सध्या सर्व भागात केळीची तोडणी सुरू आहे. शेतकरी केळीच्या बागेतून जास्तीत जास्त उत्पन्न काढत आहे मात्र शेतकऱ्यांना फक्त केळीमधून नाही तर असे अनेक पर्याय आहेत ज्यामधून शेतकरी जास्तीत जास्त उत्पन्न काढू शकतो. केळी उत्पादक फक्त केळी विकून च त्यामधून उत्पन्न काढू शकतात असे नाही तर त्या केळी पासून पावडर तयार करून सुद्धा ते उत्पन्न दुप्पट करू शकतात. केळीची पावडर तयार करण्यासाठी त्यास कच्चा केळी ची गरज असते. केळीपासून जी पावडर तयार होते त्या पावडर ला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जे की शेतकरी केळी विकून जेवढ्या प्रमाणत फायदा काढून घेऊ शकत नाही तेवढ्या जास्त प्रमाणत केळीच्या पावडर मधून ते पैसे कमवू शकतात. पावडर मधून जर जास्त उत्पन्न पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला पावडर ची जास्तीत जास्त मार्केटिंग करावी लागेल.
अशा प्रकारे करावी पावडर तयार :-
१. सर्वात प्रथम तुम्ही हिरवी केळी ला १० ग्रॅम सोडियम हायपोक्लोराइट द्रावण देणे गरजेचे आहे. सोबतच १ ग्रॅम सायट्रिक ऍसिड १ लिटर पाण्यात ५ मिनिट बुडवावे जे की आवश्यक आहे.
२. वरील प्रक्रिया झाल्यानंतर केळी चे ४ मिमी तुकडे करावे व नंतर ते तुकडे जे द्रावण केले आहे त्यामध्ये बुडवावेत ज्यामुळे एंजाइमॅटिक ब्राउनिंग होणार नाही. यानंतर केळीचे जे काप आहेत ते काप ६० डिग्री सेल्सिअस पर्यंत कोरडे होण्यासाठी २४ तासासाठी ओव्हनमध्ये ठेवावे. जो पर्यंत केळीचे तुकडे पूर्णपणे कोरडे होत नाहीत तो पर्यंत तुम्हास जास्त काळजी घ्यावी लागणार आहे.
३. केळीचे काप हळूहळू ब्लेंडर आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावेत जे की पूर्ण बारीक पावडर होईपर्यंत त्याची प्रक्रिया करावी. जर केळी पिवळ्या रंगाची असेल तर त्याचा सुगंध असेल. जी तयार झालेली पावडर आहे ती पॉलिथिलीनच्या पिशव्या तसेच शिशाच्या बाटल्यांमध्ये पॅक करून २० - २५ अंश सेल्सिअस तापमानात ठेवावेत. असे केल्याने केळीची पावडर तयार होईल. या पावडर ला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे जे की शेतकऱ्यांना या पावडर पासून दुप्पट उत्पन्न निघेल.
४. मधुमेह तसेच हृदयरोग, त्वचेसाठी उपयुक्त, पचनशक्ती मजबूत करणे, वजन कमी करणे आणि वाढवणे यासाठी केळीची पावडर खूप फायद्याची आहे. एकदा की शेतमालाची आयात सुरू झाली की तुम्ही कंपन्यांची नोंदणी करून तुमची पावडर योग्य प्रकारे विकू शकता. रोज १ किलो ची जरी तुम्हास ऑर्डर आली तरी रोज कमीतकमी ७ किलो पावडर विकू शकता.
५. विद्यापीठात जी केळीपासून पावडर तयार होते त्या पावडर चे प्रमाणीकरण करण्यासाठी कृषी महाविद्यालयातील हॉर्टिकल्चर विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. के. प्रसाद यांनी डॉ. संजयकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळेत केले आहे.केळीची पावडर तयार करण्यासाठी त्या त्या जातींची लागवड सुद्धा करणे चालू आहे.
Share your comments