आवळ्याचे झाड अत्यंत काटक असल्यामुळे या पिकाची फारशी काळजी न घेताहीचांगले उत्पादन मिळते. आवळ्यापासून कमी खर्चात मिळणारे उत्पादन, आहार दृष्ट्या महत्त्व आणि औषधी उपयुक्तता यामुळे आवळा या फळात पिकाच्या लागवडीस अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारतात उत्तर प्रदेश,महाराष्ट्र, मध्य प्रदेश तसेच बिहार, राजस्थान इत्यादी राज्यात आवळ्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये सातपुडा, सह्याद्री आणि अजिंठ्याचा डोंगराळ भागात तसेच जळगाव, अमरावती, चंद्रपूर, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आवळ्याची लागवड आढळते. या लेखात आपण औषधी आवळ्याच्या काही सुधारित आणि चांगल्या उत्पन्न देणाऱ्या जाती बद्दल जाणून घेणार आहोत.
आवळ्याच्या सुधारित जाती
- बनारसी- उत्तर प्रदेशात बनारसी जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. या जातीची फळे आकाराने मोठी असून चकचकीत, पिवळसर रंगाचे असतात. या जातीच्या फळांचे वजन 40 ते 45 ग्रॅम असते. या जातीची फळे मुरब्बा आणि लोणच्यासाठी उत्तम समजली जातात.
कृष्णा( एन.ए -5)- या जातीची फळे मध्यम ते मोठ्या आकाराची, मऊ सालीची, चमकदार,पिवळसर रंगाची आणि लाल छटा असलेली असतात. या जातीच्या फळांचे वजन 35 ते 40 ग्रॅम असते.मुरब्बा यासारखे टिकाऊ पदार्थ तयार करण्यासाठी ही जात उत्तम आहे
- चकिया- ही जात उशिरा तयार होणारी असून नियमित आणि भरपूर उत्पादन देणारे आहे.या जातीची फळे मध्यम आकाराची, चपटी आणि रंगाने हिरवट असतात. फळांचे वजन तीस ते बत्तीस ग्रॅम असते. लोणच्यासाठी आणि इतर टिकाऊ पदार्थ तयार करण्यासाठी ही जात उत्तम असून नेक्रोसिस या रोगास बळी पडत नाही. या जातीमध्ये फळगळ होत नाही म्हणून आवळ्याच्या व्यापारी उत्पादनासाठी या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
- कांचन( एन. ए.4)- ही जात भरपूर उत्पन्न देणारी असून या जातीची फळे मध्यम आकाराची आणि पिवळसर रंगाचे असतात. या जातीच्या फळांचे वजन तीस ते बत्तीस ग्रॅम असते. ही जात त्रिफळा चूर्ण आणि लोणच्यासाठी उत्तम आहे.
- हाथीझुल( फ्रान्सिस )- या जातीची फळे आकाराने मोठी आणि हिरवट पिवळ्या रंगाचे असतात. फळाचे वजन 40 ते 41 ग्रॅम असते.
- नरेंद्र 6- ही जात चकीया या जातीपासून संशोधित केलेली आहे. फळे मध्यम गोल आकाराचे असतात. तसेच फळांचा रंग हिरवट पिवळसर असतो. पृष्ठभाग चिकन चमकदार असतो तर गर पिवळा असतो.
- नरेंद्र आवळा 7- ही जात फ्रान्सिस या आवळ्याच्या जातीपासून संशोधन केलेली आहे. ही झाडे सरळ वाढतात. नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये फळे तयार होतात व फळे मोठ्या आकाराचे असतात. फळाचे वजन 40 ते 50 ग्रॅम असते. फळांचा आकार लंबगोल आकार असतो. या जातीमध्ये नेक्रोसिस रोग दिसून येत नाही.
- आनंद 1- या जातीची झाड मध्यम उंचीचे असते.फाद्या पसरणाऱ्या असतात व खोडाची साल पांढरी असते. फळे मोठी गोल,सफेद रंगाची,रेषाहीन व गुलाबी छटा असलेली पारदर्शक असतात. प्रत्येक झाडास 75 ते 80 किलो फळे येतात.
- आनंद 2- हीच झाडे मध्यम ते उंच वाढणारे असतात. खोडाची साल भुरक्या रंगाचे असते. फळे मोठी असून वजन 45 ग्रॅम असते.
Share your comments