वनस्पती शास्त्रामध्ये जोजोबा पिकाचे शास्त्रीय नाव सिमोसिया चिनेसिन्स असे आहे. ही वनस्पती मूळची अॅरोझॉंन खोरे, मॅस्सीको, वाळवंट व कॅलीफोर्निया या देशातील आहे. ही वनस्पती सदाहरीत व झुडूप वजा जंगली पीक आहे. या पिकात पानगळ होत नाही. या पिकाच्या पानात विषारी घटक असल्याने पाला शेळ्या, मेंढ्या अगर गुरे खात नाहीत. जोजोबाचे मुळे पाण्यासाठी खोलवर पसरतात. पाणी शोषण करून घेतात. या वनस्पतीत घेतलेले पाणी साठवून ठेवून पाहिजे त्यावेळी वापर करण्याचा अनोखा गुण असल्याचे जगभरच्या संशोधकांना दिसून आले आहे. या गुणधर्मामुळेच हे पीक दिर्घायु बनले आहे. एकदा लागवड केलेले जोजोबाचे झाड १५० ते २०० वर्ष जगते. तोपर्यंत फळे व बी देतच राहते.
महत्त्व :
१) हे पीक हलक्या माळाचे पडीक व जेथे काही येत नाही अशा जमिनीत येते.
२) कोणत्याही बागायत पिकापेक्षा जादा अर्थार्जन देणारे हे पीक आहे.
३) क्षारपड, खारवट, चोपण, करल चोपण जमिनीत देखील हे वाढते व चांगले उत्पादन देते.
४) या पिकाचे सर्वात मोठे महत्त्व व वैशिष्ट्य म्हणजे कमी वृष्टी, अतिवृष्टी, धुके, वादळ, कडकडून कडक थंडी या सर्वांना तोंड देते. थोडक्यात कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला नुकसान होऊ देत नाही.
५) सध्या आंतराष्ट्रीय पातळीवर २२ देशात लागवड असलेने बी, रोप व प्रक्रिया पदार्थ याची देवाण - घेवाण होते व चालू आहे.
६) याची लागवड बी लावून, रोपे करून व छाट कलमे वापरून ही करता येते.
७) याची पाण्याची गरज २५० मिली मिटर पाऊस इतकी कमी आहे. त्यामुळे राज्याचा दुष्काळी पट्टा व कमी पावसाचे प्रदेशात ते व्यापारीदृष्ट्या यशस्वी होऊ शकते. ८) दोन ओळीत १ ले तीन वर्षे आंतरपिके घेता येतात.
९) याची लागवड, जोपासना तंत्र सोपे व सुलभ आहे.
१०) याचे तेलाचा विविध पद्धतीने वापर होतो. या बियापासून तेल मिळते.
११) लागवड खर्च कमी, उठाठेव कमी, पीक संरक्षण खर्च कमी हे अनेक फायदे.
१२) पानात विषारी घटक असल्यामुळे शेळ्या, मेंढ्या अगर जनावरे खात नाहीत, कुंपण म्हणून हरणापासून रक्षणार्थ नमुनेदार व आदर्श पीक .
१३ ) शोभिवंत झाडे या नात्याने उद्यानात लावावे.
१४ ) जोजोबा तेलापासून सौंदर्य प्रसाधने, औषधे, वंगणे, पेंड, इतर बहुविध उपयोग होतात. ही सदाहरीत झुडूप वर्गातील वनस्पती आहे.
१५ ) ३ - ४ वर्षानंतर बी व त्यापासून तेल मिळते १५० ते १६० वर्षे मिळतच राहते.
१६) याचे तेलावर तापमानाचा किंवा दाबाचा परिणाम अजिबात होत नाही.
१७) याचे वाढीमुळे प्रदूषणाला काही प्रमाणात आळा बसतो.
१८) खाद्य तेल व कमी कॅलरीजचे आरोग्यदायक तेल म्हणून वापरता येते. मात्र याची किंमत आपले इतर खाद्यतेलाचे ६ ते ८ पट जादा आहे.
१९) पेट्रोलियम पदार्थाला व तेलाला नवा पर्याय ठरवण्याचे संशोधन याच तेलावर जगभर चालू आहे.
२०) अत्यंत महागड्या क्रिममध्ये जोजोबा तेलाचा वापर होत असल्याने या तेलाची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते, शिवाय आकर्षक बाजारभाव सतत मिळतात.
२१) विजेच्या ट्रान्सफार्मरमध्ये थंडावा राखण्यास याचे तेल वापरतात.
२२) औषधी आवरणावरील (कॅपसुल) भाग यापासून बनवतात.
२३) न वितळणारी मेणबत्ती यांचे तेलापासून बनवतात.
२४) स्पर्म व्हेल माशाचे तेलाला पर्याय व व्हेल माशाचे संरक्षण यासाठी जोजोबा तेलाचा जगभर वापर वाढला आहे. व्हेल माशाचे तेलाला दुर्गंधी असते. जोजोबा तेलाला ती नसते. हा या तेलाचा नवा फायदेशीर गुणधर्म ठरला आहे.
जोजोबाचे महत्त्व व फायदे स्थुलमानाने लक्षात घेता पडीक माळाचे हलक्या, बरड्या व नापेर पडलेल्या जमिनीत हे पीक करा व ४ - ५ पिढ्याचे दारिद्रय दूर करा. हा नवा व महत्त्वाचा संदेश या पिकापासून मिळतो.
जोजोबाचे द्रवरूप आणि घनरूप वॅक्संचे भौतिक व रासायनिक गुणधर्म पुढीलप्रमाणे आहेत._
१) गोठण बिंदू -१६६ डी. ते १६७ डी. सी.
२) विलय बिंदू - ६.८ ते ७ डी. सी.
३) घुम्र बिंदू - ११५ डी. सी,
४) फ्लंश पॉईंट बिंदू - २९५ डी. सी.
५) उत्कलन बिंदू - ४२० डी. सी.
६) रिफरेक्टीव्ह इंडक्स -१.४६५० ,
७ ) विशिष्ट वस्तूमान - ०.८६३,
८ ) आयोडीन व्हेल्हा - ६२
९ ) संपनोफिकेशन व्हेल्यू - ९२
१० ) आम्लाचे प्रमाण - २
११) अल्कोहोल मधील आयोडीन - ७७
१२ ) मेदाम्लातील आयोडीन - ७६
१३ ) सरासरी वस्तूमान - ६०६,
१४) तेलाचा विलयन बिंदू - ६८ ते ७० डी. सी,
१५ ) तेलाची - २५० डी. सी
जमीन :
हे पीक हलक्या, माळाच्या कमी खोलीच्या जमिनीत येते. खारवट, करल चोपन जमिनीत वाढते व चांगले उत्पादन देते. त्याचप्रमाणे मध्यम खोलीच्या उत्तम निचऱ्या च्या मध्यम जमिनीत चांगले वाढून जादा उत्पदान येते.
त्याचप्रमाणे मध्यम खोलीच्या उत्तम निचऱ्या च्या मध्यम जमिनीत चांगले वाढून जादा उत्पदान येते. जर मुरलेल्या जुन्या बागायत व लेव्हल जमिनीत याची लागवड महाराष्ट्रात काहींनी केली तर त्यांना ४ पट जादा बी (उत्पादन) मिळते. जास्तीत जास्त उत्पादन व सर्वोत्तम अर्थार्जनासाठी हे पीक बागायत जमिनीत घ्यावे. दुष्काळ व टंचाई काळात उत्पन्न कमी मिळेल. मात्र बाग काढणेची जरुरी पडत नाही. याची वाळलेली झाडे पुन्हा पाऊस व पाणी मिळताच एकदम फुटतात व उत्पादनक्षम बनतात. ही आपल्या दुष्काळी विभागाचे दृष्टी ने अत्यंत महत्त्वाची बाब ठरते.
कोरडवाहू फळबागात आंतरपिक म्हणून लांब अंतराचे आंबा, चिंच, चिकू या फळबागात घ्यावे व दोन्हींचे उत्पादन काही दिवस घेऊन नंतर १५ -२० वर्षांनी फळबाग कमी कमी करीत जावे.
आपणाकडे जादा पाणी, सतत ऊस तसेच घाण पाणी वापराने सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये नापेर पडीक जमिनी खूप झाल्यात. बोअरच्या खारट व क्षारयुक्त पाण्यानी जमिनी वरचेवर पडीक व नापेर होत आहेत. चोपण व करल जमिनीत हे पीक करता येते. मात्र अशा ठिकाणी मिश्र पीक न करता स्वतंत्र जोजोबा करावा.
हवामान :
जगात सध्या ज्या ठिकाणी जोजोबा हे पीक यशस्वी झाले त्या २२ देशात हे पीक उष्ण व समशितोष्ण कटीबंधात पीक घेतात व त्या ठिकाणी ते चांगले आले आहे.
दुष्काळी व टंचाईचे भागात कमी पाण्यावर जोजोबा जगू शकतो, वाढू शकतो, उत्पादनक्षम राहून चांगले अर्थार्जन देतो. भारतात राजस्थानचे वाळवंटात व कमी पावसाचे प्रदेशात हे पीक सतत वाढत आहे. साधारण ५ ते २० इंच पाऊस (सरासरी ६२५ मिली मिटर) व भरपूर तापमान ३२ ते ४२ डी. सें.ग्रे. या हवामानात उत्तम येतो. जगभर या पिकावर मोठे संशोधन झाले आहे. १०८० ते २५०० फुट समुद्र सपाटीपासून उंचीवर हे पीक घेण्याची शिफारस आहे. खारट, चोपण, कराल. क्षारयुक्त जमिनी व पाण्यातही हे पीक उत्तम येते.
लेखक - विजय भुतेकर सवणा
Share your comments