मागील दोन-तीन दिवसापासून थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला असून राज्यातील काही भागात किमान तापमानातमोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. अशा परिस्थितीत या कडाक्याच्या थंडीचा परिणाम पिकांवर होताना दिसत आहे. याबाबतीत तज्ञांनी पीक परिस्थितीबाबत दिलेला हा सल्ला महत्त्वाचा आहे.
पिकांवर होताना दिसत आहे. याबाबतीत तज्ञांनी पीक परिस्थितीबाबत दिलेला हा सल्ला महत्त्वाचा आहे.
विविध पिके व त्या बाबतीत तज्ञांचा सल्ला….
- ज्वारी- जेव्हा तापमानामध्ये 10 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गट होते तेव्हा तापमानाचा परिणाम हा ज्वारी पिकाच्या वाढीवर दिसून येतो. जर सात-आठ दिवस अशीच थंडी राहिली तर ज्वारीची कणसे तसेच पोटरीत राहतात.त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
- गहू- रब्बी हंगामातील सगळ्यात महत्वाचे पीक म्हणून गव्हाकडे पाहिले जाते.सध्या थंडी आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे गव्हावर तांबेरा रोग आणि मावा किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. थंडी पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस राहिली तर गहू जर फुलोरा अवस्थेत असेल तर पिकाची वाढ मंदावते.जर गव्हाचीउशिरा पेरणी केली असेल तर आता पिक फुटव्याच्या अवस्थेमधे आहे, त्यामुळे या पिकाला ही थंडी फायदेशीर ठरू शकते.
- हरभरा- हरभरा पिकामध्ये अशी थंडी आणि ढगाळ हवामान राहिले तर फुलगळ होऊ शकते.त्यासोबतच घाटेअळीचा प्रादुर्भाव देखील वाढू शकतो.परंतु ज्या ठिकाणी केव्हा थंडीचे वातावरण आहे, ढगाळ वातावरण नाही अशा ठिकाणी या संधीचा फायदा हरभरा ढगाळ वातावरण नाही अशा ठिकाणी या थंडीचा फायदा हरभरास होऊ शकतो.
फळबागा विषयी…..
- द्राक्ष- द्राक्ष बागेत वाढत्या थंडीमुळे द्राक्ष मण्यांमध्ये क्रॅकिंगची समस्या येऊ शकते. आटोक्यात ठेवण्यासाठी पाणी उतरण्यापूर्वी च्या अवस्थेतील बागेमध्ये तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ची फवारणी करावी.बागेतील जमीन वाफसा स्थितीमध्ये राहील याची तंतोतंत काळजी घ्यावी. पिंकबेरी ची समस्या येऊ नये यासाठी तापमान कमी होतातचठीकठिकाणी शेकोटी पेटवाव्या.घड पेपरने झाकावेत.
- डाळिंब- सध्या तापमान 25 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे त्यामुळे नवीन बहार पकडलेला असल्यास फुले येण्यामध्ये समस्या होऊ शकते. डाळिंबामध्ये फुले चांगल्या प्रकारे येण्यासाठी तापमान 28 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असले पाहिजे. बऱ्याच ठिकाणी दिवसाचे तापमान अधिक आणि रात्रीचे तापमान एकदम कमी राहत आहे.दिवस आणि रात्रीच्या तापमानातीलवाढत्या फरकामुळे फळे तडकण्याचेप्रमाण वाढू शकते. त्यासाठी बागेत पाणी देण्याचे नियोजन व्यवस्थित करावे. एकाच वेळी जास्त पाणी देण्यापेक्षा रोज थोड्या थोड्या प्रमाणात आणि संध्याकाळी चार नंतर पाणी द्यावे.
- केळी- थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे केळी बागेत रात्रीच्या वेळी पाणी द्यावे. बागेच्या चोहोबाजूंनी शेकोटी करावी, त्यामुळे तापमानात वाढ होऊन केळी बागेला त्याचा फायदा होतो.
- मोसंबी- सध्या मोसंबी मध्ये आंबे बहार हा फुलोरा अवस्थेत आहे. त्यामुळे ही थंडी यासाठी अनुकूल ठरेल. अशा बागांमध्ये आंबवणीचे पाणी तसेच खतमात्रा देऊन ताण तोडावा.
- संत्रा- जानेवारी महिन्यात दुसऱ्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला होता त्यामुळे बागेतील पाण्याचा ताण तुटला आहे.त्यामुळे जानेवारीला झालेल्या पावसानंतर आता बागेमध्ये पाणी सुरू करण्यास काही हरकत नाही. रात्री चे तापमान थंड जरी असले तरी एक दोन दिवसात दिवस बघून पडेल. दुपारचे तापमान फुले येण्याच्या प्रक्रियेत अनुकूल राहील. (संदर्भ-ॲग्रोवन)
Share your comments