यंदा राज्य सरकारने शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये केवळ शेतकऱ्याच्या हिताचे निर्णयच आले नाहीत तर त्याची अंमलबजावणीला सुद्धा सुरुवात केली जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा करीत आता राज्य सरकारने केळी चा फळपिकामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आता इतर पिकाप्रमाने केळी लागवडही मनरेगा च्या माध्यमातून करता येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादनावर होणार खर्च कमी होणार आहेत पण सोबतच नुकसान झाले तर मदतही मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यात केळीचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आहे. फळपिकामध्ये समावेश करून घेण्यासाठी जळगाव मधील शेतकऱ्यांनी मोठा संघर्ष केला आहे.
लागवड करण्यापासून ते देखभालीचा खर्चही मिळणार :-
रोजगार हमी योजनांतर्गत आतापर्यंत आंबा, लिंबू, मोसंबी या फळपिकांची लागवड केली जात होती. यंदाच्या वर्षांपासून यामध्ये केळी या फळपिकाचा सुद्धा समावेश होणार आहे. केळीचे उत्पादन घेत असताना त्यावर जो खर्च लागत होता त्या खर्चावर अंकुश येणार आहे. फळपिकांसाठी या योजनेमधून अनुदान दिले जाणार आहे. फळबाग लागवड करण्यासाठी खड्डे खोदन्यापासून ते लागवडीपर्यंत आणि तिथून पुढे देखभाल करण्यासाठी योजनेतील जी मजुरी आहे त्याप्रमाणे मजुरी द्यावी लागते. शासनाकडून रोपे पुरवली जातात.
हेक्टरी दीड लाखाचे अनुदान :-
केळी चा फळपिकामध्ये समावेश केला की नंतर शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी कृषी विभागाला आदेश देण्यात आले आहेत. मात्र यासाठी शेतकऱ्याला केळी लागवडीची माहिती आणि सातबारा, 8 ‘अ’, ही कागदपत्रे कृषीविभागाकडे जमा करून सहभाग नोंदवावा लागणार आहे. लागवड केल्यापासून तर देखभालपर्यंत शेतकऱ्यांना दीड लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे जरी नुकसान झाले तरी त्याची नुकसानभरपाई दिली जाणार आहे.
जळगावात केळी हे मुख्य फळपिक :-
जळगाव जिल्ह्यात शहादा तालुक्यात केळीचे सर्वात जास्त क्षेत्र आहे मात्र मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच केळीचा फळपिकात समावेश होत नसल्याने नुकसानभरपाई चा संबंध आलेला नाही. मात्र आता राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
Share your comments