नियमित आणि भरपूर उत्तम दर्जाची फळे येण्यासाठी जमीन सुपीक ठेवणे जरुरीचे असते. फळ झाडांची वाढ आणि त्यावर होणारी फळधारणा जमिनीतून मिळणाऱ्या पोषक अन्नद्रव्येवरआणि स्थानिक हवामानावर अवलंबून असतं. झाडांची निकोप वाढ व्हावी म्हणून खतांचा संतुलित पुरवठा,पाणीपुरवठा,सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन म्हणून उपयोग,अच्छादन इत्यादी मार्गांनी जमिनीची सुपीकता चांगली ठेवणे फायद्याचे ठरते.
राज्यातील अवर्षणप्रवणभागामध्ये डाळिंब हे फळपीक शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे.आपल्याकडील उपलब्ध हवामान,जमिनीचा योग्य वापर,झाडांची आगळीवेगळी शरीरक्रिया, फळांना बाजारपेठेमध्ये असलेली वर्षभर मागणी लक्षात घेता येण्यासारखा वर्षभरातील कोणताही बहारआणि निर्यातीस असलेला प्रचंड अभाव इत्यादी बाबींमुळे डाळिंब लागवड क्षेत्रात दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे.
फळझाडांची लागवड केल्यानंतर नियमित आणि भरपूर उत्तम दर्जाचे फळे येण्यासाठी जमीन सुपीक ठेवणे जरुरीचे आहे. फळ झाडांची वाढ आणि त्यावर होणारे फळधारणा जमिनीतून मिळणाऱ्या पोषक अन्नद्रव्येवर आणि स्थानिक हवामानावर अवलंबूनअसते.त्यामुळे या दोन महत्त्वाच्या बाबी पैकी जमिनीच्या सुपीकता कडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.डाळिंब फळ पिकाचा विचार केला तर हे पीक हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीत अत्यंत चांगल्या प्रकारे घेता येते.
.झाडाची वाढ त्याचप्रमाणे फळांची प्रत आणि रंग अशा प्रकारच्या जमिनीमध्ये चांगला येतो.जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण अत्यल्प असल्यास झाडांची वाढ चांगली होते.जास्त भारी जमिनीत झाडांची वाढ होत असली तरी झाडाला पुढे विश्रांती देणे कठीणहोते. या लेखात आपण डाळिंबाची लागवड कशी करावी याबद्दल माहिती घेऊ.
डाळिंबाची लागवड कशा पद्धतीने करावी?
1×1×1 मीटर आकाराचे खड्डे 4.5 मिटर ×3.0 मीटर अंतरावर घ्यावेत. याप्रमाणे हेक्टरी 740 झाडे बसतात.मर रोग जमिनीतून मुळांद्वारे सुद्धा पसरतो.म्हणून कमी अंतरावरील लागवड रोग बळावण्यास मदत होते. खड्डा लागवडीच्या कमीत कमी एक महिना आधी घेऊन तसेच उन्हात तापू द्यावेत.त्यामुळे काही प्रमाणात नैसर्गिक निर्जंतुक करण्यास मदत होते. खड्ड्यांमध्ये कार्बेन्डाझिम 0.2 टक्के द्रावण पाच लिटर प्रति खड्डातटाकावे.याच बरोबर क्लोरोपायरीफॉस 50 मिलि प्रति खड्डा खड्ड्याच्या तळाशी व बाजूने खड्डे भरण्यापूर्वी टाका. खड्डे कॅल्शियम हायपोक्लोराइटने100 ग्रॅम प्रति खड्डा भरण्यापूर्वी टाकून निर्जंतुक करावे. खड्डे भरताना जर माती असेल तर त्यामुळे वाळू आणि माती 1:1 या प्रमाणात घेऊन त्यामध्ये येथे दिल्याप्रमाणे खत टाकावे.
- शेणखत दहा किलो ग्रॅम घ्यावे.
- गांडूळ खत एक किलो ग्राम
- निंबोळी पेंड 0.5 किलोग्रॅम
- ट्रायकोडर्मा प्लस 25 ग्राम
- स्फुरद विरघळणारे जिवाणू 25 ग्राम
- सुडोमोनास फ्लूरोसन्स 25 ग्रॅम
- ऍसिटोबॅक्टर 25 ग्रॅम
डाळींबाला खते कशी द्यावी?
डाळिंबाला खते देताना 21 ते 25 सेंटीमीटर खोल चर घेऊन खोडापासून 30 ते 45 सेंटिमीटर लांब आणि झाडांच्या घेराबाहेर30 ते 45 सेंटिमीटर परंतु आळ्यात खते द्यावी. हलके आणि मुरमाड जमिनीत अगर डोंगर उतारावर नत्रयुक्त खत दोन आपल्यापैकी तीन हप्त्यांत विभागून द्यावे. पहिल्या वर्षी खते विभागून,दर महिन्यात पाण्याबरोबर द्यावी. दुसऱ्या वर्षापासून जानेवारी- फेब्रुवारी, जून आणि जुलै तसे सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये नवीन पालवी येते.त्यावेळी खताचे हप्ते विभागून द्यावे
.दुसऱ्या वर्षी फळधारणा होण्यास सुरुवात होते. त्यावेळी ताना नंतर पहिल्या पाण्याच्या वेळी अर्धे नत्र,फळांच्या गाठी धरल्यानंतर दोन ते तीन वेळा विभागून द्यावे.पाण्यात विरघळणारी रासायनिक खते योग्य त्या प्रमाणात वापरता येतात ववापरण्यास सोपी असतात.तसेच पिकांना लगेच उपलब्धहोतात. विद्राव्य खते ही ठिबक सिंचनाच्या माध्यमातून रोज किंवा एक दिवसाआड विभागून दिली जातात. त्यामुळे झाडांच्या मुळी क्षेत्रात खते रोज उपलब्ध असतात. त्याचा मोठा फायदा पिकांना होतो.त्याचप्रमाणे विद्राव्य खते आम्लयुक्त असून,क्लोरीन व सोडियम या हानिकारक क्षारापासून मुक्त असतात. विद्राव्य खते वापरल्याने एकूण पारंपरिक खतांचे 25 टक्के बचत होते.
Share your comments