भारतात अनेक राज्यात केळी लागवड केली जाते याची लागवड करून केळी उत्पादक शेतकरी प्रचंड नफा देखील कामवितात. महाराष्ट्रात याची लागवड हि इतर राज्यांच्या तुलनेत अधिक पाहावयास मिळते. राज्यातील खान्देश प्रांतात केळीची लागवड अधिक आहे. जळगाव जिल्हा केळीच्या उत्पादणासाठी जगात ओळखला जातो, जळगाव जिल्ह्यातील केळीला जिआय टॅग देखील दिला गेला आहे.
यावरून खान्देशचे केळी उत्पादनातील महत्व अधोरेखित होते. केळी हे एक प्रमुख फळपीक आहे आणि केळी उत्पादक शेतकरी यातून प्रचंड नफा देखील कामवितात. असे असले तरी, केळी पिकातून काहीवेळेस केळी उत्पादक शेतकऱ्यांना खर्च सुद्धा निघत नाही. केळी पिकावर अनेक रोग अटॅक करतात, जर आपण रोगावर वेळीच नियंत्रण नाही मिळवले तर त्यामुळे केळीच्या उत्पादनात घट घडून येते. म्हणुन आज आपण केळी पिकावर अटॅक करणाऱ्या अशाच एका रोगाविषयीं माहिती घेणार आहोत, जर रोगाची माहिती असली तर त्यावर निदान करणे सोपे जाते, आणि उत्पादन मध्ये होणारा घाटा कमी करता येतो. आज आपण केळी पिकावर लागणाऱ्या ब्लॅक सिगाटोका या भयंकर आजाराविषयी जाणुन घेऊया.
ब्लॅक सिगाटोका हा केळी पिकावर येणारा एक प्रमुख रोग आहे जर यावर वेळीच नियंत्रण केले नाही तर मोठ्या प्रमाणात केळी पिकाचे नुकसान होऊ शकते. हा रोग केळीच्या पानावर अटॅक करतो, या रोगात केळीचे पानावर काळे डाग पडतात. हा रोग संपूर्ण जगातील केळी पिकावर आढळतो. भारतातील जवळपास सर्व केळी उत्पादक राज्यात हा रोग अटॅक करतो. जर ह्या रोगाचा अटॅक जास्त झाला तर प्रभावित केळीची पाने हि गळायला सुरवात होते. ह्या रोगाने ग्रसित केळीचे झाडापासून कमी उत्पादन मिळते. ह्या रोगाने ग्रसित झाडावरील केळी लवकर पिकतात. ह्या ब्लॅक सिगाटोका सारखाच एक रोग आहे येल्लोव सिगाटोका
लक्षण
या रोगाने ग्रसित पानांवर लहान लाल-गंजलेले तपकिरी ठिपके दिसतात, जे केळीच्या पानांच्या खालच्या बाजूस अधिक स्पष्ट दिसतात. हे ठिपके हळूहळू लांब, रुंद आणि काळे होऊन लाल-तपकिरी पट्टेसारखे बनतात. सुरुवातीला पट्टे पानांच्या नसांना समांतर चालतात आणि पानाच्या खालच्या बाजूने अधिक स्पष्टपणे दिसतात. पट्टे हे रुंद होत जातात आणि दोन्ही पानांच्या पृष्ठभागावर दिसतात आणि अंडाकृती होत जातात आणि ग्रसित पानाचा मध्यभाग हा कालांतराने राखाडी होतो. या टप्प्यावर ग्रसित भागाच्या काठाभोवती पिवळा आभा विकसित होतो.
जर हा रोग केळीच्या बागावर आढळाला तर त्याच क्षणी रोगाने ग्रसित केळीची पाने कापून घ्यावी आणि बागे बाहेर काढून नष्ट करावीत. पेट्रोलियम-आधारित खनिज तेलाची फवारणी करावी ज्यात 1 टक्के बुरशीनाशक टाकावे जसे की प्रोपिकोनाझोल (0.1%) किंवा कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब कॉम्बिनेशन (0.1%) किंवा कार्बेन्डाझिम (0.1%) किंवा ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन + टेब्युकोनाझोल (1.5 g/L).
एका महिन्यात 7 वेळा फवारणी केल्यास या रोगावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येऊ शकते.
Share your comments