1. फलोत्पादन

डाळिंब फळ तडकणे : कारणे आणि उपाय योजना

महाराष्ट्रात कमी पाण्यात कोरडवाहू क्षेत्रात वरदान ठरलेल्या डाळिंब पिकामध्ये बऱ्याच प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये मररोग, तेलकट डाग रोग, फळे तडकणे, उत्पादित आयुष्य कमी मिळणे, इत्यादी डाळिंब बागेचे नियोजन करताना जमिनीची योग्य निवड केल्यास व माती परीक्षणामुळे संतुलित खतांचा वापर आणि बागेत स्वच्छता ठेवल्यास बागेची उत्पादित आयुष्य वाढवता येते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
cracking pomegranet

cracking pomegranet

महाराष्ट्रात कमी पाण्यात कोरडवाहू क्षेत्रात वरदान ठरलेल्या डाळिंब पिकामध्येबऱ्याच प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये मररोग, तेलकट डाग रोग, फळे तडकणे, उत्पादित आयुष्य कमी मिळणे, इत्यादी डाळिंब बागेचे नियोजन करताना जमिनीची योग्य निवड केल्यास व माती परीक्षणामुळे संतुलित खतांचा वापर आणि बागेत स्वच्छता ठेवल्यास बागेची उत्पादित आयुष्य वाढवता येते.

 अहमदनगर, सांगली, सोलापूर आणि नाशिक भागातल्या डाळिंब बागेत काही वर्षापासून पक्व होणाऱ्या डाळिंबफळांवर तेलकट चट्टे आणि फळे तडकण्याची  विकृती मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. साधारणपणे 15 ते 20 टक्के नुकसान फळे तडकल्याने  होते.तडकलेली फळे जरी गोड असली तरी ती साठवून ठेवता येत नाहीत. आणि उशिरा विक्रीस ती अयोग्य ठरतात.फळे भेगाळल्या ने त्यांच्या वजनात आणि रसाच्या प्रमाणात घट होते

  • फळे तडकण्याची कारणे :-
  • फळ तडकने हे केवळ एकाच कारणामुळे न होता त्यास अनेक कारणे कारणीभूत आहेत. त्यामध्ये चुकीचे पाणी व्यवस्थापन,जमिनीतील निवड, हवामानातील बदल, तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव इत्यादी.
  • अतिशय हलक्‍या जमिनीत नांगरणीच्या तासात रोपांची लागवड.
  • जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण12 टक्के पेक्षा जास्त असणे.
  • जमिनीमध्ये नत्र, स्फुरद या मुख्य अन्नद्रव्य बरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम या दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता तसेच बोरॉनया सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असणे.
  • हवेतील तापमान वआद्रतेतविशेषत: रात्र व दिवसातील होणारी तापमानात तफावत.
  • अवर्षणासारखी परिस्थिती जास्त कालावधीसाठी राहिल्यास फळांची सालकडकहोते. अशा परिस्थितीत एकाएकी पाऊस झाल्यास किंवा भरपूर पाणी दिल्यास फळांच्या तडकण्याच्या प्रमाणात वाढ होते.
  • उपाय योजना :-
  • डाळिंबासाठी मध्यम, निचऱ्याची जमीन निवडावी, रोपांची लागवड ही 2×2×2 फूट लांबी × रुंदी × खोलीचे खड्डे घेऊन त्यामध्ये माती +2 घमेले कुजलेले शेणखत +1/2 किलो सुपर फास्फेट + 50 ग्रॅम फोरेट यांचे मिश्रण करून खड्डे भरून रोपांची लागवड करावी.
  • माती परीक्षणासाठी प्रतिनिधिक स्वरूपाचा खड्डा घेऊन प्रत्येक एक फूटातील मातीचा पहिला थर, दुसरा थर आणि तिसऱ्या फुटातमाती असल्यास तिसरा थर अशा थराप्रमाणे माती घेऊन त्याची प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी.
  • माती परीक्षण अहवालामुळे सामू हा 6.5 ते 8.0 पर्यंत असावा. विद्युत वाहकता (क्षारता ) ही50 डेसी सायमन प्रति मीटर पेक्षा कमी असावे तसेच मुक्त चुनखडीचे प्रमाण सर्व थरात बारा टक्के पेक्षा कमी असावे.
  • माती परीक्षणावरून डाळिंबास शिफारस केल्याप्रमाणे पूर्ण वाढलेल्या झाडास शेणखत चार ते पाच घमेले तसेच 625 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅमस्फुरद आणि 250 ग्रॅम पालाश प्रति वर्ष प्रति झाडास ताण संपल्यानंतर पहिले पाणी देण्यापूर्वी द्यावे. उर्वरित नत्राची मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून द्यावे.पहिली मात्रा ताण संपल्यानंतर बेसल डोस च्या वेळी व उर्वरित मात्रा बहारानंतर 45 दिवसांनी आळे पद्धतीने द्यावी.
  • जमिनीतील मुक्त चुनखडीचे प्रमाण पाच टक्के पेक्षा कमी असल्यास स्फुरद हे सिंगल सुपर फॉस्फेटद्वारे द्यावे म्हणजे या खताद्वारे स्फुरदा व्यतिरिक्त कॅल्शियमचा पुरवठा झाडांना होतो. तसेच मॅग्नेशियम सल्फेट चा वापर प्रति झाड 25 ग्रॅम प्रमाणे करावा.
  • सूक्ष्म अन्नद्रव्ये उदा. जास्त लोह किंवा बोरॉनची कमतरता असल्यास सूक्ष्म अन्नद्रव्य स्लरीद्वारे उदा. एकरी 200लिटर पाण्यामध्ये 25 किलो ताजे शेण + 5 लिटर गोमूत्र + 5 किलो फेरस सल्फेट + 5किलो झिंक सल्फेट + 2 किलो बोरिक एसिड एकत्र आठवडाभर मुरवून सातव्या दिवशी झाडांना स्लरी द्यावी.
  • फुले येण्यापूर्वी व 50 टक्के फुले असताना झाडावर फुले मायक्रो ग्रेड– या द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेडची  फवारणी करावी.
  • बागेत आच्छादनाचा वापर केल्यास तापमान वआद्रतेवर वर नियंत्रण राहील.
  • जमिनीच्या पोतानुसार पाण्याचे नियोजन करावे. शक्‍यतो ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा वापर करावा. व पाण्याचा नियंत्रित वापर करावा. डाळिंबास जास्त पाण्याचा वापर करू नये.काळ्याजमिनीत निचरा ची व्यवस्था करावी.
  • तांबड्या हलक्या जमिनीत कॅल्शियम चे प्रमाण कमी असल्याने बोरॉनची फवारणी फुले आल्यावर व फळे लिंबाच्या आकाराची असताना करावे.( 50 ग्रॅम बोरिक ऍसिड +10 लिटर पाणी ) तसेच ड्रीप द्वारे दोन किलो कॅल्शिअम नायट्रेट 200 लिटर पाण्यातून एकरी फळ फुगवण याच्या काळात सोडावे.
  • फळांची फुगवन तसेच रंग, चव चांगली येण्यासाठी फळ पक्वतेच्या काळात पोटॅशियम सोनाईट 2 किलो + 200लिटर पाण्यातून ठिबकद्वारे किंवा फवारणीद्वारे 15दिवसाच्या अंतराने दोन ते तीन वेळा द्यावे.
  • फळ्यावर इंग्रजी LकिंवाYया अक्षराच्या आकाराची फळे हे तेलकट डागांमुळे ( तेल्या रोगामुळे )तडकतात यासाठी विद्यापीठाने तेलकट डाग नियंत्रणासाठी वेळापत्रक दिली आहे त्याचा वापर करावा.
  • जैविक खतांचा वापर रोग /किडीयेऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक दृष्ट्या दरवर्षी करावा.उदा.( ट्रायकोडर्मा / पीएसबी इ.)

 अशा प्रकारे वरील दिलेल्या सूचनांचा डाळिंब उत्पादित आयुष्य वाढविण्यासाठी व फळे तडकण्यापासून बचाव करण्यासाठी उपाय योजना करावी. कारण याद्वारे पंधरा ते वीस टक्के डाळिंब फळाचे नुकसान टाळता येते.

English Summary: cracking of pomegranet fruit this reason is important for that situation Published on: 15 February 2022, 05:18 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters