1. फलोत्पादन

नारळाचे खत व्यवस्थापन

नारळ हे बागायती फळझाड असून, पाण्याची सोय असल्यास कुठल्याही प्रकारच्या म्हणजेच समुद्र किंवा नदीकाठच्या रेताड गाळविरहित रेताड, वरकस, मुरमाड, मध्यम, भारी आणि अतिभारी जमिनीत देखील लागवड करता येते, परंतु प्रत्येक प्रकारच्या जमिनीत पूर्वतयारी करताना काळजी घ्यावी लागते. ज्या जमिनीत पावसाळ्यात पाणी लवकर निघून जात नाही, अशी पाणथळ जमिनीत नारळाची लागवड करावयाची असल्यास अशा जमिनीत चर काढून पाणी बाहेर काढणे महत्वाचे असते. त्याचप्रमाणे नदीकाठच्या जमिनीत पावसाळ्यात पाणी काही काळ आत शिरते, अशा जमिनीत पावसाचा जोर ओसरल्यावर म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये लागवड करावी.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Coconut Crop

Coconut Crop

नारळ हे बागायती फळझाड असून, पाण्याची सोय असल्यास कुठल्याही प्रकारच्या म्हणजेच समुद्र किंवा नदीकाठच्या रेताड गाळविरहित रेताड, वरकस, मुरमाड, मध्यम, भारी आणि अतिभारी जमिनीत देखील लागवड करता येते, परंतु प्रत्येक प्रकारच्या जमिनीत पूर्वतयारी करताना काळजी घ्यावी लागते. ज्या जमिनीत पावसाळ्यात पाणी लवकर निघून जात नाही, अशी पाणथळ जमिनीत नारळाची लागवड करावयाची असल्यास अशा जमिनीत चर काढून पाणी बाहेर काढणे महत्वाचे असते. त्याचप्रमाणे नदीकाठच्या जमिनीत पावसाळ्यात पाणी काही काळ आत शिरते, अशा जमिनीत पावसाचा जोर ओसरल्यावर म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये लागवड करावी.

नारळ लागवड करताना सर्वात महत्वाचा मुद्दा विचारात घेणे अत्यंत आवश्यक आहे, तो म्हणजे दोन माडातील अंतर. दोन माडातील अंतर योग्य असणे आवश्यक आहे. आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे हे प्रकार घडतात. याकरिता नारळ झाडाच्या झावळीची रचनेची माहिती करून घेणे गरजेचे आहे. उंच वाढणाऱ्या नारळाच्या झावळीची लांबी 15 फुट असते. वजनामुळे झावळीला धनुष्यासारखा आकार येतो. त्यामुळे झावळीचा देठ ते शेंड्यापर्यंत सरळ अंतर 12.5 फुट असते. म्हणून दोन माडात 7.5 मीटर अंतर असेल तर माडाच्या झावळ्या एकमेकात शिरणार नाही. योग्य प्रमाणात उत्पन्न मिळविण्यासाठी माडांची सलग लागवड करताना दोन ओळीत आणि दोन रोपात 7.5 मीटर अंतर ठेवणे गरजेचे आहे. कुंपणाच्या, शेताच्या कडेने एका ओळीत नारळाची लागवड करताना दोन ओळीत आणि दोन रोपात लागवड करावयाची असेल तर पावणेसात ते सात मीटर अंतर ठेवले तरी चालेल. तसेच ठेंगू जातीसाठी सहा मीटर अंतर चालू शकते. नारळाची सलग लागवड 7.5x7.5 मीटर  केल्यास हेक्टरमध्ये 175 झाडे बसतात.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत, बियाणे विभागाच्या मध्यवर्ती रोपवाटिकेत, (15 सप्टेंबरनंतर) नारळाच्या बाणवली व प्रताप या जातीची विक्री सुरु होणार आहे. त्याकरिता 02426-243338 या दूरध्वनी क्रमांकावर (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी 9.30 ते 4.30 या वेळेत संपर्क साधावा.

हेही वाचा:डाळिंब फळ तडकणे : कारणे आणि उपाययोजना

उंच जाती: बाणावली, प्रताप, लक्षद्वीप ओर्डीनरी, फिलिपिन्स ऑर्डीनरी.

1) बाणवली (वेस्ट कोस्ट टॉल) या जातीची वैशिष्ट्ये:

  • हि उंच वाढणारी जात असून तिचे आयुष्य 70 ते 80 वर्ष असून 6 ते 7 वर्षात फुलोऱ्यास येते.
  • प्रत्येक झाडापासून प्रतिवर्षी 50 ते 100 नारळ मिळतात, सरासरी 80 नारळ मिळतात.
  • या नारळ जातीच्या फळात सरासरी 176 ग्रॅम खोबरे  व तेलाचे प्रमाण 67 ते 70 टक्के असते.
  • या जातीमध्ये रंग, आकार आकारमान, उत्पन्न, खोबरे तेलाचे प्रमाण यात विविधता आढळून येते.

2) प्रताप या जातीची वैशिष्ट्ये:

  • या जातीचे नारळ आकाराने मध्यम असून गोल असतात.
  • हि जात फळधारणेस येण्यास 6 ते 7 वर्ष लागतात.
  • नारळाचे प्रति माड उत्पन्न 139 ते 160 असून सरासरी 143 फळे मिळतात.
  • खोबऱ्यात तेलाचे प्रमाण 68% असते.
  • तसेच खोबरे 120 ते 160 ग्रॅम असून सरासरी 150 ग्रॅम मिळते.


ठेंगू जाती
: रंगावरून ऑरेंज डाॅर्फ, ग्रीन डार्फ आणि यलो डाॅर्फ अशा पोटजाती आहेत. त्यातील ऑरेंज डाॅर्फ हि जात शहाळ्यासाठी सर्वात उत्तम आहे.

संकरीत जाती: टीxडी (केरासंकारा), डीxटी (चंद्रसंकरा)

नारळासाठी खड्डा भरणे:

नारळ झाडाची लागवड करताना खड्ड्याचा आकार जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतो. सर्वसाधारण 1x1x1 मीटर आकारचे खड्डे खोदावेत.खड्डे खोदण्याचे काम पावसाळ्यापूर्वी एक ते दीड महिने म्हणजे एप्रिल-मे मधे पूर्ण करावेत. रेताड, वरकस आणि मुरमाड जमिनीत खड्डे भरताना खड्ड्याच्या तळाशी कमीत कमी 1 ते 2 टोपल्या चागल्या प्रतीची माती टाकावी. तसेच खड्डा भरताना आणखी 1 ते 2 टोपल्या चांगल्या प्रतीची माती मिसळावी. त्यामुळे जमिनीत माती धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

पावसाळ्यात अधिक काळ पाणी धरून ठेवणाऱ्या भारी जमिनीत खड्ड्याच्या तळाला 1 ते 2 टोपल्या रेती (वाळू) घालावी. तसेच खड्डा भरताना 1 ते 2 टोपल्या रेती मिसळावी, जेणेकरून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करता येईल. खड्डा भरताना वरील थरात चांगली माती/वाळू 4 ते 5 घमेली कुजलेले शेणखत/कंपोस्ट, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्पेट, 100 ग्रॅम फॉलीडॉल पावडर खड्डा वापरून खड्डा पूर्ण भरावा. पाणी साचून राहत नसलेल्या जमिनीत पृष्ठभागापर्यंत भरावा. परंतु पाणी साचणाऱ्या जमिनीत उंचवटे करावेत. लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे निवडावीत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्ष वयाच्या रोपांना पाच ते सहा पाने असावीत रोपे खात्रीशीर रोपवाटीकेतूनच खरेदी करावीत.

हेही वाचा:तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या किडी व त्यांचे व्यवस्थापन

नारळाचे खत व्यवस्थापन:

नारळ झाडे खताला चांगला प्रतिसाद देतात. झाडापासून उत्पादन कमी मिळणे, वाढ खुरटलेली राहणे, नारळ फळांना तडे जाणे जाणे, फळामध्ये बुरशी धरणे, फळे लहान असतानाच मोठ्या प्रमाणात गळ होणे. यामागील प्रमुख कारण म्हणजे त्यांना होणारा अपुरा अन्नपुरवठा होय. अनेक वेळा झाडांना फक्त शेणखत अथवा युरिया खतच दिले जाते, हे अयोग्य आहे. नारळ झाडास नत्र, स्फुरद आणि पालाश अशा तिन्ही अन्नघटकांचा योग्य प्रमाणात पुरवठा होणे महत्वाचे आहे. नारळ झाडास वयोमानानुसार शिफारशीप्रमाणे खते द्यावीत.

5 ते 6 वर्षाच्या नारळाच्या झाडास 50 किलो शेणखत, दोन किलो युरिया, तीन किलो सिंगल सुपर फॉस्पेट आणि साडेतीन किलो म्यूरेट ऑफ पोटॅश तीन समान हफ्त्यात द्यावे. (जून-सप्टेंबर व फेब्रुवारी) पैकी संपूर्ण शेणखत व सिंगल सुपर फॉस्पेट जून महिन्यातच एकाच वेळी द्यावीत. रोपे लावल्यानंतर पहिल्या वर्षी रोपांची मुळे 30 से.मी.अंतरापर्यंत सभोवती विखरून टाकावीत आणि खुरप्याच्या सहाय्याने मातीत मिसळावी. त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी खते देताना 30 से.मी.अंतर वाढवत जावे व पाचव्या वर्षी व त्या पुढे 1.5 ते 1.80 मीटर पर्यंतच्या अंतराने ती पसरून टाकावीत आणि ती मातीत मिसळावी.

नारळाच्या झाडास वयोमानानुसार द्यावयाची खत मात्रा

नारळाच्या झाडाचे वय (वर्ष)

शेणखत/कंपोस्ट खत (किलो/झाड)

रासायनिक खत मात्रा (ग्रॅम प्रती झाड प्रती वर्ष)

नत्र (युरिया )

स्फुरद (एसएसपी)

पालाश (एमओपी)

१०

२०० (४३४)

१०० (६२५)

४०० (६६८)

२०

४०० (८६८)

२०० (१,२५०)

८०० (१,३३६)

३०

६०० (१,३०२)

३०० (१,८७५)

१,२०० (२,००४)

४०

८०० (१,७३६)

४०० (२,५००)

१,६०० (२,६७२)

५०

१,००० (२,१७०)

५०० (३,१२५)

२,००० (३,३४०)

(  ) कंसातील आकडे हे खतांच्या मात्रा दर्शवितात.


लेखक:
डॉ. आदिनाथ ताकटे
(मृद शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
9404032389

English Summary: Fertilizer Management in Coconut Crop Published on: 08 September 2019, 05:08 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters