द्राक्ष बागेतील डाऊनी मिल्ड्यू म्हणजेच केवढा या रोगाचे प्रमाण सध्या फार वाढले आहे. द्राक्षांच्या हिरव्या आणि रंगीत अशा दोन्ही प्रकारच्या जातींमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो. या रोगाचे प्रामुख्याने लक्षण म्हणजे द्राक्षांच्या पानाच्या वरच्या पृष्ठभागावर पिवळटडागआणि खालच्या पृष्ठभागावर पांढऱ्या रंगाची बुरशी वाढलेली दिसते.
केवडा रोगाचा प्रसार रोखण्यासाठी हे करा
- या रोगाचा प्रसार रोखायचा असेल तर द्राक्ष बागायतदारानी द्राक्ष बागेत त्वरित मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी किंवा दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करू शकता.
- या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी बोर्डो मिश्रणाचा वापर देखील करता येतो. परंतु यामध्ये द्रावणाचा सामू, कॉपर सल्फेट आणि चुनखडी यांची गुणवत्ता काटेकोरपणे पाळणे महत्त्वाचे असते. बोर्डो मिश्रणाचा पीएच सात ते आठ दरम्यान असायला हवा आणि मिश्रणात जास्त मोरचूद असेल तर कोवळ्या पानांना अपाय होतो.म्हणूनच बोर्डो मिश्रणाचा वापर योग्य प्रमाणात आणि काळजीपूर्वक करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जातो. शक्यतो कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच बोर्डो मिश्रणाचा वापर करावा.
- या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संक्रमित झालेली पाने वेळीच काढून टाकायला हवेत. काढून टाकलेली संक्रमित पाने मुख्य द्राक्षाच्या बागेपासून दूर कंपोस्ट खड्ड्याची योग्य प्रकारे एकत्रितपणेकाढून टाकावे. संक्रमित पानाची छाटणी करताना किंवा काढून टाकताना बुरशीचे बीजाणू निरोगी वेलीवर पडून त्यांचा प्रसार वाढण्याचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी छाटणीनंतर लगेच मॅन्कोझेब किंवा ताम्रयुक्त बुरशीनाशकांचा फवारणी करायला हवी.
- केवडा रोगाचा प्रादुर्भाव अधिक असेल तर चार ग्रॅम पोटॅशिअम सॉल्ट फास्ट फोस्पेरिक ऍसिड घ्यावे, त्यावर दोन ग्रॅम मॅन्कोझेब प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळावे आणि या मिश्रणाची फवारणी करावी.
- या रोगाचा जर अधिक प्रादुर्भावामुळे लोक आटोक्याबाहेर जात आहे असे दिसून आल्यास डायमेथार्फकिंवा मेंडीप्रोफामाईडएक ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी किंवा आपणएमीसीलब्रोनसारख्या आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करू शकता.
- जिवाणूजन्य करपा नियंत्रणात येत नसेल तर कासुगमायसीनसोबत कॉपर ऑक्सिक्लोराईड साडेसातशे ग्रॅम प्रति हेक्टरी या प्रमाणात फवारणी करावी. या फवारणीमुळे बुरशीजन्य करपा या रोगाला आळा बसण्यास मदत होते.
(अधिकच्या उपाययोजनांसाठी शेतकऱ्यांनी कृषी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा)
Share your comments