भारतात सीताफळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. आंध्र प्रदेश कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र या राज्यांमध्ये सिताफळाची लागवड केली जाते. मात्र महाराष्ट्र सिताफळाच्या लागवडीत प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रामध्ये विशेष करून सीताफळाची लागवड जळगाव, दौलताबाद, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, यवतमाळ, वर्धा इत्यादी भागात सिताफळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
सिताफळ अत्यंत मधुर असे फळ आहे. सिताफळा मध्ये जीवनसत्वे आणि खनिजे उपलब्ध करून देण्याची क्षमता असल्यामुळे ते एक पूरक फळ आहे. सिताफळाचे औषधे आणि आयुर्वेदिक गुणधर्म देखील मोलाचे आहेत. औषध कंपन्यांमध्ये कडवट औषध निर्माण करण्यासाठी सिताफळाच्या पानांचा वापर केला जातो. तसेच सिताफळाच्या बिया पासून तेल निर्मिती देखील करता येते व या तेलाचा उपयोग साबण निर्मितीसाठी केला जातो. सीताफळाची भुकटी आईस्क्रीम तयार करण्यासाठी वापरली जाते.
सीताफळासाठी आवश्यक हवामान आणि जमीन
सिताफळाच्या वाढीसाठी कोरडे व उष्ण हवामान फार उपयुक्त असते. महाराष्ट्राचे हवामान हे सीताफळ लागवडीसाठी फार उपयुक्त आहे. सीताफळ पिकामध्ये पाण्याचा आणि उष्णतेचा ताण सहन करण्याची क्षमता असल्यामुळे ते कपडे पाण्यात देखील येते. सीताफळ जेवा मोहराच्या काळात असते तेव्हा कोरडी हवा असणे फार आवश्यक असते, पावसाळा सुरू झाला शिवाय सीताफळाला फळधारणा होत नाही. जास्त थंडी व अति धुके या पिकाला अपायकारक असू शकते. अगदी खडकाळ जमिनीपासून ते माळरानात मध्ये सिताफळाचे झाड वाढू शकते. जशी माळरानांवर सिताफळाचे वाढ होते अगदी शेवाळ युक्त जमिनीतही सिताफळाचे वाढ चांगली होते. तसेच गाळ मिश्रीत, लाल जमिनीत सिताफळाचे वाढ चांगल्या प्रकारे होते. मात्र काळी, पाणी साठवून ठेवणारी जमीन या फळ झाडाला अयोग्य ठरतात.
सिताफळाची लागवड पद्धत
सीताफळाच्या लागवडीसाठी पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात 0.60 बाय0.60 बाय0.60 आकाराचे खड्डे जमिनीचा मगदूर पाहून खोदावेत. तसेच पाच बाय पाच मीटर अंतरावर खड्डे घ्यावेत. म्हणजे या अंतराने खड्डे केल्यास एक हेक्टर मध्ये 400 झाडे बसतात आणि लागवड 4 बाय 4 मीटर वर केल्यास 50 टक्के अधिक झाडे बसतात. चांगल्या प्रकारचे शेणखत, सिंगल सुपर फास्फेट, पोयटा माती सह पावसाळ्यापूर्वी खड्डे भरून घ्यावेत हे फार महत्त्वाचे असते. बांगडी पद्धतीने थायमेट 10जि वापरावे. यासाठी हेक्टरी अर्धा टन शेणखत, 200 किलो सिंगल सुपर फास्फेट ची हेक्टरी आवश्यकता असते. अशाप्रकारे खड्डे भरल्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये पावसाळ्यात झाडांची लागवड सुरू करावे.
सिताफळासाठी खत व्यवस्थापन
चांगले उत्पन्न येण्यासाठी पावसाळा सुरू झाला की सीताफळाच्या झाडाला दोन-तीन पाठवा चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत देणे फायदेशीर ठरते. लागवडीनंतर साधारणत तीन वर्षापर्यंत खालील प्रमाणे खते द्यावीत.
- पहिले वर्ष 125 ग्राम नत्र, स्फुरद, पालाश इत्यादी खताचा पुरवठा करावा.
- दुसऱ्या वर्षी अडीचशे ग्रॅम नत्र, अडीचशे ग्राम स्फुरद, 125 ग्रॅम पालाश कधी खतांचा पुरवठा करावा.
- तिसऱ्या वर्षी 375 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद, 250 ग्रॅम पालाश यांचा पुरवठा करणे योग्य ठरते.
तसेच पुढील पाच वर्षापर्यंत प्रत्येक झाडाला पाच ते सात पाट्या शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि 200 ते 500 ग्रॅम युरिया द्यावा.
पाणी व्यवस्थापन
तसे पाहता सीताफळाच्या झाडाला जास्त पाण्याची आवश्यकता नसते. जेव्हा फळे पक्व होण्याच्या टाईम असतो, तेव्हा एक दोन वेळेस पाणी द्यावे म्हणजे फळांचा आकार व दर्जा वाढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पाण्याचा ताण जास्त पडला तर 15 ते 20 दिवसांनी पाणी द्यावे. सिताफळ पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता नसते निव्वळ पावसाच्या पाण्यावरही चांगले उत्पन्न देऊ शकते. परंतु पहिले तीन-चार वर्षात जर पुणे पाणी दिले तर झाडांची वाढ चांगली होते व पदव्युत्तर साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पाण्याचा एक दोन पाळ्या दिल्या तर भरपूर व मोठी फळे मिळतात.
सीताफळ पिकाची आंतर मशागत
- सिताफळाची लागवड केल्यानंतर जर काही रोपे मेली तर एक महिन्याच्या आत नांग्या भरून घ्याव्यात.
- सीताफळाची बाग ही कधीही तन मुक्त असणे आवश्यक असते. म्हणून जर गवत झाले तर खुरपणी करून बाग तणमुक्त ठेवावे.
- रोपे लहान असताना पावसाने ताण पडला तर अधूनमधून पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
- झाडाची वाढ जोमाने होण्याकरिता व चांगले फळ मिळण्याकरिता छाटणी करावी. झाडाला योग्य वळण सुरुवातीच्या काळात छाटणी करून द्यावे. त्यासाठी झाडावरील अनावश्यक फांद्या काढून टाकाव्यात.
- पाण्याचा ताण पडला तर 15 ते 20 दिवसांनी पाणी द्यावे.
- बागेमध्ये वेळोवेळी आंतरमशागत करावी.
सीताफळाची छाटणी
कोणत्याही फळ पिकामध्ये छाटणीला फार महत्व असते. तसेच महत्त्व सिताफळा मध्ये सुद्धा आहे. जर छाटणी केली नाही तर झाड झुड पाल होते आणि त्याचे उत्पन्न त्याची क्षमता कमी होते. त्याच्यामुळे झाडाला व्यवस्थित आकार पण येतो व त्यामुळे बागेमधील आंतरमशागतीची कामे चांगल्या पद्धतीने करता येतात. साधारणता झाडाची पानगळ झाल्यानंतर छाटणी करावी. छाटणी केल्यानंतर लगेच बुरशीनाशकांची फवारणी करणे कधीही योग्य ठरते.
उन्हाळी बहारमध्ये दुबार छाटणी
साधारणतः पहिली छाटणी ही बहराचे पाणी सुरू करण्यापूर्वी 15 ते 20 दिवस अगोदर केले जाते. जानेवारी ते मे मध्ये उन्हाळी बारा साठी पाणी सुरू करण्यात येते. जून 25 ते 27 नंतर झाडांना फळे असताना दुसरी छाटणी करावी. त्याच्यानंतर आठ ते दहा दिवसांनी झाडाला नवीन पालवी फुटते व त्यातूनच नवीन फुलांची निर्मिती होते. सदरची फळे नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात काढणीस येतात, एका झाडापासून दोन फळे घेणे शक्य असते. फळे साधारणतः सुपारीच्या आकाराची झाल्यानंतर फळांची विरळणी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. विरळणी करताना चांगल्या आकारमानाची देखणी फळे ठेवावीत बारीक, रोगग्रस्त व वेळ वाकडी फळे विरळणी करून काढून घ्यावेत. अशाप्रकारे सीताफळाचे तंत्रज्ञान शुद्ध लागवड केली तर चांगले उत्पन्न मिळून आर्थिक फायदा होऊ शकतो.
Share your comments