MFOI 2024 Road Show
  1. फलोत्पादन

अशा पद्धतीने करा अंजीर लागवड, अंजिराच्या या जाती आहेत लागवडीसाठी योग्य

कमी खर्च आणि जास्त नफा यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अंजीर च्या रोपांची लागवड करीत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याकडे लक्ष देणारे सरकार पारंपरिक पिकांऐवजी नगदी पिकांचा लागवडीस प्रोत्साहित करीत आहेत.अलीकडच्या काळात कृषी क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. शेतकरी आता पारंपरिक पिकांना सोडून नगदी पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत. औषधी वनस्पतींच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
fig plant

fig plant

 कमी खर्च आणि जास्त नफा यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अंजीर च्या रोपांची लागवड करीत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याकडे लक्ष देणारे सरकार पारंपरिक पिकांऐवजी नगदी पिकांचा लागवडीस प्रोत्साहित करीत आहेत.अलीकडच्या काळात कृषी क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. शेतकरी आता पारंपरिक पिकांना सोडून नगदी पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत. औषधी वनस्पतींच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत

 शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या प्रयत्नात असलेले सरकार पारंपारिक पिका व्यतिरिक्त नवीन पर्याय निवडण्यास ही प्रोत्साहित करीत आहे.त्यामुळे औषधी वनस्पतींच्या लागवडीचा कल वाढत आहे.अंजीर ही अशीच औषधी वनस्पती आहे. ज्याची शेती शेतकरी मोठ्या प्रमाणात करीत आहेत.  कमी खर्चामुळे आणि जास्त काळजी घ्यावी लागत नसल्यामुळे हा शेतकऱ्यांसाठी एक विनिंग पॅचठरत आहे. या लेखात आपण अंजिराची लागवड कधी व केव्हा करावी व त्याच्या काही जाती विषयी माहिती घेणार आहोत.

अंजीर पिकासाठी लागणारे हवामान

उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. कमी उष्णता तापमान या पिकाला घातक ठरत नाही परंतु ओलसर दमट हवामान मात्र निश्चितपणे घातकठरते. कमी पावसाच्या भागात जिथे आक्टोबर ते मार्चपर्यंत पाण्याची थोडीफार सोय आहे अशा ठिकाणी अंजीर लागवड करण्यास वाव आहे.

आवश्यक जमीन

 हलक्या माळरान यापासून ते मध्यम काळया व तांबड्या जमिनीपर्यंत अंजीर लागवड शक्‍य आहे. भरपूर चुनखडी असलेल्या तांबूस काळा जमिनीत अंजीर उत्तम वाढते. तसेच चांगला पाण्याचा निचरा असलेली एक मीटरपर्यंत खोल असलेली कसदार जमीन  यासाठी उत्तम आहे. खूप काळा मातीचे जमीन या फळाला अयोग्य असते.

अंजिराच्या सुधारित जाती

 अंजिराच्या सीमरना, कालीमिरना, कडोटा,काबुल,मारसेल्सइत्यादी जाती प्रसिद्ध आहेत. पुणे भागातील पूना अंजीर नावाने प्रसिद्ध असलेली जात किंवा कॉमन या प्रकारातील असून महाराष्ट्रात मुख्यतः ही जात लावली जाते.

अंजीर लागवड

अंजीर लागवडीसाठी खोदलेल्या खड्ड्यात संतुलित खत व खाद्य घालून रोपे लावा.आठ बाय आठ मीटर अंतरावर लागवड योग्य आहे. लागवड ही डिसेंबर ते जानेवारी किंवा जुलै ते ऑगस्ट पर्यंत करावी.

 

अंजिराची काढणी

उप उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये, वसंत ऋतू मध्ये येणारी फळे मे ते ऑगस्ट दरम्यान पिकून तयार होतात. जेव्हा फळे पूर्णपणे पिकतात तेव्हा त्यांचे काढणे करावे.  तोडल्यानंतर 400 ते 500 ग्रॅम पेक्षा जास्त फळ कंटेनरमध्ये ठेवू नये. जर फळे मोठ्या प्रमाणात काढायचे असतील तर ते पाण्याने भरलेल्या भांड्यात गोळा करावेत.

 रोपवाटिकेत अंजीर झाड तयार करणे

 अंजीर वनस्पती प्रामुख्याने एक ते दोन सेंटीमीटर जाड, 15 ते 20 सेंटिमीटर लांबीच्या परिपक्व कलमांद्वारे तयार होतात. हिवाळ्यातील मादा झाडांपासून कलम घेतले जाते व ते एक ते दोन महिन्यापर्यंत कॅलसिनिंगसाठी जमिनीत दाबले जातात. तापमान फेब्रुवारी ते मार्च पर्यंत वाढू लागताच या कलमांना पंधरा बाय पंधरा सेंटीमीटर अंतरावर रोपवाटिकेत लावले जातात.

English Summary: fig cultivation and techniqe improvise veriety of fig Published on: 18 October 2021, 11:50 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters