महाराष्ट्रात फळबाग लागवड करून शेतकरी चांगली तगडी कमाई करत आहेत. पारंपरिक पिक पद्धत्तीला आता शेतकरी फाटा देतांना दिसत आहेत. फळबाग लागवडीत महाराष्ट्र आता आपले मोलाचे स्थान बनवत आहे. महाराष्ट्रात द्राक्षे, पपई, डाळिंब केळी तसेच सीताफळ लागवड करून शेतकरी चांगले उत्पादन प्राप्त करत आहेत. अशाच फळबाग पिकांपैकी एक महत्वाचे पिक म्हणुन ओळखले जाणारे सीताफळ पिकाची लागवड महाराष्ट्रातील एका शेतकऱ्यांसाठी वरदान सिद्ध झाले आहे.
महाराष्ट्रातील मराठवाडा मधील लातूर जिल्ह्यातील बाळकृष्ण यांनी आपल्या पडीत जमिनीत सिताफळ लागवड केली आहे आणि ह्यातून ते लाखोंची कमाई करत आहेत. बाळकृष्ण ह्यांनी त्यांच्या पडीत पडलेल्या सहा एकर क्षेत्रात सीताफळ लागवड केली आहे. बाळकृष्ण सीताफळ लागवडीबद्दल बोलतांना सांगतात की, सीताफळ लागवड हि इतर पिकांच्या तुलनेत फायदेशीर आहे व सोयाबीन लागवडिपेक्षा हि कितीतरी अधिक पटीने उत्पन्न देते. बाळकृष्ण यांनी आपल्या सीताफळ बागेतून फक्त दोनच वर्षात तब्बल 40 लाख रुपयांची तगडी कमाई केली आहे आणि त्यामुळे ते आज खुप आनंदी आहेत. महाराष्ट्रात इतर फळाबागप्रमाणेच सीताफळच्या देखील खुप मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत आणि सीताफळ उत्पादक शेतकरी ह्यातून लाखो रुपये कमवीत आहेत. महाराष्ट्रात मराठवाड्यात बीड,औरंगाबाद, परभणी, लातूर तर विदर्भात भंडारा तसेच पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सातारा आणि खान्देशांत जळगाव जिल्ह्यात सीताफळ लागवड लक्षणीय आहे.
बाळकृष्ण यांनी केव्हा केली लागवड
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात बाळकृष्ण ह्यांचे शेत आहे. ते जानवल गावचे रहिवासी आहेत व तिथेच त्यांचे शेत देखील आहे. बाळकृष्ण यांचे पूर्ण नाव बाळकृष्ण नामदेव येल्लाळे असे आहे. बाळकृष्ण सांगतात की त्यांनी 2013 मध्ये सीताफळची शेती करण्यास सुरुवात केली. 2 हजारांहून अधिक सीताफळच्या रोपांची लागवड करण्यात आली. त्यांच्या खाली पडलेल्या पडीत जमिनीत त्यांनी 6 एकर वावरात सीताफळाची लागवड केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना सीताफळ पिकापासून उत्पादन 2019 पासून मिळायला सुरवात झाली.
त्यांनी 2020 मध्ये ह्या सीताफळच्या बागेतून 15 लाख रुपये कमावले होते. सोयाबीनपेक्षा त्यांना सीताफळच्या बागेतून जास्त नफा मिळत असल्याचे बाळकृष्ण सांगतात. बाळकृष्ण यांना सिताफळच्या लागवडीसाठी सुमारे 2 लाख रुपये खर्च आला होता. अशा प्रकारे 2 लाख रुपये खर्च करून बाळकृष्ण आज सीताफळ शेतीतुन 15 लाखांहून अधिकची कमाई करत आहेत. बाळकृष्ण यांना आतापर्यंत 40 लाख रुपयांचा नफा झाला आहे. आपला सीताफळचा माल बाळकृष्ण मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, इत्यादी बाजारात विकतात.
बाळकृष्ण हे इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श आहेत आणि बाळकृष्ण सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करत आहेत.
Share your comments