झाडांची संख्या कमी होऊन उत्पादनामध्ये घट येते.प्रादुर्भाव जास्त असल्यास दुबार पेरणी करावी लागते. भुंगे एकदल धन्य पेक्षा द्विदल धान्याच्या पिकाचे नुकसान जास्त करतात.द्विदल धान्याचे उगवणारी शेंडे सहज खाऊन रोपटे नष्ट करतात.
एकात्मिक व्यवस्थापन
पेरलेल्या ओळीवर दाबून वजन देऊन माती झाकावी. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होईल.कुजत असलेले सेंद्रिय पदार्थ विशेषतः पिकांचे अवशेषांचे ढीग लावून ठेवू नये. हंगामापूर्वी त्याची विल्हेवाट लावावी. धूऱ्यावरील गवताचा व इतर वनस्पतींचा वेळीच बंदोबस्त केल्यास किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
Share your comments