जर व्यापारी दृष्टीने अंजिराची लागवड पाहिली तर ती फक्त महाराष्ट्रातच केली जाते. सध्या महाराष्ट्र मध्ये एकूण 417 हेक्टर च्या आसपासक्षेत्र अंजीर लागवडीखाली असून त्यापैकी 312 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र एकट्या पुणे जिल्ह्यात आहे.
हवामान बदलाचा वाईट परिणाम हा अंजीर बागेच्या वाढीवर व उत्पादनावर दिसून येतो.
थंडीमुळे बागेतील झाडांच्या पानांची व फळांची वाढ समाधानकारक होत नाही. या लेखात आपण हिवाळ्यात अंजीर बागेचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल माहिती पाहू.
अंजीर बागेचे हिवाळ्यातील व्यवस्थापन
- पिकांचे पोषण व पाणी व्यवस्थापन
- बदलत्या हवामानाप्रमाणे बहरतात बदल करणे काळाची गरज
- बागेच्या पश्चिम व उत्तरेस वारा प्रतिबंधक झाडे उदा. सुरू, निरगुडी, मलबेरी, करंज, शेवगा, हलगा, जांभूळ इत्यादी पिके लावावी.
- हिवाळ्यात बागेतील झाडात पसरणारी वाटाणा, घेवडा, पानकोबी, फुलकोबी, पालेभाज्या आदी मिश्र पिके घ्यावीत. जेणेकरून जमिनीचा उष्णतामान टिकून राहण्यास मदत होते.
- अंजीर बागेला विहिरीचे, पाटाचे पाणी द्यावे. त्यामुळे जमिनीलगतच्या हवेचे उष्णतामान थोडे वाढते आणि अंजिराच्या झाडांच्या वाढीवर थंडीचा विपरीत परिणाम होत नाही.
- अंजीर बागेमध्ये रात्री जागोजागी शेकोटी पेटवून धुमसत राहील असे पाहावे त्यामुळे बागेत धुराचे दाट आवरण तयार होईल व बागेच्या तापमान वाढीस मदत होईल
- अंजीर बागेच्या वाफ्यामध्ये शक्य असल्यास कडबा, गवत, सरमाड,पालापाचोळ्याचे आच्छादन करावे.
- लहान लावलेली कलमे, रोपवाटिकेतील रोपे व कलमे यांना तुराट्या, कडबा, पाचट केव्हा पॉलिथिनचे छप्पर करावे.
- थंडीचे प्रमाण वाढल्यास प्रति झाड 200 ते 500 ग्रॅम या प्रमाणात म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सल्फेट ऑफ पोटॅश ही खते जमिनीतून द्यावीत असे केल्यास फळगळ थांबते.
- पोटॅशियम नायट्रेट किंवा पोटॅशियम क्लोराईड यांचे कमी तीव्रतेचे द्रावण झाडानादिल्यासझाडांचा काटकपणा वाढू शकतो.
- तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण एक टक्का किंवा तीन ग्रॅम डायथेन एम-45 अधिक बाविस्टीन एक ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळून पंधरा दिवसांनी फवारावे.
- अंजिराचे निरोगी झाडे, अशक्त, रोगट किंवा कीडग्रस्त झाडा पेक्षा जास्त थंडी सहन करू शकतात. त्याकरिता अंजीर बागेची उत्तम निगा ठेवून अंजिराचे झाड निरोगी व कीड रहित असणे अत्यंत महत्त्वाचे असते.
Share your comments