MFOI 2024 Road Show
  1. फलोत्पादन

डाळिंब फळबागांवर फुलांची समस्या का उद्भवते? जाणून घेऊ त्यामागील महत्वाची कारणे

डाळिंब हे फळझाड 10 ते 15 टक्के चिकन माती, 30 ते 40 टक्के पोयटा, 40 ते 50 टक्के वाढ अशा प्रकारची निकृष्ट, कोणतेही पीक येत नाही अशी पडिक, माळरानाची जमीन सुद्धा चांगली मानवते. महाराष्ट्रात त्याची लागवड झपाट्याने वाढली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
pomegranet

pomegranet

डाळिंब हे फळझाड 10 ते 15 टक्के चिकन माती, 30 ते 40 टक्के पोयटा, 40 ते 50 टक्के वाढ अशा प्रकारची निकृष्ट, कोणतेही पीक येत नाही अशी पडिक, माळरानाची जमीन सुद्धा चांगली मानवते. महाराष्ट्रात त्याची लागवड झपाट्याने वाढली आहे.

डाळिंबाच्या झाडाची साल, पाने, फुले व फळांची साल इत्यादी मध्ये असणाऱ्या औषधी उपयुक्ततेमुळे पुढील पन्नास वर्षे तरी याला आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध असणार आहे. डाळिंब पीक लागवड मध्ये डाळिंबाच्या फुलाला फार महत्व असते. कारण फूलांच्या संख्या वरच फळांचे उत्पन्न अवलंबून आहे.या लेखात आपण डाळिंबाच्या फूल समस्येविषयी माहिती घेणार आहोत.

डाळिंब फळबागेतील फुल समस्या व कारणे

  • डाळींब झाडाच्या खोडात, फांद्यांमध्ये व फळ कांडे मध्ये कर्बोदके, मुख्य, दुय्यम व सूक्ष्म मूलद्रव्यांच्या असंतुलित किंवा कमी प्रमाण असणे विशेषतः नत्राचे प्रमाण जास्त असल्यास नर फुलांची संख्या वाढून ती दोन ते तीन दिवसात गळून पडतात.
  • बहार धरताना डाळिंबाच्या झाडांना पाण्याचा योग्य ताणन बसल्यास  फुले येत नाही.
  • तसेच दोन बहार धरताना त्यामध्ये योग्य अंतर नसल्यास फुलं निघत नाही.
  • जमिनीच्या पोता प्रमाणे डाळिंब झाडांची छाटणी अपुरी किंवा जादा झाल्यास फुले येत नाही.
  • तसेच जमिनीच्या प्रतीनुसार पाणी कमी किंवा जास्त देण्यात आले तर फुले गळतात.
  • डाळिंब झाडांना जास्त ताणानंतर पाणी दिले तर किंवा नाही दिले तर जमिनीचे तापमान वाढल्याने फुल गळ होते.
  • डाळिंब झाडावरील कळी व फुलांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला तर फुल गळतात
  • तसेच फळ बागेत संजीवकांची कमतरता झाली तर ही समस्या उद्भवते.
  • डाळिंब फळ झाडाला फुलधारणेसाठी तापमान 27 ते 32 सेंटीग्रेड लागते27 पेक्षा कमी किंवा 32 सेंटीग्रेड पेक्षा जास्त झाले तर फूलनिघण्यास अडचण येते.
  • डाळिंबाच्या खरड छाटणी मुळे देखील फुले निघत नाहीत. फुलं निघण्याऐवजी पालवी फुटते किंवा कायिक वाढ जास्त होते. त्यामुळे फुलं जोमदार येत नाहीत किंवा येतच नाहीत. जरी फुले निघाली तरी त्यामध्ये नर फुलांचे प्रमाण जास्त असते व ते गळतात.
  • फळ पोषणासाठी आवश्यक अन्नसाठा निर्माण करण्यासाठी आवश्यक प्रमाणात पानेझाडावर नसली तरी फुल निघत नाहीत किंवा टिकत नाहीत.
English Summary: flower spring problem in pomegranet orchard reason behind this problem Published on: 30 October 2021, 10:45 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters