
फलोत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राला यंदा जादा पावासामुळे संकटात टाकले आहे. सततच्या पावसानंतर संत्रा , मोसंबी, द्राक्ष, डाळिंबाच्या उभ्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव तसेच फळगळीच्या समस्या उद्भवल्या आहेत. दरम्यान राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पावसामुळे काही भागाांमधील डाळिंब, द्राक्ष, संत्रा, मोसंबीच्या बागांना फटका बसला असल्याने फलोत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत.
नुकसानग्रस्त बांगाचे कृषी विभागाने लवकर पंचनामे करावेत, बागायतदारांना सावरण्यासाठी शासनाने विशेष पपॅकेज घोषित करावे, अशी मागणी जोर धरते आहे. दरम्यान विदर्भात झालेल्या पावसामुळे फळगळ होत आहे. साधरण ८० ते ९० टक्के फळगळ झाली आहे. नागपूर विभागात ४४ हेक्टर तर अमरावती भागात ६८ हजार हेक्टर संत्रा बागा उभ्या आहेत. सप्टेंबरअखेरीस ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून संत्रा अत्पादन सुरू होणार आहे. पण त्याआधीच मोसंबीवर ब्राऊन रॉट या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्र यामुळे बाधित झाले आहे.
नागपूर जिल्ह्यात सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्र लिंबूवर्गीय फळ पिकांखाली आहे. त्यातील सुमारे सात हजार हेक्टर मोसंबीचे उत्पादन होते. दरम्यान ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावासामुळे आर्द्रता वाढली. परिणामी बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. यातच मोसंबीवर ब्राऊन रॉट रोगाचा प्रादुर्भाव झाला. दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काटोल व नरखेड तालुक्यातील मोसंबी बांगाची पाहणी केली. मोसंबी उत्पादकांना सरकारकडून मदत मिळवून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले.