1. फलोत्पादन

सोमवार विशेष! शेतकरी आता घरीच उभारू शकतील सौरऊर्जेवर चालणारे कोल्डस्टोरेज युनिट

शेतकऱ्यांकडील सगळ्यात मोठी समस्या असते ती शेतमाल साठवणुकीची. त्यातल्या त्यात फळे, भाजीपाला आणि कांद्या सारखे नाशवंत शेतमालाची साठवणूक करणे फार महत्वाचे असते.बरेच शेतकरी पिकवलेला भाजीपाला आणि फळे कोल्ड स्टोरेज युनिटमध्ये ठेवण्यासाठी पैसे देतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा साठवणुकीवर चा खर्च देखील वाढतो. परंतु आता शेतकऱ्यांकडील ही समस्या संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण आता पुसा येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने सौर उर्जेवर चालणारेकोल्ड स्टोरेज बनवले आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
cold storage

cold storage

 या कोल्डस्टोरेज मला कुठल्याही प्रकारची वीज किंवा बॅटरी ची आवश्यकता नाही. कोणतेही शेतकरी हे कोल्डस्टोरेज आपल्या घरी सहजपणे उभारु शकतात. सध्या हे कोर्ट उत्तर प्रदेशातील पूर्वेकडील भागात असलेल्या शेतकऱ्यांसाठी उभारले जाणार आहेत.अपेडा कडून या भागात सौर उर्जेवर चालणाऱ्या या शीतगृहांची  उभारणी केलीजाणार आहे.

 या कोल्डस्टोरेज युनिट चे नाव पुसा सनप्रीझ असे असून हे कोल्ड स्टोरेज तुम्हाला घरच्या घरी उभारता येणार आहे. या इंग्लंड च्या साह्याने शेतमाल व इतर उत्पादने सौर  ऊर्जेच्या साह्याने थंड ठेवण्यात येतील.

या सणफ्रिज कोल्डस्टोरेज उभारणीसाठी साधारणतः तीन लाख रुपये खर्च येतो. तसेच याबाबतीतले ट्रेनिंग काही शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. सध्या या कोल्ड स्टोरेज चाचणीही उत्तर प्रदेश मधील वाराणसी आणि गाजीपुरपरिसरामध्ये यांचीचाचणी सुरू आहे.

 हे कोल्ड स्टोरेज अशा प्रकारे काम करते

 हे कोल्ड स्टोरेज निव्वळ सूर्यप्रकाश आधारे चालते.जितका जास्त सूर्यप्रकाश असतो तितका रेफ्रिजरेशन जलद होते.या कोल्ड स्टोरेजमध्ये दिवसाचे तापमान तीन ते चार अंशपर्यंत  राहते. 

हे कोल्डस्टोरेज चालवण्यासाठी पाण्याची बॅटरी बनवण्यात आली आहे फक्त पाण्यावर चालते. या कोल्डस्टोरेज छप्पर पीव्हीसी पाईप चेअसून ज्यामध्ये पाणी टाकले जाते. यापैकी किंमत देखील फार कमी आहे. पाण्याची बॅटरी  देखील पीव्हीसी पाईप पासून बनवली जाते जी रात्री खोली थंड ठेवते.छतावर सौर पॅनल असतात असतात आणि बाहेरील भिंत कापड आणि थर्माकोलची बनलेली असते.

English Summary: farmer can establish solar energy cold storage Published on: 27 September 2021, 02:49 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters