1. फलोत्पादन

राज्यात होते 'या' पाच सीताफळांची लागवड; एका झाडाला येतात १५० फळे

आजची परीस्तीती बघता शेतकरी मित्राला फळबागेकडे वळणे गरजेचे आहे. कारण अनियमित पाऊस, बदलते हवामान, दुष्काळ आणि बरेच असे नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावत आहे.

KJ Staff
KJ Staff


आजची परीस्तीती बघता शेतकरी मित्राला फळबागेकडे वळणे गरजेचे आहे. कारण अनियमित पाऊस, बदलते हवामान, दुष्काळ आणि बरेच असे नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावत आहे. त्याचबरोबर आपल्या देशाचे पंतप्रधान यांनीदेखील २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे ठरविले आहे, त्यामुळे शेतकरी मित्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे आहे. शेतकरी मित्राचे उत्पन्न वाढवायचे म्हटलं तर फळबागेकडे वळणे गरजेचे आहे. फळबाग म्हटलं तर पाणी जास्त पाहिजे. पण कमी पाण्यामध्ये उत्कृष्ट आणि चांगले उत्पन्न व कमी खर्चात जास्त उत्त्पन्न मिळवून देणार पीक म्हणजे सीताफळ. 

सीताफळचे वैशिष्ट्ये

झाडाची उंची ५-६ फुट, कार्बोदकेचा प्रमाण जास्त आहे. साखर २.५%, प्रथिने १.६% कॅल्चीम, १७ एमजी /१००ग्राम फोस्फोरूस,  ४७ एमजी /१०० ग्राम आईरोन १.५ एमजी / १०० ग्राम.   उष्ण काटीबंधीय वातावरण आणि आद्रता आणि मधम स्वरूपाचा हिवाळा हे  सीताफळाच्या वाढीसाठी आणि फळासाठी उपयुक्त आहे. उष्णता ४० डिग्री  सेल्सिअसपर्यंत सहन करू शकते.

 जमीन :

सीताफळ हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत व्यवस्थित येऊ शकते. त्यामुळे सीताफळाची लागवड डोंगर उतार तसेच उथळ जमिनीतही केलेली दिसून येत्ते. जमिनीचा सामू ६.५ ते ८.५ च्या दरम्यान असावा. सीताफळाची मुळे जमिनीत खोलवर जात नाहीत. ती वरच्या थरातच राहतात त्यासाठी उत्तम निचरा होणारी हलकी, मुरमाड, मध्यम खोलीची जमीन सीताफळ लागवडीस योग्य असते. शेवाळयुक्त, गाळमिश्रीत, रेताड तसेच लाल जमिनीतही सीताफळाची झाडे निकोपपणे वाढतात. परंतु, जास्त चुनखडी,  भारी काळी व पाण्याचा निचरा न होणारी होणाऱ्या जमिनी सीताफळ लागवडीस अयोग्य ठरतात. सीताफळाच्या झाडाभोवती पाणी साचणे अपायकारक असते. जमिनीखालील पाण्याचा ताण झाडे सहन करु शकतात.

जाती :

सीताफळाच्या बाळानगर, अर्का, पिंक माम्मोथ, सहानऍनोना-२, लाल सीताफळ,  मेमॉथ, दौलताबाद, टी.पी.-७, धारूर-६, धारूर-३, बार्बाडोस, इत्यादी जातींची लागवड करतात. यापैकी महाराष्ट्रात बाळानगर व अर्का पाच या जातींची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

 

1) बाळानगर -महाराष्ट्रात ही जात अत्यंत लोकप्रिय आहे. या जातीच्या फळांची प्रत चांगली आहे. फळांचे सरासरी वजन ३६० ग्रॅम असून फळामध्ये सरासरी ४० बिया असतात. फळामध्ये बी कमी व गर जादा असतो. गराची चव अतिशय चांगली आहे. गरात साखरेचे प्रमाण साधारण असल्याने टिकाऊपणा जास्त आहे. पूर्वी बाळानगरमध्ये अशा सीताफळांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे ‘बाळानगर’ याच नावाने ही जात संबोधली जाते. प्रक्रिया उद्योगांमध्ये या वाणाचा गर वापरला जातो. इतर वाणांपेक्षा या सीताफळाला बाजारभाव चांगली मिळतो.  या वाणाच्या बियांपासून रोपे महाराष्ट्रात १० ते १५ वर्षापासून शासनामार्फत वाटल्यामुळे बऱ्याच ठिकाणी बाळानगर वाणाच्या सीताफळाच्या बागा दिसतात.

2)अर्का सहन- हे सीताफळ गुणवत्तेच्या बाबतीत खूप सरस आहे.  यामध्ये गोडपणा जास्त असून त्याचे वजन एक ते दीड किलो असते. फळांमध्ये ब्रिक्स ३२ टक्के आणि साखरेचे प्रमाण २२.८ टक्के एवढे असते. त्यामधील बियाही कमी असतात. या फळांचे वजन फळाच्या वजनाच्या केवळ १० टक्के आहे. या जातीच्या परागीकरणास हाताने परागीकरण करावे लागते. जेणेकरून फळाची वाढ योग्यरीतीने होऊन फळांचे चांगले उत्पादन होण्यास मदत होते. तसेच फळांचा आकारही वाढतो, हस्तांतरित परागीकरणामुळे बाजारपेठेत मालाला भावही चांगला मिळत असतो. एक मजूर एका तासामध्ये जवळजवळ १५०-२०० फुलांचे परागीकरण करू शकतो. या जातीमध्ये ८ वर्षांमध्ये ४०-४५ किलो उत्पादन एका झाडापासून निघते.  त्याचप्रमाणे एकरी १० टनाएवढे उत्पादन आहे.

३) ऍनोना-२ - ही जात सीताफळ व चेरिमोया या जातींचा संकर करून प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, गणेशखिंड पुणे येथे विकसित करण्यात आलेली आहे.

४) लाल सिताफळ - या सिताफळाची झाडे कमी उंचीची असून पाने लहान असून मधली शीर जांभळट रंगाची असते. एका झाडांपासून ५० ते ७५ फळे मिळतात. फळामध्ये बियांचे प्रमाण जास्त असून गर रंगाने गुलाबी व साधारण चवीचा असतो. फळ बाहेरून लालसर जांभळ्या रंगाचे दिसते.

५) वॉशिग्टन - या वाणाची लागवड महाराष्ट्रात फारच कमी आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेशात या वाणाची झाडे पाहायला मिळतात. फळे आकाराने लहान १६५ ग्रॅम वजनाची असतात. गर लोण्यासारखा मऊ, पिवळसर छटा असलेला दिसतो.

लागवड :

सीताफळाची लागवड साधारणतः जून-जुलै किंवा पाण्याची व्यवस्था असल्यास जानेवारी – फेब्रुवारीमध्ये करावी.  हलक्या जमिनीत ५ x ५ मी. व मध्यम ते भारी जमिनीत ६ x ६ मी. अंतरावर लागवड करावी. लागवड करण्यापूर्वी जमिनीत ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे मार्च – एप्रिल महिन्यातच खोदावेत. जून महिन्याच्या सुरुवातीस खड्ड्यात तळाशी पालापाचोळा टाकावा. शेणखत,  माती,  लिंडेन पावडर व एस.एस.पी.ने प्रत्येक खड्डा भरून घ्यावा. पहिला पाऊस पडल्यानंतर त्यात रोपाची लागवड करावी.

 

अन्न्यद्रव्ये व्यवस्थापन खालीलप्रमाणे खतांचे नियोजन करावे.

१) सेंद्रिय खत - १० ते १५ किलो प्रति झाडास चांगले कुजलेले शेणखत,  कंपोस्ट खत किंवा गांडूळखत घालावे. मोठ्या झाडांना ५० किलो प्रति झाड याप्रमाणे घालावे.

२) जैविक खते - नत्र स्थिर करणारे जीवाणू - ॲझोटोबॅक्टर - ५० ग्रॅम प्रति झाड. स्फूरद विरघळविणारे जीवाणू - पी.एस.बी - ५० ग्रॅम प्रति झाड. पालाश उपलब्ध करणारे जीवाणू - के. एम. बी. - ५० ग्रॅम प्रति झाड याप्रमाणे सेंद्रिय खतासोबत द्यावेत.

३) रासायनिक खते लागवडीच्या पहिल्या वर्षी १० किलो शेणखत ५० ग्रॅम नत्र, २५ ग्रॅम स्फुरद व २५ ग्रॅम पालाश ही खते द्यावीत.  दरवर्षी वाढवत जाऊन पाच वर्षे व त्यापुढील वयाच्या झाडांना २५० ग्रॅम नत्र, १२५ ग्रॅम स्फुरद व १२५ ग्रॅम पालाश द्यावे. नत्र दोन समान हप्त्यांमध्ये विभागून द्यावे.

पाणी व्यवस्थापन :

सीताफळ हे जरी कोरडवाहू फळपीक असले तरी सुद्धा व्यापारी तत्त्वावर भरपूर व उत्कृष्ट दर्जाच्या उत्पादनासाठी पाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते. फळवाढीच्या काळात पाण्याचा ताण पडल्यास तसेच झाडे फुलांवर असताना व परागसिंचन भरपूर होण्यासाठी बागेमध्ये थंडावा ठेवावा लागतो.

छाटणी :

या झाडास नियमित छाटणीची गरज नसते, तथापि झाडाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळातच वळण देणे गरजेचे असते. त्यासाठी हलकी छाटणी करावी. छाटणी ही जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात करावी. यामध्ये जमिनीपासून एक मीटर उंचीपासून मुख्य खोडावरील फुटवे काढून टाकावेत. मुख्य खोडावर चार ते पाच मुख्य फांद्या सर्व दिशांना विखुरतील अशा बेताने वाढवून त्यावर दुय्यम फांद्या वाढवाव्यात. फांद्यांची जास्त गर्दी करू नये. वाळलेल्या, रोगट, अनावश्यक व गर्दी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात.

 


आंतरपिके
 :

पिकाच्या लागवडीनंतर सुरुवातीची दोन वर्षे बागेत सर्वसाधारणपणे कोणतेही हंगामी पीक घेता येते. परंतु द्विदलवर्गीय पिके घेतल्यास जास्त फायदा होतो. काही प्रमाणात तेलवर्गीय पिके घेतल्यास हेक्टरी नफ्याचे प्रमाण वाढते. सीताफळामध्ये प्रामुख्याने कांदा,  काकडी,  मूग,  चवळी, सोयाबीन, उडीद,  मटकी,  हरभरा,  तीळ,  भुईमूग कमी उंच वाढणारी पिके आंतरपिके म्हणून घेता येतात. तसेच धैंचासारखी हिरवळीची पिके घेतल्यास तणांचा बंदोबस्त होण्यास मदत

काढणी व उत्पादन : 

सीताफळाच्या झाडांना जून-जुलैमध्ये फुले येण्यास सुरुवात होते. फुले आल्यापासून फळे तयार होण्यास साधारणपणे ५ महिन्यांचा कालावधी लागतो. फळे सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये तयार होतात.
सीताफळाच्या कलमी झाडांना लागवडीनंतर चौथ्या वर्षी फळे लागतात. तर बियांपासून अभिवृद्धी केलेल्या झाडांना लागवडीनंतर सहाव्या वर्षापासून फळे लागतात. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तयार होतात. दरवर्षी प्रत्येक झाडापासून ११३–२२६ ग्रॅ. वजनाची ६०–७० फळे मिळतात. जसजसे झाडाचे वय वाढते तसतसे उत्पादनही वाढते. सर्वसाधारणपणे ६ ते ७ वर्षे वयाच्या झाडाला १०० ते १५० फळे येतात.
फळे कृत्रिम परागण करुन हे उत्पन्न वाढविता येते. ही झाडे १५–२० वर्षे जगतात.

सीताफळाची योग्यवेळी काढणी करावी. पक्के सीताफळ झाडावर जास्त काळ राहू दिल्यास फळांना तडे पडतात आणि फळे कुजू लागतात. सीताफळाच्या फळांचे डोळे उघडून दोन डोळ्यांमधील भाग पिवळसर रंगाचा दिसू लागल्यावर फळे काढणीस तयार झाली असे समजावे. फळांची काढणी केल्यानंतर फळे ३-४ दिवसांत नरम पडून खाण्यायोग्य होतात. सिताफळाची फळे नशावंत असल्यामुळे काढणीनंतर जास्त दिवस टिकत नाहीत.

कीटक :-

मिली बग्स: (फेरीशिया व्हर्गाटा, मॅकोनेलिकोकस हिस्टस)

यामुळे फळांवर डाग येऊ शकतात आणि ०.०5 टक्के फवारणीद्वारे कीटक नियंत्रित केले जाऊ शकते.

डिक्लोरव्होस संदर्भ घ्या: नवीन कीटकनाशकासाठी पूर्व विभाग

रोग :-   

लीफ स्पॉट:प्रभावित पाने अकालीच खाली पडतात. 0.05% कॅरेबेंडाझिम च्या साह्याने  पंधरवड्यावरील फवारण्यांनी हे नियंत्रित केले जाऊ शकते.   एन्थ्रॅकोनोजः (ग्लोमेरेला सिंगुलाटा)संसर्गाची सुरुवात फळाच्या कळीस शेवटी होते आणि नंतर संपूर्ण फळाच्या पृष्ठभागावर पसरते,बाधित फळांचा नाश झाला आणि ते झाडाला चिकटून बसल किंवा पडले.

 

लेखक - 

प्रदीप बबनराव काकडे

एम.स.सी फळ विज्ञान

व ना म कृ, परभणी , मो न : ९१६८४२८६९८

English Summary: Custard Apple horticulture : these five varieties farming in state; 150 fruits come on one tree Published on: 25 June 2020, 06:57 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters